टेक्नो कॅमोन 30 सीरिज भारतात घोषणा झाली आहे. कंपनीकडून TECNO CAMON 30 5G आणि TECNO CAMON 30 Premier 5G भारतात लाँच करण्यात आले आहेत. हे दोन्ही मोबाईल फोन स्टायलिश लूक तसेच पावरफुल कॅमेऱ्यासह आहेत. पुढे तुम्ही कॅमोन 30 5 जी किंमत, फिचर्स आणि स्पेसिफिकेशनची माहिती वाचू शकता.
Tecno Camon 30 5G ची किंमत
- 8GB RAM + 256GB Storage = ₹22,999
- 12GB RAM + 256GB Storage = ₹26,999
टेक्नो कॅमोन 30 5 जी फोन दोन रॅम व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. याच्या 8 जीबी रॅम मॉडेलची किंमत 22,999 रुपये तसेच 12 जीबी रॅमची किंमत 26,999 रुपये आहे. सुरुवाती सेलमध्ये या फोनवर 3 हजारांचा ICICI बँक डिस्काऊंट मिळेल ज्यानंतर या व्हेरिएंटची किंमत क्रमश: 19,999 रुपये तसेच 23,999 रुपये असेल. फोनचा सेल 23 मे पासून सुरु होईल तसेच कंपनीकडून ग्राहकांना 4999 रुपयांचे Smartwatch गिफ्ट म्हणून मोफत दिले जाईल.
Tecno Camon 30 5G स्पेसिफिकेशन
- 6.78″ 120 हर्ट्झ अॅमोलेड स्क्रीन
- मीडियाटेक डायमेंसिटी 7200
- 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज
- 100 एमपी ओआयएस रिअर कॅमेरा
- 50 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा
- 5,000 एमएएच बॅटरी
- 70 वॉट फास्ट चार्जिंग
स्क्रीन : Tecno Camon 30 5G फोन 1080 x 2436 पिक्सल रेजोल्यूशन असणाऱ्या 6.78 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेवर लाँच झाला आहे. ही एलटीपीएस अॅमोलेड स्क्रीन आहे जो 120Hz रिफ्रेश रेटवर चालते तसेच 1200nits ब्राईटनेसला सपोर्ट करते.
प्रोसेसर : हा टेक्नो फोन अँड्रॉईड 14 वर लाँच झाला आहे जो HiOS 14 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी यात 4 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला MediaTek Dimensity 7200 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 2.8GHz क्लॉक स्पीडवर चालतो. तसेच ग्राफिक्ससाठी हा फोन Mali G610 GPU ला सपोर्ट करतो.
मेमरी : टेक्नो कॅमोन 30 5 जी फोनला भारतात 8GB RAM आणि 12GB RAM वर लाँच करण्यात आले आहे. हे दोन्ही मॉडेल 256GB Storage ला सपोर्ट करतात. हा मोबाईल LPDDR4X RAM आणि UFS 3.1 Storage टेक्नॉलॉजीवर चालतो.
बॅक कॅमेरा : फोटोग्राफीसाठी Tecno Camon 30 5G ड्युअल रिअर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. याच्या बॅक पॅनलवर OIS फिचरसह 100MP मेन कॅमेरा लेन्स देण्यात आली आहे जी 2MP Depth सेन्सरसह मिळून चालते.
फ्रंट कॅमेरा : सेल्फी काढणे, रिल्स बनविणे तसेच व्हिडिओ कॉलिंग करण्यासाठी टेक्नो कॅमोन 30 5 जी फोनमध्ये 50MP Selfie कॅमेरा देण्यात आला आहे. ही autofocus camera लेन्स आहे जी ड्युअल कलर टेम्परेचर फ्लॅशसह मिळून चालते.
बॅटरी : Tecno Camon 30 5G फोन पावर बॅकअपसाठी 5,000mAh बॅटरीला सपोर्ट करतो. ही मोठी बॅटरी फास्ट चार्ज करण्यासाठी मोबाईलमध्ये 70W Super Flash फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे जी कंपनीच्या दाव्यानुसार 19 मिनिटांमध्ये फोनला 0 ते 50 टक्क्यांपर्यंत चार्ज करू शकते.
Tecno Camon 30 5G चे खास फिचर्स
- टेक्नो कॅमोन 30 5 जी फोन 3 वर्षाच्या OS तसेच 3 वर्षाच्या Security अपडेट सह येतो.
- फोनमध्ये Dolby Atmos Dual Speakers देण्यात आले आहेत जो जबरदस्त साऊंड आऊटपुट प्रदान करतो.
- हा टेक्नो फोन Memory Fusion टेक्नॉलॉजीसह आहे जो फिजिकल रॅममध्ये वचुर्अल रॅम जोडून याला 24GB RAM पर्यंतची पावर देतो.
- मोबाईल गेमिंगच्या चाहत्यांसाठी या स्मार्टफोनमध्ये Hyper Engine 5.0 देण्यात आला आहे जो गेम स्मूद व फोनला ठंड ठेवते.














