ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon India वर सध्या Realme Narzo Sale सुरु आहे. या सेल दरम्यान रियलमी नारजोचा Realme Narzo 50 5G स्मार्टफोन स्वस्तात विकत घेता येईल. Realme Narzo 50 5G फोनमध्ये 48MP ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तसेच हा फोन 5000mAh ची दमदार बॅटरी, 90Hz रिफ्रेश रेट, 6GB RAM आणि 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. जर तुम्ही देखील नवीन स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर ही चांगली संधी आहे. अॅमेझॉनवर सुरु असलेल्या सेल दरम्यान नारजोचा 5G स्मार्टफोनवर दमदार डील मिळत आहे. भारतात जियो आणि एयरटेलनं 5G सेवा सुरु केली आहे. त्यामुळे आता ग्राहक 5G स्मार्टफोनचा शोध घेत आहेत. अॅमेझॉनवर सुरु असलेल्या सेल दरम्यान Realme Narzo 50 5G स्मार्टफोन अत्यंत स्वस्तात विकत घेता येईल.
Realme Narzo 50 5G डील
Realme Narzo 50 5G स्मार्टफोन अॅमेझॉन इंडियाच्या वेबसाइटवर 13,999 रुपयांची बेस प्राइसमध्ये लिस्ट करण्यात आला आहे. Realme Narzo 50 5G स्मार्टफोनवर बँक ऑफ बडौदाच्या क्रेडिट कार्डवर 1500 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. तसेच HSBC कार्डवर 250 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. हा फोन भारतात 15,999 रुपयांची बेस प्राइसमध्ये लाँच झाला होता. हे देखील वाचा: स्वस्त 5G Phone साठी OPPO चा एकदम नवीन फोन; लाँच पूर्वीच A1 Pro चे फोटोज आणि स्पेक्स लीक
Realme Narzo 50 5G स्पेसिफिकेशन्स
Realme Narzo 50 5G स्मार्टफोनमध्ये 6.6-इंचाचा FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रिजोल्यूशन 2400×1080 पिक्सल आणि 90Hz रिफ्रेश रेट आहे. रियलमीच्या या फोनमध्ये MediaTek Dimensity 810 5G प्रोसेसर देण्यात आला आहे. Realme Narzo 50 5G स्मार्टफोनमध्ये 4GB/6GB RAM आणि 64GB/128GB स्टोरेज देण्यात आली आहे. हा फोन Android 12 वर आधारित Realme UI 3.0 वर चालतो.
रियलमीच्या या फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी, 33W Dart चार्जिंग आणि साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी 5G, 4G LTE, ड्युअल-बँड Wi-Fi, Bluetooth, GPS आणि USB Type-C पोर्ट असे ऑप्शन मिळतात. यात 3.5mm ऑडियो जॅक, Hi-Res ऑडियो आणि स्टीरियो स्पिकर मिळतात. हे देखील वाचा: गुपचूप लाँच झाला Airtel चा 30 दिवसांचा रिचार्ज प्लॅन; स्वस्तात डेटा, एसएमएस आणि कॉलिंगही
Realme Narzo 50 5G स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनमध्ये 48MP चा प्रायमरी कॅमेरा आहे तर जोडीला फोनमध्ये 2MP ची ब्लॅक अँड व्हाइट पोर्टेट लेन्स मिळते. या फोनमध्ये 8MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.
















