
टेक्नो कॅमोन 20 सीरीज भारतात लाँच झाली आहे. ह्यात Tecno Camon 20, Tecno Camon 20 Pro 5G आणि Tecno Camon 20 Premier 5G चा समावेश करण्यात आला आहे. सीरीजमधील सर्वात मोठा मॉडेल कॅमोन 20 प्रीमियरमध्ये 8GB RAM आणि 50MP+108MP कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, सविस्तर माहिती पुढे वाचता येईल.
टेक्नो कॅमोन 20 प्रीमियर 5जी चे स्पेसिफिकेशन्स
- डिस्प्ले : टेक्नो कॅमोन 20 प्रीमियर 5जी मध्ये 6.67 इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्यात 120Hz रिफ्रेश रेट मिळतो.
- प्रोसेसर : डिवाइसमध्ये 6एनएम बेस्ड ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेन्सिटी 8050 प्रोसेसर आणि एआरएम जी77 एमसी9 जीपीयू आहे.
- स्टोरेज : टेक्नो कॅमोन 20 प्रीमियर मध्ये 8GB LPDDR4X RAM आणि 512GB स्टोरेज देण्यात आली आहे.
- बॅटरी : फोनमध्ये बॅकअपसाठी 5,000mAh बॅटरी आणि 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळत आहे.
- कॅमेरा : कॅमोन 20 प्रीमियर मध्ये ट्रिपल सेटअप कॅमेरा आहे. ज्यात PDAF, f/1.77 अपर्चर असलेला 50MP चा 6P+1G लेन्स, 108MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा लेन्स, f/2.4 अपर्चर असलेला 2MP ची पोर्ट्रेट लेन्स मिळते. ह्या कॅमेऱ्यात ऑक्टा रिंग फ्लॅश आणि लेजर ऑटोफोकस टेक्नॉलॉजी देखील देण्यात आली. सेल्फीसाठी ड्युअल LED फ्लॅश आणि f/2.45 अपर्चर असलेला 32MP कॅमेरा आहे.
- सुरक्षा : फोनच्या सुरक्षेसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.
- OS : ऑपरेटिंग सिस्टम पाहता हा फोन Android 13 आधारित टेक्नोच्या HiOS 13 वर चालतो.
- कनेक्टिव्हिटी : डिवाइसमध्ये 5जी एसए/एनएसए, ड्युअल 4जी वीओएलटीई, वाय-फाय 802.11 802.11 बी/जी/एन/एसी, ब्लूटूथ वी5.2, जीपीएस/ग्लोनास, एनएफसी सारखे फीचर्स आणि चांगल्या ऑडियोसाठी स्टीरियो स्पिकर, एफएम रेडियोचा समावेश करण्यात आला आहे.
टेक्नो कॅमोन 20 प्रीमियर 5जी ची किंमत
टेक्नो कॅमोन 20 प्रीमियर 5जी फोन सिंगल स्टोरेजमध्ये आला आहे ज्यात 8GB रॅम + 512GB इंटरनल स्टोरेजचा समावेश करण्यात आला आहे. कंपनीनं सध्या फोनच्या किंमतीची माहिती दिली नाही, ह्याची किंमत जूनच्या अखेरच्या आठवड्यात समोर येईल. कलर ऑप्शन पाहता डिवाइस Serenity Blue आणि Dark Welkin मध्ये सादर झाला आहे.















