Redmi 13 5G भारतात लाँच होत आहे. 9 जुलैच्या दुपारी 12 वाजता हा फोन भारतीय बाजारात आणला जाईल. 108MP Camera आणि 5030mAh Battery च्या ताकदीसह या फोनच्या लाँचचा कार्यक्रम खाली दिलेल्या लिंकवर लाईव्ह पाहू शकता तसेच रेडमी 13 5 जी ची किंमत, सेलची माहिती, फिचर्स आणि स्पेसिफिकेशनची माहिती जाणून घेऊया.
Redmi 13 5G भारतातील लाँचची लाईव्ह लिंक :
Redmi 13 5G किंमत इन इंडिया (लीक)
- 6GB RAM + 128GB Memory – ₹13,999
- 8GB RAM + 128GB Memory – ₹15,999
अलीकडेच रेडमी 13 5जी च्या रॅम व स्टोरेज मॉडेल सोबतच याची किंमत पण इंटरनेटवर लीक झाली होती. सांगण्यात आले आहे की फोनच्या 6 जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत 13,999 रुपये असेल. तसेच रेडमी 13 5 जी 8 जीबी रॅमची किंमत 15,999 रुपये असेल. लीकनुसार सुरुवाती सेलमध्ये कंपनी 1000 रुपयांची ऑफर पण देईल ज्याच्यानंतर इफेक्टिव किंमत क्रमश: 12,999 रुपये आणि 14,999 रुपये असेल.
Redmi 13 5G चे स्पेसिफिकेशन
- स्नॅपड्रॅगन 4 जेन 2 चिपसेट
- 8 जीबी रॅम + 128 जीबी मेमरी
- 6.6″ 90हर्ट्झ डिस्प्ले
- 108 मेगापिक्सल बॅक कॅमेरा
- 16 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
- 33 वॉट 5,030 एमएएच बॅटरी
परफॉर्मन्स : Redmi 13 5G फोन अँड्रॉईड 14 आधारित HyperOS वर लाँच होईल. तसेच प्रोसेसिंगसाठी यात 4 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला Qualcomm Snapdragon 4 Gen 2 ऑक्टा-कोर प्रोसेसर दिला जाईल जो 2.3GHz क्लॉक स्पीडवर रन करेल.
स्क्रीन : रेडमी 13 5 जी फोनला Crystal Glass Design वर लाँच केले जाईल. यात फ्लॅट पॅनल असणारा 6.6 इंचाचा पंच-होल डिस्प्ले दिला जाऊ शकतो जो 90 हर्ट्झ रिफ्रेशवर काम करेल. स्क्रीन प्रोटेक्शनसाठी कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 मिळू शकते.
कॅमेरा : फोटोग्राफीसाठी रेडमी 13 5 जी ड्युअल रिअर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल आहे, ज्याच्या बॅक पॅनलवर एलइडी फ्लॅशसह एफ/1.75 अपर्चर असलेला 108MP मेन सेन्सर आणि 2MP सेकंडरी लेन्स मिळेल. तसेच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 13MP फ्रंट कॅमेरा दिला जाईल.
बॅटरी : पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5030mAh Battery दिली जाईल. तसेच बॅटरीला फास्ट चार्ज करण्यासाठी रेडमी 13 5 जी फोनमध्ये 33W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी मिळेल.















