BSNL दमदार प्लॅन! 211 टीव्ही चॅनेल आणि 300GB पेक्षा जास्त डेटा अगदी मोफत

भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) कंपनीनं आपल्या युजर्सना आकर्षित करण्याचे पुरेपूर प्रयत्न करत आहे. कंपनीकडे प्रीपेड व पोस्टपेड ग्राहक आहेत तसेच फायबर युजर्स देखील आहे. फायबर युजर्ससाठी देखील सरकारी कंपनी सतत परवडणारे प्लॅन्स सादर करत असते. फायबर प्लॅन्सचा एक चांगला पोर्टफोलियो बीएसएनएलकडे आहे. या यादीत कंपनीनं अलीकडेच Rs 528 चा प्लॅन सादर केला होता जो एक लिमिटेड पीरियड ऑफर अंतर्गत सादर करण्यात आला आहे. या प्लॅनमध्ये मिळणार बेनिफिट्स पाहता यात 300GB पेक्षा जास्त डेटा, फ्री कॉलिंग आणि 211 टीव्ही चॅनेलचा लाभ मिळेल. चला जाणून घेऊया या प्लॅनची सविस्तर माहिती.

BSNL Rs 528 प्लॅन

या Bharat Fibre Broadband Combo Plan ला कंपनीनं BSNL Triple Play Service असं नाव दिलं आहे. कारण यात इंटरनेट, टेलीफोन आणि आयपीटीव्हीचा फायदा मिळतो. या प्लॅन अंतर्गत कंपनी ग्राहकांना 10Mbps च्या स्पीडवर 300जीबी पेक्षा जास्त डेटा ऑफर करत आहे. तसेच ग्राहक संपूर्ण भारतात अनलिमिटेड फ्री कॉलिंगचा फायदा घेऊ शकतात. हे देखील वाचा: परवडणाऱ्या किंमतीत Realme V23i 5G ची एंट्री; जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

210gb data and 110 days validity bsnl rs 666 plan details compete airtel reliance jio recharge

पहा फीफा वर्ल्ड कप 2022 मॅच

बीएसएनएलच्या 528 रुपयांच्या फायबर प्लॅनमध्ये आयपीटीव्हीचा अ‍ॅक्सेस दिला जात आहे. यासाठी कंपनीनं सिनेसॉफ्ट आणि भूमिका या कंपन्यांशी भागेदारी केली आहे. आयपीटीव्हीचा फायदा असा की यावर तुम्ही टीव्ही चॅनल्स बघताना तुमचं बँड्विथ वापरलं जात नाही. त्यामुळे डेटा खर्च न करता तुम्हाला करमणूक मिळते. ही टेक्नॉलॉजी केबलची जागा घेण्यासाठी सादर करण्यात आली आहे.

सरकारी कंपनी बीएसएनलच्या या प्लॅनमध्ये एकूण 211 चॅनेल दिला जात आहेत, यात Sports 18 चॅनेलचा देखील समावेश आहे. या चॅनेलच्या मदतीनं फुटबॉल प्रेमी Fifa World Cup 2022 मॅच मोफत बघू शकतात. स्पोर्ट्स चॅनेल व्यतिरिक्त ग्राहक न्यूज व एंटरनटेनमेंट चॅनेल देखील बघता येतील. हे देखील वाचा: 10 हजारांच्या आत नोकियाचा ‘वॉटर रेजिस्टंट’ फोन लाँच; Nokia C31 देतो तीन दिवसांचा बॅटरी बॅकअप

अशाप्रकारे अ‍ॅक्टिव्हेट करा हा प्लॅन

प्लॅन कंपनीच्या वेबसाइटवर लिस्ट करण्यात आलेला नाही, परंतु तरीही युजर या प्लॅनचा वापर करू शकतात. हा प्लॅन अ‍ॅक्टिव्हेट करण्यासाठी तुम्हाला तुमच्या नजीकच्या BSNL स्टोर किंवा कंपनीच्या टोल-फ्री नंबरवर संपर्क करावा लागेल आणि हा प्लॅन अ‍ॅक्टिव्ह करावा लागेल. महत्वाचे म्हणजे या प्लॅनची किंमत 528 रुपये आहे, परंतु यावर 18 टक्के अतिरिक्त जीएसटी द्यावा लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here