Exclusive : realme Narzo N65 5G ची रॅम, स्टोरेज आणि कलर माहिती लीक, 28 मे ला होईल लाँच

रियलमीने आज घोषणा केली आहे की कंपनी भारतात 28 मे ला आपला नवीन स्मार्टफोन realme Narzo N65 5G लाँच करेल. ब्रँडकडून माहिती देण्यात आली आहे की हा फोन Mediatek Dimensity 6300 प्रोसेसरसह असेल. तसेच दुसरीकडे 91 मोबाईलला या फोनबाबत एक्सक्लूसिव्ह माहिती मिळाली आहे.आम्हाला या फोनच्या रॅम, स्टोरेज आणि कलर बाबत माहिती मिळाली आहे.

realme Narzo N65 5G रॅम आणि मेमरी व्हेरिएंट्स

  • 4GB RAM + 64GB Storage
  • 4GB RAM + 128GB Storage
  • 6GB RAM + 128GB Storage

91 मोबाईलला रिटेल सोर्सच्या माध्यमातून माहिती मिळाली आहे की अगामी रियलमी नारजो एन 65 5 जी फोन तीन मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाँच होईल. फोनच्या दोन मेमरी व्हेरिएंट 4 जीबी रॅमला सपोर्ट करेल जो 64 जीबी स्टोरेज तसे 128 जीबी स्टोरेजवर विकला जाईल. तसेच सर्वात मोठा Narzo N65 5G फोन मॉडेल 6 जीबी रॅमवर लाँच होईल ज्यात 128 जीबी मेमरी मिळेल.

realme Narzo N65 5G चे कलर

सोर्सवरून मिळालेल्या माहितीनुसार हा रियलमी नारजो एन 65 5 जी स्मार्टफोन दोन रंगांमध्ये लाँच केला जाईल. हा मोबाईल फोन बाजारात डिप ग्रीन (Deep Green) आणि ऐम्बर ग्रीन (Amber Gold) कलरमध्ये उपलब्ध होईल.

realme NARZO N65 5G किंमत भारत (अंदाजे)

रियलमी नारजो एन 65 एक लो बजेट 5 जी फोन असेल ज्याला 15 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत लाँच केले जाईल. या फोनची प्रारंभिक किंमत 9,999 रुपये असू शकते ज्यात 4GB RAM + 64GB Storage मिळण्याची शक्यता आहे. तसेच फोनच्या 4 जीबी+128 जीबी व्हेरिएंटची किंमत 10,999 रुपये तसेच सर्वात मोठ्या NARZO N65 5G 6GB RAM + 128GB Storage ची किंमत 12,999 रुपये असू शकते. असो, फोनच्या ठोस किंमतीसाठी 28 मे ला फोन लाँचची वाट पहावी लागणार आहे.

मिळेल Dimensity 6300 5G प्रोसेसरची पावर

कंपनीकडून सांगण्यात आले आहे की realme NARZO N65 5G फोन मीडियाटेक डाईमेंसिटी 6300 ऑक्टाकोर प्रोसेसरवर लाँच केला जाईल. ही 6 नॅनोमीटर फे​ब्रिकेशनवर बनलेली मोबाईल चिपसेट आहे जी 2.4 गीगाहर्ट्झ पर्यंतच्या क्लॉक स्पीडवर रन करेल. या 64-bit CPU मध्ये 2.4GHz असणाऱ्या 2 Arm Cortex-A76 कोर तसेच 2.0GHz असणाऱ्या 6 Arm Cortex-A55 कोरचा समावेश आहे.

मिळतील हे फिचर्स

रियलमीकडून सांगण्यात आले आहे की नारजो एन 65 5 जी फोन IP54 सर्टिफाईड असेल जो याला पाणी आणि धूळीपासून सुरक्षित ठेवेल. तसेच या मोबाईलला Rainwater Smart Touch टेक्नॉलॉजीसह केले जाईल जो स्क्रीन टचला इफेक्टिव बनवितो, तसेच डिव्हाईस तुम्हाला ओल्या हातांनी फोन सहजतेने ऑपरेट करण्यास अनुमती देईल. आम्ही तुम्हाला सांगतो की NARZO N65 5G 50MP कॅमेरा सह लॉन्च केला जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here