12 सप्टेंबरला लॉन्च होईल अॅप्पल आयफोन Xएस आणि सोबत दोन नवीन मॉडेल

गेल्या काही दिवसांपासून अॅप्पलच्या नवीन फोन्स बद्दल अनेक बातम्या येत होत्या. अनेक लीक मधून अशी माहिती देण्यात आली होती की गेल्या वर्षी प्रमाणे यावेळी पण कंपनी तीन मॉडेल सादर करू शकते. काही दिवसांपूर्वी अशी सुचना देण्यात आली होती की कंपनी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात हे फोन्स जगासमोर आणू शकते आणि आज अॅप्पल ने मीडिया इनवाइट शेयर केले आहे. 12 सप्टेंबरला अॅप्पल ने एका इवेंटचे आयोजन करत आहे आणि तेव्हा कंपनी हे फोन्स समोर आणेल.

अॅप्पलचा हा इवेंट कंपनी च्या यूएस मधील कूपरर्टिनो येथील मुख्यालयात अॅप्पल चे फाउंडर स्टिव जॉब्स च्या नावाने असलेल्या थियेटर मध्ये केला जाईल. कंपनी ने मीडिया इनवाइट ला गॅदर राउंड असे नाव दिले आहे. पण या मीडिया इनवाइट बद्दल बोलले जात आहे की कंपनी आयफोन सोबत राउंड शेप मधील अॅप्पल वॉच पण सादर करू शकते.

नवीन आयफोन बद्दल बोलायचे झाले तर या लीक मधून मिळालेल्या माहितीनुसार कंपनी यावेळी तीन वेगवेगळ्या स्क्रीन साइज मध्ये फोन्स अणू शकते. एक मॉडेल कमी रेंज चा असेल ज्यात 6.1—इंचाची स्क्रीन असेल आणि कंपनी हा एलसीडी स्क्रीन सह सादर करू शकते. तसेच इतर दोन मॉडेल मध्ये कंपनी ओएलईडी स्क्रीनचा वापर करू शकते. यातील एक मॉडेल 5.8—इंचाच्या स्क्रीन सह सादर केला जाऊ शकतो तर दुसरा मॉडेल कंपनी 6.5—इंचाच्या स्क्रीन सह सादर करू शकते.

पण या फोन्स च्या इतर स्पेसिफिकेशन बद्दल जास्त माहिती मिळाली नाही पण आशा आहे की गेल्या वर्षी प्रमाणे यावेळी पण कंपनी फेसआईडी सारखे फीचर्स देईल. काही तज्ज्ञांच्या मते कंपनी यावेळी 3डी टच काढून टाकू शकते. काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की कंपनी एक मॉडेल डुअल सिम सपोर्ट सह सादर करू शकते. अॅप्पल च्या कोड मध्ये डुअल सिम सपोर्ट दिसला होता.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here