एकरकमी 6,199 रुपये देऊन घरी आणा Redmi A1; फोनवर मिळतोय बँक डिस्काउंट

रविवारी Xiaomi नं आपली सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन सीरिज Xiaomi 13 लाँच केली आहे. या सीरिजमध्ये कंपनीनं Xiaomi 13 आणि Xiaomi 13 Pro असे दोन महागडे स्मार्टफोन सादर केले आहेत. परंतु तुमचं बजेट खूप कमी असेल तर कंपनीच्या सबब्रँड Redmi कडे एक शानदार फोन आहे. Redmi A1 स्मार्टफोन आता मोठ्या डिस्काउंटसह अ‍ॅमेझॉनवर उपलब्ध झाला आहे. हा फोन 2GB RAM, MediaTek Helio A22 चिपसेट, 5000mAh बॅटरी आणि 8MP कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. चला जाणून घेऊया Redmi A1 वरील ऑफर्स.

Redmi A1 वरील ऑफर्स

Redmi A1 स्मार्टफोनच्या एकमेव व्हेरिएंटची एमआरपी 8,999 रुपये आहे आहे. परंतु 2GB रॅमसह 32GB इंटरनल स्टोरेज असलेला हा स्मार्टफोन 31 टक्के डिस्काउंट नंतर हा फोन आता 6,199 रुपयांमध्ये अ‍ॅमेझॉनवर लिस्ट झाला आहे. जर तुम्ही हा फोन फेडरल बँक किंवा एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डनं विकत घेतला तर तुम्हाला 619 रुपयांची सूट मिळू शकते, त्यामुळे याची किंमत 5,580 रुपये होते. तसेच हा फोन तुम्ही 296 रुपयांच्या मासिक हप्त्यावर देखील विकत घेऊ शकता. तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज करून Redmi A1 आणखी स्वस्तात विकत घेऊ शकता. हा हँडसेट लाइट ब्लू, क्लासिक ब्लॅक आणि लाइट ग्रीन कलरमध्ये विकत घेता येईल. हे देखील वाचा: भारतातील सर्वात स्वस्त 5जी स्मार्टफोनची लाँच डेट समजली; इतकी असू शकते JioPhone 5G ची किंमत

Redmi A1 Specifications

Redmi A1 अँड्रॉइड 12 आधारित मीयुआयवर चालतो, त्यामुळे जुन्या एंट्री लेव्हल स्मार्टफोन्स पेक्षा चांगला अनुभव मिळू शकतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये ऑक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेक हीलियो जी22 चिपसेट देण्यात आला आहे. हा रेडमी फोन LPDDR4X RAM आणि eMMC 5.1 Storage फीचरला सपोर्ट करतो तसेच फोनमध्ये 1टीबी पर्यंतचा मायक्रोएसडी कार्ड वापरता येईल.

रेडमी ए1 स्मार्टफोनमध्ये 6.52 इंचाचा मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले एचडी+ रिजोल्यूशन, 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियो आणि 1600 X 720 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. हा वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले आहे ज्याच्या तीन कडा नॅरो बेजल्स आहेत तर तळाला रुंद चिन पार्ट देण्यात आला आहे. Redmi A1 चे डायमेंशन 164.9x 76.75×9.09 एमएम आणि वजन 192 ग्राम आहे.

फोटोग्राफीसाठी रेडमी ए1 स्मार्टफोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/2.0 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. जोडीला एफ/2.2 अपर्चर असलेली एक एआय लेन्स पण आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: ChatGPT: तुमची नोकरी घालवू शकतो हा रोबॉट? गुगलपेक्षा फास्ट देतो प्रश्नांची उत्तरे, असं वापरा मोबाइलवर

Redmi A1 ड्युअल सिम फोन आहे जो 4जी एलटीईवर चालतो. या फोनमध्ये 3.5एमएम जॅक सहित ब्लूटूथ 5.0 तथा 2.5 वायफाय सारखे फीचर्स मिळतात. तसेच पावर बॅकअपसाठी नवीन रेडमी मोबाइल फोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे जी 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here