हुआवई ने काही दिवसांपूर्वी सांगितले होते की कंपनी लवकरच आपली मेट सीरीज वाढवत नवीन स्मार्टफोन लॉन्च करेल. हुआवई च्या घोषणेनंतर या फ्लॅगशिप सीरीज च्या नवीन डिवाईस मेट 20 ची वाट जगभरातील टेक प्रेमी बघत होते. काल कंपनीने लंडन मध्ये एका मोठ्या ईवेंटचे आयोजन करून एक साथ दोन हाईएंड लॉन्च केले आहेत. हुआवई ने मेट 20 आणि मेट 20 प्रो सादर केले आहेत जे वेगवेगळ्या तारखांना वेगवेगळ्या बाजारांत सेल साठी उपलब्ध होतील.
हुआवई मेट 20 कंपनीचा प्रीमियम स्मार्टफोन आहे. हा फोन 18.7:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस नॉच डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे ज्याच्या वरच्या बाजूला नॉच आहे. या फोन मध्ये 1,080 x 2,244 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.53-इंचाचा एचडीआर आरजीबीडब्ल्यू डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याला एक्स्ट्रा लेयर प्रोटेक्शन देण्यात आले आहे. फोनचे किनारे नॅरो बेजल्स वाले आहेत ज्यामुळे मेट 20 चा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 88 टक्के होतो.

हा फोन एंडरॉयड च्या सर्वात नवीन वर्जन एंडरॉयड 9.0 पाई आॅपरेटिंग सिस्टम सह सादर करण्यात आला आहे सोबतच हा हुआवई च्या ईएमयूआई 9.0 वर चालतो. प्रोसेसिंग साठी हा फोन 7एनएम टेक्नोलॉजी वर बनलेल्या हुआवई च्या सर्वात दमदार चिपसेट किरीन 980 सह सादर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे किरीन 980 जगातील सर्वात नवीन हुआवई चिपसेट आहे.
मेट 20 कंपनी ने दोन वेरिएंट मध्ये सादर केला आहे. एक वेरिएंट 4जीबी रॅम ला सपोर्ट करतो तर दुसर्या वेरिएंट मध्ये 6जीबी रॅम देण्यात आला आहे. हे दोन्ही वेरिएंट 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतात तसेच स्टोरेज माइक्रोएसडी कार्ड ने वाढवता येते.
फोटोग्राफी सेग्मेंट हुआवई मेट 20 ची सर्वात मोठी खासियत आहे. हा फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर चौकोनी आकारात कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात एलईडी फ्लॅश सोबत लेईकाचा एफ/2.2 अपर्चर वाला 16-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, एफ/1.8 अपर्चर वाला 12-मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड एंगल सेंसर तसेच एफ/2.4 अपर्चर वाला 8-मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस देण्यात आली आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन 24-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
हुआवई मेट 20 डुअल सिम सोबतच 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. कंपनी ने हा फोन आईपी 53 रेटिंग सह सादर केला आहे ज्यामुळे हा धूळ व पाणी रोधक आहे. सिक्योरिटी साठी हा फोन 3डी फेशियल रेक्ग्नेशन टेक्नॉलजीला सपोर्ट करतो तसेच पावर बॅकअप साठी या फोन मध्ये यूएसबी टाइप सी पोर्ट सह सुपरचार्ज टेक्नोलॉजी वाली 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.
हुआवई मेट 20 ग्रीन, मिडनाइट ब्लू, पिंक गोल्ड, ट्वाइलाइट आणि ब्लॅक कलर वेरिएंट मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. किंमत पाहता मेट 20 चा 4जीबी रॅम वेरिएंट 799 यूरो मध्ये लॉन्च करण्यात आला आहे तसेच फोनचा 6जीबी रॅम वेरिएंट 849 यूरो मध्ये लॉन्च झाला आहे. या दोन्ही वेरिएंट्सची किंमत भारतीय करंसी नुसार क्रमश: 68,000 रुपये तसेच 72,000 रुपयांच्या आसपास आहे.














