
मोटोरोला नवीन पावर सीरीज स्मार्टफोन Moto G Power 5G (2024) लवकरच मार्केटमध्ये एंट्री घेऊ शकतो. तसेच याआधी नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये डिवाइसचे रेंडर्स आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. तसेच, आता नवीन लीकमध्ये याचे काही आणि रेंडर समोर आले आहेत. जे ऑफिशियल रेंडरवर पाहिले गेले आहेत. चला, पुढे तुम्हाला नवीन फोटो आणि या मोबाईलची आणखी माहिती सविस्तर जाणून घेऊया.
Moto G Power 5G (2024) रेंडर्स (लीक)
- MSPowerUser द्वारे शेअर केलेल्या रेंडरनुसार मोटो जी पावर (2024) मध्ये सेल्फी सेन्सरसाठी पंच-होल कटआउट डिझाईन आणि फ्लॅट कार्नर पाहायला मिळतो.
- फोनच्या बॅक पॅनलवर कर्व स्क्वायर शेपचे मॉड्यूल आहे ज्यात ड्युअल कॅमेरा सेन्सर आणि एक एलईडी फ्लॅश लावण्यात आला आहे.
- डिवाइसच्या खाली यूएसबी टाइप-सी पोर्ट, स्पिकर आणि एक 3.5 मिमी ऑडियो जॅक दिसतो.
- वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन उजव्या साईडवर देण्यात आले आहेत.
- रिपोर्टनुसार मोटो जी पावर (2024) ला ऑर्किड टिंट आणि आउटर स्पेस सारख्या दोन कलरमध्ये लाँच केला जाऊ शकतो.
Moto G Power 5G (2024) चे स्पेसिफिकेशन्स (लीक)
- सांगण्यात आले आहे की मोटो जी पावर (2024) मध्ये 1600 X 720 पिक्सल रिजॉल्यूशन असलेला एचडी+ डिस्प्ले दिला जाऊ शकतो. परंतु अजून स्क्रीनच्या साईजचा खुलासा करण्यात आला नाही.
- एका रेंडर फोटोमुळे हे पण समजत आहे की मोटो जी पावर (2024) 30W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट करू शकतो. तसेच बॅटरीच्या साईजची माहिती अजून माहित नाही.
- तसेच आणखी स्पेसिफिकेशन्सबद्दल तुम्हाला थोडी वाट पाहावी लागणार आहे. पुढे तुम्ही याचे पूर्व मॉडेल Moto G Power (2023) चे स्पेसिफिकेशन्स पाहू शकता.
Moto G Power (2023) चे स्पेसिफिकेशन्स
- डिस्प्ले: Moto G Power (2023) मध्ये 6.5-इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्क्रीनवर 120Hz रिफ्रेश रेट सादर करण्यात आला आहे.
- प्रोसेसर: स्मार्टफोनमध्ये चांगल्या एक्सपीरियंससाठी ऑक्टा-कोर मीडियाटेक डीमेंसिटी 930 चिपसेट देण्यात आला आहे.
- स्टोरेज: Moto G Power (2023) मध्ये 6GB पर्यंत रॅम + 256GB पर्यंत इंटरनल स्टोरेजला सपोर्ट मिळतो.
- कॅमेरा: Moto G Power (2023) मधला ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप असलेला फोन आहे. यात 50MP चा प्रायमरी, 2MP चा डेप्थ आणि एक 2MP ची मॅक्रो लेन्स लावण्यात आली आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16MP चा फ्रंट कॅमेरा आहे.
- बॅटरी: स्मार्टफोनमध्ये पावर बॅकअपसाठी 5,000mAh ची बॅटरी आणि 15W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळतो.
- कनेक्टिव्हिटी: मोटो जी पावर (2023) मध्ये 11 5G बँडचा सपोर्ट, ड्यूल सिम 5जी, 4G VoLTE, WiFi, Bluetooth 5.3 आणि 3.5 एमएम हेडफोन जॅक आहे.
ऑपरेटिंग सिस्टम: ऑपरेटिंग सिस्टम पाहता मोटो जी पावर (2023) अँड्रॉइड 13 आधारित माययूएक्सवर आधारित ठेवण्यात आला आहे.














