आजपासून मोफत बघा Jio Cinema वर IPL! Jio चं सिम असण्याची आवश्यकता नाही

यंदा इंडियन प्रीमियर लीगची मजा द्विगुणित होणार आहे कारण रिलायन्स जियोच्या ओटीटी अ‍ॅप जियोसिनेमावर प्रेक्षकांना मोफत आयपीएल 2023 चे सर्व सामने बघता येतील. परंतु जर तुम्ही विचार करत असाल की फक्त जियो युजर्स मोफत ऑनलाइन मॅच बघू शकतील तर तसं नाही. तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे कारण एयरटेल, वोडाफोन-आयडिया (वी) आणि बीएसएनएल युजर्स देखील मोफत सर्व सामने आपल्या मोबाइल, लॅपटॉप व टीव्हीवर ऑनलाइन स्ट्रीम करू शकतील.

Vi, Airtel आणि BSNL युजर्स देखील मोफत बघू शकतील आयपीएल

Jio Cinema भारतात होणाऱ्या IPL 2023 चा अधिकृत लाइव्ह-स्ट्रीमिंग पार्टनर आहे. त्यामुळे एयरटेल, जियो, विआय आणि बीएसएनएलच्या सर्व युजर्सना आयपीएलमधील सर्व सामने मोफत ऑनलाइन स्ट्रीम करता येतील. म्हणजे तुम्ही कोणत्याची टेलीकॉम कंपनीचे युजर असले तरी JioCinema अ‍ॅपच्या माध्यमातून TATA IPL 2023 मोफत मध्ये ऑनलाइन स्ट्रीम करता येईल. हे देखील वाचा: Nothing Phone (2) लवकरच येऊ शकतो भारतात; BIS वेबसाइटवर लिस्ट झाला फोन

या भाषांमध्ये घेता येईल आयपीएलची मजा

जियो सिनेमावर 12 वेगवेगळ्या भाषा जसे की मराठी, तामिळ, इंग्लिश, हिंदी, तेलुगू, गुजराती, बंगाली आणि भोजपुरीमध्ये मॅचचा आनंद घेता येईल. तसेच अ‍ॅपवर फक्त समालोचनाची भाषा बदलणार नाही तर मोबाइलवरील आकडेवारी आणि ग्राफिक्स देखील तुम्ही निवडलेल्या भाषेत दिसू लागतील.

आयपीएल 2023 मध्ये होणार 74 सामने

31 मार्चपासून इंडियन प्रीमियर लीग 2023 ची सुरुवात होत आहे. पहिल्या दिवशी पहिला सामाना गुजरात टायटंस आणि चेन्नई सुपर किंग दरम्यान असेल. यंदा एकूण 74 सामने खेळवले जातील. तसेच जियो सिनेमा अ‍ॅपवर तुम्ही आयपीएलचे सर्व सामने बघू शकाल. तसेच वेगवेगळ्या अँगलमधून सामना पाहू शकाल. म्हणजे तुम्ही कॅमेरा अँगल फोनवर बदलू शकाल. हे देखील वाचा: 240वॉट चार्जिंग असलेला Realme GT 3 लवकरच होऊ भारतात लाँच; सर्टिफिकेशन साइटवर झाला लिस्ट

यावेळी 52 दिवस चालणाऱ्या क्रिकेटच्या महामेळाव्यात एकूण 10 संघ सहभागी होत आहेत. सीजनमध्ये एकूण 70 लीग सामने खेळवले जातील. त्यानंतर प्लेऑफचे चार सामने खेळवले जातील. अशाप्रकारे टूर्नामेंटमध्ये एकूण 74 सामने होतील. तसेच तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की 18 डबल हेडर (एका दिवसात दोन सामने) होतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here