4जीबी रॅम आणि 4,230एमएएच बॅटरी सह लॉन्च झाला नॉच डिस्प्ले वाला ओपो ए5, किंमत फक्त 14,990 रुपये

गेल्या आठवड्यात आम्ही एक्सक्लूसिव बातमी दिली होती की टेक कंपनी ओपो लवकरच इंडियन स्मार्टफोन मार्केट मध्ये आपला नवीन फोन ओपो ए5 लॉन्च करणार आहे. त्यानुसार आज ओपो ने आपला हा स्मार्टफोन सेल साठी सादर केला आहे. ओपो ए5 कंपनी ने आॅफलाईन रिटेल स्टोर्स वर उपलब्ध केला आहे. देशातील आॅफलाईन बाजारात हा फोन 14,990 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे जो सेल साठी उपलब्ध झाला आहे.

ओपो ए5 इंडियन स्मार्टफोन मार्केट मधील सर्वात स्वस्त नॉच डिस्प्ले वाल्या स्मार्टफोन्स पैकी एक आहे. फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता यात 19:9 आस्पेक्ट रेशियो वाली 6.2-इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे जो 1520 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन ला सपोर्ट करतो. फोन चा डिस्प्ले 2.5डी कर्व्ड ग्लास ने प्रोटेक्ट करण्यात आला आहे. हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित कलरओएस 5.1 वर सादर करण्यात आला आहे तसेच 1.8गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 450 चिपसेट वर चालतो.

कंपनी ने या फोन मध्ये 4जीबी रॅम दिला आहे. तसेच ग्राफिक्स साठी फोन मध्ये एड्रेनो 506 जीपीयू देण्यात आला आहे. ओपो ए5 32जीबी इंटरनल स्टोरेज ला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्ड ने 256जीबी पर्यंत वाढवता येते तसेच ग्राफिक्स साठी फोन मध्ये एड्रेनो 506 जीपीयू देण्यात आला आहे. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता या फोन मध्ये डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो एलईडी फ्लॅश सह 13-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल च्या कॅमेरा सेंसर ला सपोर्ट करतो. तर सेल्फी साठी या फोन मध्ये एआई ब्यूटीफाई फीचर असलेला 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

ओपो ए5 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई सह बेसिक कनेक्टिविटी फीचर ला सपोर्ट करतो. फोन च्या सेल्फी कॅमेरा मध्ये फेस अनलॉक टेक्नोलॉजी आहे. तसेच पावर बॅकअप साठी फोन मध्ये 4,230एमएएच ची पावरफुल बॅटरी देण्यात आली आहे. चीन मध्ये हा फोन मिरर ब्लू आणि मिरर पिंक कलर वेरिएंट मध्ये लॉन्च झाला आहे. जो 14,990 रुपयांमध्ये आॅनलाईन व आॅफलाईन स्टोर मधून विकत घेता येईल.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here