भारतात पोको ब्रँड अंतर्गत येऊ शकतो Redmi Note 12 5G; BIS लिस्टिंगमधून खुलासा

Redmi Note 12 5G Launch price specifications details

चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमीनं आपल्या सब-ब्रँड Redmi अंतर्गत गेल्या आठवड्यातच आपल्या होम मार्केट China मध्ये नवीन Redmi Note 12 series अंतर्गत Redmi Note 12 5G सादर केला होता, जो कंपनीच्या सर्वात स्वस्त 5G हँडसेट पैकी एक आहे. आता या स्मार्टफोनच्या भारतीय लाँचची माहिती समोर येऊ लागली आहे. 1199 युआन म्हणजे 13,700 रुपयांच्या आसपासच्या किंमतीत लाँच झालेल्या फोनबद्दल नवीन खुलासा झाला आहे की भारतात हा फोन POCO Smartphone ब्रँड अंतगर्त सादर केला जाऊ शकतो. रिपोर्टनुसार Redmi Note 12 5G सारखे स्पेसिफिकेशन असलेला पोको फोन या महिन्यात भारतात सादर केला जाईल. परंतु पोको इंडियानं मात्र याबाबत अजूनतरी कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.

इंडियन साइटवरून समोर आली माहिती

Poco स्मार्टफोन मॉडेल नंबर 22111317PI सह Bureau of Indian Standards (BIS) डेटावर स्पॉट करण्यात आला आहे. याची माहिती टिप्सटर Simranpal Singh (@simransingh931) नं ट्विट केली आहे. Gizmochina च्या बातमीनुसार Redmi Note 12 5G देखील चीनमध्ये मॉडेल नंबर 22101317C सह सादर केला गेला होता, ज्याचा शॉर्ट फॉर्म M17 आहे. तसेच POCO device देखील BIS वर मॉडेल नंबर M17 सह दिसला आहे. त्यामुळे अंदाज लावला जात आहे की चीनमध्ये आलेला रेडमी नोट 12 5जी स्मार्टफोन भारतात Poco ब्रँड अंतगर्त नव्या नावानं सादर केला जाऊ शकतो. हे देखील वाचा: iPhone 14 वर बंपर ऑफर देत आहे जियो, इथे मिळेल सर्वात स्वस्तात हा फोन

चीनमध्ये लाल्या Redmi Note 12 5G चे स्पेसिफिकेशन्स

Redmi Note 12 अँड्रॉइड 12 आधारित मीयुआय 13 वर लाँच झाला आहे ज्यात ऑक्टाकोर प्रोसेसरसह क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 4 जेन 1 चिपसेट देण्यात आला आहे. रेडमी नोट 12 स्मार्टफोनमध्ये 8 जीबी पर्यंतच्या रॅम तसेच 256 जीबी पर्यंतच्या इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. हा मोबाइल फोन LPDDR4x RAM आणि UFS 2.2 storage टेक्नॉलॉजीवर चालतो.

रेडमी नोट 12 स्मार्टफोन 2400 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.67 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच झाला आहे. पंच-होल स्टाइल ही स्क्रीन सॅमसंग अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे जी 120हर्ट्ज रिफ्रेश रेट तसेच 240हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करते. या फोनच्या डिस्प्लेमध्ये 1200निट्स पिक ब्राइटनेस, 4096लेव्हल डिमिंग, 4500000:1 कॉन्ट्रास्ट रेशियो सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

फोटोग्राफीसाठी रेडमी नोट 12 स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे जो 2 मेगापिक्सल डेप्थ सेन्सरसह चालतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी Redmi Note 12 मोबाइल फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: Samsung ला जोरदार धक्का! या कंपनीनं आणला सर्वात स्वस्त Foldable Smartphone

Redmi Note 12 ड्युअल सिम फोन आहे जो 5जी व 4जी दोन्ही नेटवर्कवर चालतो. 3.5एमएम जॅक आणि आयआर ब्लास्टर सोबतच या स्मार्टफोनमध्ये सिक्योरिटीसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे पावर बॅकअपसाठी हा स्मार्टफोन 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो. रेडमी नोट 12 आयपी53 रेटेड आहे त्यामुळे हा फोन वॉटर प्रूफ बनतो.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here