OnePlus सध्या चीनमध्ये आपला नववा वर्धापनदिन साजरा करत आहे, त्यानिमित्ताने कंपनीची आगामी फ्लॅगशिप OnePlus 11 series लवकरच सादर केली जाऊ शकते. तिकडे नव्या सीरिजची तयारी सुरु असताना भारतात वनप्लसच्या जुन्या फ्लॅगशिप स्मार्टफोनवर मोठा डिस्काउंट दिला जात आहे. काही महिन्यांपूर्वी आलेल्या OnePlus 10T 5G वर दमदार डील मिळत आहे. अॅमेझॉनवर सध्या वनप्लस कम्यूनिटी सेल सुरु आहे. या सेल दरम्यान स्मार्टफोनवर बँक ऑफर आणि एक्सचेंज डिस्काउंट मिळून एकूण 15000 हजारांची सूट मिळत आहे. पुढे आम्ही तुम्हाला या ऑफरची सविस्तर माहिती दिली आहे.
OnePlus 10T 5G वरील ऑफर
OnePlus 10T 5G स्मार्टफोन अॅमेझॉनवर 49,999 रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला आहे. या स्मार्टफोनवर ICICI बँकेच्या कार्ड धारकांना 5000 रुपयांचा थेट डिस्काउंट दिला जात आहे. तसेच तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज करून 10,000 रुपयांपर्यंतची आणखी बचत करू शकता. म्हणजे या फोनवर एकूण 15,000 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. या डिस्काउंटसह जुन्या फोनची व्हॅल्यू इतका अतिरिक्त डिस्काउंट देखील दिला जात आहे. जो तुमच्या फोनच्या मॉडेल आणि कंडीशनवर अवलंबुन असेल. अशाप्रकारे या फोनवर 15,000 रुपयांपेक्षा जास्तीचा डिस्काउंट मिळेल आणि वनप्लसचा हा फोन 34,999 रुपयांपेक्षा कमी किंमतीत तुमचा होईल. हे देखील वाचा: How To Youtube Shorts Videos: पाहा युट्युब शॉर्ट्स व्हिडीओ डाउनलोड करण्याच्या सर्वात सोप्या ट्रिक्स
OnePlus 10T चे स्पेसिफिकेशन्स
- 6.7-इंच Full-HD+ AMOLED पॅनल, 120Hz रिफ्रेश रेट
- Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर
- 16GB पर्यंत RAM, 256GB स्टोरेज
- Android 12 आधारित Oxygen OS 12.1
- 50MP + 8MP + 2MP ट्रिपल रियर कॅमेरा
- 16MP फ्रंट कॅमेरा
- 4,800mAh बॅटरी, 150W चार्जिंग
OnePlus 10T मध्ये कंपनीनं 6.7-इंचाचा FHD+ डिस्प्ले दिला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट, 950 nits पीक ब्राईटनेस, 2412×1080 पिक्सल रिजोल्यूशन आणि 20.1:9 अस्पेक्ट रेशियोला सपोर्ट करतो. HDR10+ सर्टिफाईड डिस्प्लेला कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ची सुरक्षा देण्यात आली आहे.
OnePlus 10T मध्ये लेटेस्ट Snapdragon 8+ Gen 1 चिपसेट देण्यात आला आहे. जो Snapdragon 8 Gen 1 चिपसेट पेक्षा जास्त वेगवान आणि कार्यक्षम आहे. सोबतीला या फ्लॅगशिप वनप्लसमध्ये 16GB पर्यंतचा LPDDR5 RAM आणि 256GB पर्यंतची UFS 3.1 two-lane storage2 देण्यात आली आहे. हा फोन Android 12 आधारित OxygenOS 12.1 वर चालतो OnePlus 10T ला कंपनी तीन प्रमुख OS अपडेट आणि चार वर्षांचे सिक्योरिटी अपडेट देणार आहे.
OnePlus 10T च्या बॅक पॅनलवर ड्युअल एलईडी फ्लॅशसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात f/1.8 अपर्चर आणि OIS सपोर्ट असलेला 50MP Sony IMX766 सेन्सर प्रायमरी कॅमेऱ्याचे काम करतो. तर f/2.2 अपर्चर असलेला 8MP चा अल्ट्रा-वाईड कॅमेरा आणि 2MP चा मॅक्रो सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी यात f/2.2 अपर्चरसह 16MP चा फ्रंट-फेसिंग कॅमेरा मिळतो. हे देखील वाचा: BSNL दमदार प्लॅन! 211 टीव्ही चॅनेल आणि 300GB पेक्षा जास्त डेटा अगदी मोफत
कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये वाय-फाय 6, ब्लूटूथ 5.2 आणि 5जी सेल्युलर नेटवर्क मिळतं. 150W SUPERVOOC फास्ट चार्जिंग सपोर्टसह फोनमध्ये 4,800mAh ची बॅटरी मिळते. फोनच्या बॉक्समध्ये एक 160W चा चार्जर मिळेल, जो OnePlus नुसार OnePlus 10T स्मार्टफोनला 19 मिनिटांत पूर्णपणे चार्ज करेल.
















