Amazon Great Indian Festival Sale 2022 लाइव्ह झाला आहे. या दरम्यान अॅमेझॉनवरील सर्व कॅटेगरीच्या प्रोडक्ट्सवर दमदार डील मिळत आहेत. जर तुम्ही देखील दिवाळीच्या आधी तुमच्यासाठी शॉपिंग करण्याची योजना बनवत असाल तर हा सर्वात बेस्ट टाइम आहे. या आर्टिकलमध्ये आम्ही तुम्हाला अॅमेझॉन इंडियावरील टॅबलेट्सवर मिळणाऱ्या डिस्काउंटची सविस्तर माहिती देत आहोत. एंटरटेनमेंट आणि गेमिंगसाठी टॅबलेट्स बेस्ट डिवाइसेस आहेत. अॅमेझॉनवर डिस्काउंटसह SBI च्या डेबिट आणि क्रेडिट कार्डवर 10 टक्के डिस्काउंट मिळत आहे. या आर्टिकलमध्ये आम्ही तुम्हाला अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल दरम्यान मिळणाऱ्या ऑफर्सची माहिती दिली आहे.
Amazon Great Indian Festival Sale: Best Deals On Tablets
1. 2021 Apple iPad 10.2-inch
अॅप्पलचा 9th Gen iPad अॅमेझॉनवरील सेलमध्ये 23,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा अॅप्पलचा सर्वात अफोर्डेबल आयपॅड आहे. या टॅबलेटमध्ये A13 Bionic प्रोसेसर देण्यात आला आहे. अॅप्पलच्या या आयपॅडचा Wi-Fi व्हेरिएंट इतर वेळी 28,999 रुपयांची बेस प्राइसमध्ये विकला जातो. परंतु Amazon Great India Festival सेल दरम्यान हा आयपॅड डिस्काउंटनंतर 23,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. या टॅबलेटमध्ये 8MP चा वाइड कॅमेरा आणि 12MP चा अल्ट्रावाइड फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
प्राइस: 28,999 रुपये
डील प्राइस: 23,999 रुपये
2. Mi Pad 5
Mi Pad 5 एक परफेक्ट अँड्रॉइड टॅबलेट आहे, जो अॅमेझॉनच्या फेस्टिवल सेल दरम्यान 22,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. Mi Pad 5 मध्ये 10.95-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रिजोल्यूशन 2560×1600 पिक्सल असून यात Dolby Vision मिळते. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. शाओमीच्या या टॅबलेटमध्ये क्वॉड स्पिकर आणि Dolby Atmos सपोर्ट देण्यात आला आहे. यात 8,720mAh ची बॅटरी आणि Qualcomm Snapdragon 860 प्रोसेसर मिळतो. तसेच फोटोग्राफीसाठी 13MP चा रियर कॅमेरा आणि 8MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
प्राइस: 26,999 रुपये
डील प्राइस: 22,999 रुपये
3. Samsung Galaxy Tab A8
सॅमसंगचा अफोर्डेबल टॅबलेट Samsung Galaxy Tab A8 देखील बजेटमध्ये उपलब्ध झाला आहे. सेल दरम्यान सॅमसंगचा हा टॅबलेट 10,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. ज्यात 10.5-इंचाचा डिस्प्ले 1920×1200 पिक्सल रिजोल्यूशनसह देण्यात आला आहे. या टॅबमध्ये Dolby Atmos असलेले क्वॉड स्पिकर देण्यात आले आहेत. फोटोग्राफीसाठी 8MP चा प्रायमरी रियर कॅमेरा आणि 5MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो. सॅमसंगच्या या टॅबमध्ये 7,040mAh ची मोठी बॅटरी आणि UniSOC T618 प्रोसेसर देण्यात आला आहे.
प्राइस: 16,999 रुपये
डील प्राइस: 10,999 रुपये
4. Lenovo Tab P11 Plus
Lenovo Tab P11 Plus टॅबलेट अॅमेझॉनच्या फेस्टिवल सेल दरम्यान 21,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. लेनोवेच्या या टॅबची मूळ प्राइस 25,999 रुपये आहे. डिजाईन पाहता हा टॅबलेट ड्युअल टोन मेटल बॉडीसह येतो, ज्यात 11.2-इंचाचा 2K IPS डिस्प्ले देण्यात आला आहे. प्रोसेसिंगसाठी या टॅबलेटमध्ये Mediatek Helio G90T ऑक्टा कोर प्रोसेसर मिळतो. यातील 13MP चा रियर कॅमेरा आणि 8MP चा फ्रंट कॅमेरा शानदार फोटोग्राफी करतात. या टॅबमध्ये 7,700mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.
प्राइस: 25,999 रुपये
डील प्राइस: 21,999 रुपये
5. Nokia T20
Nokia T20 टॅबलेट अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल दरम्यान 12,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. साधारणतः नेकियाचा हा टॅबलेट 16,499 रुपयांमध्ये विकला जातो. या टॅबलेटच्या डिस्प्लेची साइज 10.36-इंच आहे आणि याचे रिजोल्यूशन 2K आहे. या टॅबलेटमध्ये 8,200mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच कंपनीनं दमदार ऑडिओसाठी OZO स्टीरियो स्पिकर दिले आहेत. फोटोग्राफीसाठी 8MP चा रियर कॅमेरा आणि 5MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
प्राइस: 16,499 रुपये
डील प्राइस: 12,499 रुपये
6. Samsung Galaxy Tab S6 Lite
Samsung Galaxy Tab S6 Lite चा समावेश मिड रेंजच्या बेस्ट टॅबलेट्समध्ये होतो. हा टॅब सेलमध्ये 27,200 रुपयांमध्ये विकत घेता येईल. इतर वेळी सॅमसंगचा हा टॅब खरेदी करण्यासाठी 29,999 रुपये मोजावे लागतात. सॅमसंगच्या या टॅबमध्ये 10.4-इंचाचा TFT डिस्प्ले देण्यात आला आहे. सॅमसंगचा हा टॅब Qualcomm Snapdragon 720G प्रोसेसरसह येतो. यात 8MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 5MP चा फ्रंट फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर टॅबमध्ये AKG चे दोन Dolby Atmos स्पिकर आणि 7,040mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.
प्राइस: 29,999 रुपये
डील प्राइस: 27,200 रुपये
7. Lenovo Tab M7 3rd Gen
लेनोवोचा Tab M7 3rd Gen टॅब फक्त 4,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. लेनोवोचा हा टॅबलेट ऑफ सेल पीरियडमध्ये 7,999 रुपयांमध्ये विकला जातो. टॅबमध्ये 7 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. या टॅबलेटमध्ये MediaTek MT8166 क्वॉड कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. हा Android 11 Go edition वर चालतो. टॅबलेटमध्ये 3,750mA ची बॅटरी, 2GB RAM, आणि 32GB स्टोरेज देण्यात आली आहे. फोटोग्राफीसाठी 5 MP चा रियर प्रायमरी कॅमेरा आणि 2 MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो.
प्राइस: 7,999 रुपये
डील प्राइस: 4,999 रुपये
8. Lenovo M10 FHD Plus 2nd Gen
Lenovo M10 FHD Plus टॅबलेटचा वायफाय मॉडेल देखील अॅमेझॉनच्या फेस्टिवल सेल दरम्यान 14,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. ऑफ सेल दरम्यान यास लेनेवो टॅबसाठी 18,999 रुपये द्यावे लागतील. या टॅबलेटमध्ये 10.3-इंचाचा FHD डिस्प्ले देण्यात आला आहे, जो Android 9 वर चालतो. त्याचबरोबर प्रोसेसिंगसाठी Mediatek Helio P22T प्रोसेसरची पावर देण्यात आली आहे. लेनोवोच्या टॅबमध्ये 8MP चा रियर कॅमेरा आणि 5MP चा फ्रंट कॅमेरा आहे. यात कंपनीनं 5,000mAh ची बॅटरी दिली आहे.
प्राइस: 18,999 रुपये
डील प्राइस: 14,999 रुपये
9. Samsung Galaxy Tab S8
Samsung Galaxy Tab S8 टॅबलेटचा वाय-फाय + एलटीई व्हेरिएंट अॅमेझॉनच्या फेस्टिवल सीजन सेल दरम्यान 55,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. Samsung Galaxy Tab S8 टॅबमध्ये 11-इंचाचा सिनेमॅटिक डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रिजोल्यूशन 2,560×1,600 पिक्सल आहे. हा टॅब Android 12 आणि Qualcomm Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसरसह येतो. टॅबच्या मागे 13MP + 6MP ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे तर फ्रंटला 12MP चा सेल्फी कॅमेरा मिळतो. या टॅबलेटमध्ये 8,000mAh ची बॅटरी 45W फास्ट चार्ज सपोर्टसह देण्यात आली आहे.
प्राइस: 67,990 रुपये
डील प्राइस: 55,499 रुपये
10. Samsung Galaxy Tab S6 Lite
Samsung Galaxy Tab S6 Lite टॅबलेट अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल दरम्यान फक्त 19,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. सॅमसंगच्या या टॅबलेटची मूळ किंमत 25,999 रुपये आहे. Samsung Galaxy Tab S6 Lite टॅबमध्ये 10.4-inch TFT डिस्प्ले देण्यात आला आहे. यात 4GB RAM आणि 64GB इंटरनल स्टोरेजसह Qualcomm Snapdragon 720G प्रोसेसर मिळतो. यात 8MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 5MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. सॅमसंगच्या टॅबमध्ये AKG चे Dolby अॅटमोस स्पिकर आणि 7,040mAh ची बॅटरी मिळते.
प्राइस: 25,999 रुपये
डील प्राइस: 19,999 रुपये