
Samsung Galaxy A24 तुर्कीमध्ये लवकरच लाँच होणार आहे, असा खुलासा कंपनीनं काही दिवसांपूर्वी केला होता. परंतु, लाँच डेटची माहिती अद्याप समोर आली नाही. परंतु, आता फोन गुगल प्ले कंसोल लिस्टिंगवर दिसला आहे. टेक वेब साइट प्राइसबाबाच्या टीमनं डिवाइस SM-A245F मॉडेल नंबरसह स्पॉट केला आहे. तसेच लिस्टिंगमधून फोनच्या काही स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे. चला जाणून घेऊया संपूर्ण माहिती…
लिस्टिंगमध्ये समोर आली माहिती
लिस्टिंगनुसार, स्मार्टफोनमध्ये एआरएम माली जी57 जीपीयूसह मीडियाटेक हीलियो जी99 चिपसेट असेल. तसेच, डिवाइसमध्ये 4GB रॅम असेल आणि हा फोन Android 13 वर चालेल. यात 450 डीपीआय स्क्रीन डेंसिटीसह 1080×2324 एफएचडी डिस्प्ले देण्यात येईल.

तुम्हाला आठवत असेल की काही दिवसांपूर्वी 91मोबाइल्सनं या फोनचं सपोर्ट पेज सॅमसंगच्या भारतीय वेबसाइटवर पाहिलं होतं, ज्यामुळे या फोनच्या भारतीय लाँच नजीक असल्याचं समजतं. तसेच अनेक लीक आणि रिपोर्ट्समधून गॅलेक्सी ए-सीरीजच्या या आगामी फोनच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे.
सॅमसंग गॅलेक्सी ए24 चे स्पेसिफिकेशन्स (लीक)
मोबाइलमध्ये 1080 x 2408 पिक्सल रेजोल्यूशन असलेली 6.5 इंचाची वॉटरड्रॉप नॉच स्क्रीन असू शकते. ही स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली असू शकते जी 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करू शकते. सॅमसंग गॅलेक्सी ए24 4जी अँड्रॉइड 13 ओएससह वनयुआय 5 वर सादर केला जाऊ शकतो.
हा मोबाइल फोन मीडियाटेक हीलियो जी99 चिपसेटसह मार्केटमध्ये येऊ शकतो. फोन 4जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेजसह लाँच होऊ शकतो. पावर बॅकअपसाठी यात 5,000एमएएचची बॅटरी दिली जाऊ शकते. हा स्मार्टफोन 15वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला देखील सपोर्ट करू शकतो.
फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. मागे 50 मेगापिक्सलचा प्रायमरी, 5 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स मिळू शकते. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 13 मेगापिक्सलचा कॅमेरा मिळू शकतो.
सॅमसंग गॅलेक्सी ए24 ची संभाव्य किंमत
एक रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला होता की हा सॅमसंग फोन $190 यूएस डॉलर (जवळपास 16 हजार रुपये) मध्ये सादर केला जाऊ शकतो. तसेच काही लीक्सनुसार गॅलेक्सी ए24 या महिन्यात म्हणजे एप्रिलमध्ये बाजारात येऊ शकतो.














