झाला खुलासा दिवाळीच्या आधी भारतात लॉन्च होईल रेडमी नोट 6 प्रो, रेडमी नोट 5 प्रो पेक्षा पण जास्त ताकदवान

काही आठवड्यांपूर्वी शाओमी ने रेडमी नोट 5 प्रो चा अपग्रेड वर्जन रेडमी नोट 6 प्रो अचानकपणे थाइलंड मध्ये लॉन्च केला होता. लॉन्च करणे ही काही मोठी गोष्ट नव्हती पण इतक्या प्रसिद्ध फोन गुपचुप लॉन्च केल्यामुळे चर्चा सुरू झाली. त्याचबरोबर अंदाज लावला जात आहे की लवकरच कपंनी हा भारता सहित दुसर्‍या बाजारात पण लॉन्च करणार आहे आणि आज भारतात रेडमी नोट 6 प्रो च्या लॉन्च बद्दल मोठी बातमी आली आहे.

माई स्मार्ट प्राइस ने माहिती दिली आहे की पुढील काही आठवड्यांत हा फोन लॉन्च केला जाऊ शकतो. आशा आहे की हा फोन दिवाळीच्या आधी भारतात लॉन्च होईल. त्याचबरोबर वेबसाइट ने कलर आणि मेमरी वेरियंटचा पण खुलासा केला आहे. दिलेल्या माहितीनुसार शाओमी रेडमी नोट 6 प्रो भारतात 4जीबी रॅम + 64जीबी मेमरी आणि 6जीबी रॅम + 64जीबी मेमरी सह उपलब्ध होईल. रेडमी नोट 6 प्रो मध्ये 256जीबी पर्यंतचा मेमरी कार्ड सपोर्ट आहे. भारतीय वर्जन मध्ये पण असेच असेल. तसेच हा फोन रोज गोल्ड, ब्लॅक आणि ब्लू व रेड या तीन रंगांत उपलब्ध होईल.

पण सध्या फोनच्या किंमतीची माहिती मिळाली नाही पण आशा आहे की कंपनी हा रेडमी नोट 5 प्रो च्या प्राइस सेग्मेंट मध्येच ठेवेल.

शाओमी रेडमी नोट 6 प्रो चे स्पेसिफिकेशन पाहता बॅक तसेच फ्रंट दोन्ही पॅनल्स वर डुअल कॅमेरा सेटअप मिळेल. बॅक पॅनल वर एफ/1.9 अपर्चर वाला 12-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 5-मेगापिक्सल चा सेकेंडरी कॅमेरा देण्यात आला आहे तसेच सेल्फी साठी 20-मेगापिक्सल + 2-मेगापिक्सल सेटअप आहे.

शाओमी रेडमी 6 प्रो मध्ये 19:9 आस्पेक्ट ​रेशियो असलेला 6.26-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले आहे. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 636 चिपसेट आधारित या फोन मध्ये 4,000एमएएच ची पावरफुल बॅटरी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here