200 रुपयांपेक्षा कमी किंमतीती येणारे एयरटेल चे 7 बेस्ट मंथली प्लान

मागील काही वर्षात मोबाईल कॉलिंग शुल्क खूप कमी झाले आहे. तसेच डेटा शुल्क पण खूपच कमी झाले आहे. आता डेटा आणि कॉलिंगचा वापर करण्यासाठी तुम्हाला भरभक्कम शुल्क दयावे लागत नाही उलट कमी किंमतीती पण तुम्ही सर्व प्रकारच्या सेवा वापरू शकता. भारतातील नंबर एक मोबाईल सेवा देणारी कंपनी एयरटेल कडे पण कमी किंमतीती येणारे अनेक चांगले प्लान आहेत. खाली आम्ही 200 रुपयांपेक्षा कमी किंमतीती येणाऱ्या 7 चांगल्या एयरटेल टॅरिफ प्लानची माहिती दिली आहे.

एयरटेल 65
हा कंपनीचा सर्वात कमी किंमतीतील मंथली प्लान आहे. एयरटेल 65 रुपयांच्या प्लान मध्ये तुम्हाला 55 रुपयांचा टॉक टाइम मिळतो. या प्लान अंतर्गत तुमचे कॉल 1 पैसा प्रति सेकेंड दराने होतात ज्यांचा वापर तुम्ही लोकल, एसटीडी किंवा लँडलाईन फोन वर कॉल करण्यासाठी करू शकता. त्याचबरोबर 200 एमबी डेटा पण कंपनी देत आहे. फोन वर तुम्ही 2जी, 3जी या 4जी कोणत्याही प्रकारचा डेटा वापरू शकता. या प्लानची वैधता 28 दिवस आहे.

एयरटेल 95
एयरटेल कडे 95 रुपयांचा पण एक प्लान आहे जो एक महिन्यांच्या वैधते सह येतो. या प्लान मध्ये तुम्हाला फुल टॉक टाइमचा फायदा मिळतो. अर्थात 95 रुपये मध्ये तुम्हाला 95 रुपयांचा टॉक टाइम मिळेल. या प्लान अंतर्गत कॉलिंग शुल्क 30 पैसा प्रति मिनिटे होईल. तुम्ही लोकल, एसटीडी किंवा लँडलाईन वर पण कॉल करू शकता. यासोबत कपंनी 500एमबी इंटरनेट डेटा पण देत आहे.

Smartphone 5

एयरटेल 98
हा प्लान खासकरून डेटा साठी आहे. 98 रुपयांच्या या प्लान मध्ये तुम्हाला 3जीबी डेटा मिळतो. तुम्ही 2जी, 3जी किंवा 4जी कोणत्याही फोन वर याचा लाभ घेऊ शकता. पण यात तुम्हाला कोणत्याही प्रकारची कॉलिंग मिळणार नाही. एयरटेलचा हा प्लान 28 दिवसांसाठी वैध आहे अर्थात 28 दिवसांत तुम्हाला तुमचा 3जीबी डेटा संपवावा लागेल अन्यथा तो रद्द होईल.

एयरटेल 119
एयरटेलचा एक प्लान 119 रुपयांचा आहे. यात डेटा कॉलिंग आणि एसएमएस पण मिळतील. एयरटेलच्या या 119 रुपयांच्या प्लानची वैधता 28 दिवस आहे आणि यात तुम्हाला फक्त 1जीबी डेटा मिळेल. विशेष म्हणजे या अंतर्गत तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग मिळते. तुम्ही सर्व प्रकारच्या लोकल, एसटीडी आणि लँडलाईन वर अनलिमिटेड कॉल करू शकता. यासोबत 300 मोफत एसएमएस पण मिळतील. रोमिंग मध्ये पण तुम्हाला कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त शुल्क द्यावा लागणार नाही.

एयरटेल 149
जर तुम्हाला भरपूर डेटा वापरायचा असेल, अनलिमिटेड कॉलिंग सह आणि तो पण कमी खर्चात, तर मग तुमच्यासाठी एयरटेलचा 149 रुपयांचा प्लान बेस्ट आहे. या प्लान अंतर्गत तुम्हाला रोज 1जीबी डेटा मिळतो. यासोबत कंपनी 10जीबी अतिरिक्त डेटा देते. एयरटेलचा 149 प्लान 28 दिवसांसाठी वैध आहे आणि कंपनी यात रोज 100 एसएमएस मोफत देते. यासोबतच सर्व प्रकारची लोकल आणि एसटीडी कॉलिंग मोफत मिळते. रोमिंग मध्ये पण तुम्हाला कोणतेही अतिरिक्त शुल्क दयावे लागणार नाहीत.

एयरटेल 168
कंपनीचा हा प्लान पण खूपच खास आहे. यात डेटा आणि कॉलिंग सोबत तुम्हाला काही वॅस सेवा मोफत मिळतात. एयरटेलचा हा प्लान 28 दिवसांसाठी वैध आहे आणि यात कंपनी 1जीबी डेटा रोज देते. अर्थात एकूण 28जीबी डेटा तुम्हाला मिळेल. यासोबत यात सर्व प्रकारची नॅशनल आणि लोकल अनलिमिटेड कॉलिंग मोफत आहे. प्लान अंतर्गत रोमिंग फ्री आहे आणि रोज 100 एसएमएस पण मिळतील. यासोबत कंपनी अनलिमिटेड हेलो ट्यून पण मोफत मध्ये देत आहे.

Smartphone 6

एयरटेल 199
हा एयरटेलचा मंथली प्लान पॅक आहे. 199 रुपयांच्या या प्लान मध्ये तुम्हाला रोज 1.4जीबी डेटा मिळेल. एयरटेलचा हा प्लान 28 दिवसांसाठी वैध आहे. या प्लान अंतर्गत अनलिमिटेड कॉलिंग फ्री आहे आणि तुम्ही फ्री इनकमिंग आणि आउट गोइंग रोमिंग वापरू शकता. यासोबत तुम्हाला रोज 100 एसएमएस मोफत मिळतील. यातील चांगली बाब म्हणजे या प्लानचा लाभ 2जी, 3जी आणि 4जी सहित कोणत्याही डिवाइस वर घेता येतो.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here