5000mAh च्या बॅटरीसह Samsung Galaxy M04 भारतात लाँच; दोन व्हेरिएंट आले देशात

Samsung Galaxy M04 भारतात लाँच झाला आहे. सॅमसंगनं आपल्या लो बजेट स्मार्टफोन्सच्या पोर्टफोलियोमध्ये आणखी एक फोन जोडत गॅलेक्सी ए04 भारतीय बाजारात सादर केला आहे. Samsung Galaxy M04 ची भारतातील किंमत 8,499 रुपये आहे. फोनमध्ये MediaTek Helio P35 चिपसेट, 13MP Camera, 5,000mAh Battery आणि RAM Plus सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. सॅमसंग गॅलेक्सीचे फीचर्स व फुल स्पेसिफिकेशन्स तसेच किंमत व सेलची माहिती पुढे देण्यात आली आहे.

Samsung Galaxy M04 ची किंमत

सॅमसंग गॅलेक्सी एम04 स्मार्टफोन भारतीय बाजारात दोन व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. Samsung Galaxy M04 Price 8,499 रुपये आहे तसेच या मोबाइलमध्ये 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज मिळते. या फोनच्या दुसऱ्या व्हेरिएंटमध्ये 4 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए04 स्मार्टफोन फोन 16 डिसेंबरपासून शॉपिंग साइट अ‍ॅमेझॉनवरून विकत घेता येईल. हे देखील वाचा: विवोचा स्वस्त आणि मस्त 5जी मोबाइल लाँच; 8GB RAM सह Vivo Y35 5G Phone ची एंट्री

Samsung Galaxy M04 चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.5″ HD+ डिस्प्ले
  • 4GB RAM+4GB RAM
  • MediaTek Helio P35 चिपसेट
  • Android 12 OS
  • 13MP+2MP Rear Camera
  • 5,000mAh Battery

सॅमसंग गॅलेक्सी ए04ई स्मार्टफोनचे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता, हा स्मार्टफोन 6.5 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेसह लाँच झाला आहे जो एलसीडी पॅनलवर बनला आहे. सॅमसंगनं या फोनच्या स्क्रीनला इनफिनिटी ‘व्ही’ असं नाव दिलं आहे ज्याच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला रुंद चिन पार्ट आहे. या सॅमसंग स्मार्टफोनचे डायमेंशन 164.2 x 75.9 x 9.1एमएम आणि वजन 188ग्राम आहे. हे देखील वाचा: Akshay Kumar मराठी पदार्पणासाठी सज्ज; ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ च्या सेटवरून शेयर केला नवा व्हिडीओ

Samsung Galaxy M04 अँड्रॉइड 12 आधारित वनयुआय कोर 4.1 वर लाँच झाला आहे जो ऑक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेक हीलियो पी35 चिपसेटवर चालतो. सॅमसंग गॅलेक्सी एम04 मध्ये रॅम प्लस टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे जिच्यामुळे फोनच्या इंटरनल 4जीबी रॅममध्ये एक्स्ट्रा 4जीबी रॅम जोडता येतो आणि हा फोन 8जीबी रॅमची परफॉर्मन्स देऊ शकतो. फोनची स्टोरेज 1टीबी पर्यंत मायक्रोएसडी कार्डनं वाढवता येते.

फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy M04 ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 2.2/अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जोडीला एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा सॅमसंग मोबाइल एफ/2.2 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Samsung Galaxy M04 4G Phone आहे जो ड्युअल सिम सोबतच 3.5एमएम जॅक व बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्सला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी गॅलेक्सी ए04 मध्ये फेस अनलॉक फीचर देण्यात आलं. तर पावर बॅकअपसाठी हा स्मार्टफोन 15वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 5,000एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here