जियोला मात देण्यासाठी Airtel नं सुरु केले ‘क्रिकेट पॅक’; ओटीटी सब्सस्क्रिप्शनसह आले तीन प्लॅन

block-airtel-sim-if-it-is-lost-or-stolen-know-these-easy-steps

Airtel नं आपल्या ग्राहकांना खुश करत आपल्या रिचार्ज प्लॅनमध्ये अ‍ॅमेझॉन प्राइम मेंबरशिपचं फ्री सब्सक्रिप्शन देण्याची घोषणा केली आहे. टेलीकॉम ऑपरेटर Bharti Airtel नं आपले क्रिकेट प्लॅन्स मॉडिफाय केले आहेत, ज्यामुळे ग्राहकांना प्लॅन्समध्ये प्राइम व्हिडीओची वेगळी सर्व्हिस देण्यात येत आहे. एयरटेलकडे एकूण तीन क्रिकेट प्लॅन्स झाले आहेत. पुढे आम्ही तुम्हाला Prime Video चं फ्री सब्सक्रिप्शन देणाऱ्या तीन रिचार्ज प्लॅनची माहिती दिली आहे.

Cricket Pack मध्ये शानदार कंटेंटही

तुम्हाला माहित असेल की आता प्राइम व्हिडीओवर क्रिकेटचे सामने दिसू लागले आहेत, तसेच या लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्मवर इतर अनेक प्रकारचा कंटेंट आहे, ज्याचा वापर युजर्स आपल्या मनोरंजनासाठी देखील करू शकता. आता जास्त वेळ न दवडता Airtel Cricket Pack बद्दल जाणून घेऊया. हे देखील वाचा: Doctor G OTT Release: पोट धरून हसायला लावणारा आयुष्मानचा ‘हा’ हिट चित्रपट आता येतोय ओटीटीवर

Airtel Cricket Pack

  • Airtel 3359 रुपयांचा प्लॅन
  • Airtel 699 रुपयांचा प्लॅन
  • Airtel 999 रुपयांचा प्लॅन

Airtel Recharge Plan With Amazon Prime Membership

Airtel 3359 रुपयांचा रिचार्ज: 3359 रुपयांच्या रिचार्जमध्ये 2.5 GB डेटा डेली मिळतो. तसेच, युजर्सना प्लॅनमध्ये अनलिमिटेड Local-STD कॉलिंगसह 100 SMS देखील दिले जात आहेत. इतकेच नव्हे तर या रिचार्जची वैधता 1 वर्ष म्हणजे 365 दिवस आहे. तसेच अ‍ॅडिशनल बेनिफिट्स म्हणून युजर्सना अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओचं मोबाइल सब्सस्क्रिप्शन आणि डिज्नी प्लस हॉटस्टारचं देखील मोबाइल पॅक सब्सक्रिप्शन मिळतं. इतकेच नव्हे तर प्लॅनमध्ये Wynk music, apollo 24.7 चं सब्सक्रिप्शन आणि FASTag रिचार्जवर 100 रुपयांच्या कॅशबॅकचा फायदा दिला जात आहे.

Airtel 999 रुपयांचा रिचार्ज:
या प्लॅनमध्ये युजर्सना डेली 2.5 GB डेटा, अनलिमिटेड Local-STD कॉलिंग, प्रतिदिन 100 SMS आणि 84 दिवसांची वॅलिडिटी मिळते. तसेच प्लॅनमध्ये अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओचं सब्सक्रिप्शन देखील मिळत आहे. इतकेच नव्हे तर या प्लॅनमध्ये airtel xstream चा मोबाइल पॅक मिळेल, ज्याच्या माध्यमातून Sony Liv चा कंटेंट अ‍ॅक्सेस करता येईल. तसेच, रिचार्जमध्ये Wynk music, apollo 24.7 चं सब्सक्रिप्शन आणि FASTag रिचार्जवर 100 रुपयांचा कॅशबॅक देखील मिळतो.

Airtel 699 रुपयांचा रिचार्ज: या प्लॅनमध्ये ग्राहकांना डेली 3 GB डेटा, अनलिमिटेड Local-STD कॉलिंग, प्रतिदिन 100 SMS आणि 56 दिवसांची वॅलिडिटी मिळत आहे. इतकेच नव्हे तर रिचार्जसह ग्राहकांना 56 दिवसांचे अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओचे सब्सक्रिप्शन देखील दिलं जात आहे. तसेच या प्लॅनमध्ये airtel xstream चा मोबाइल पॅक मिळत आहे, ज्याच्या मदतीनं Sony Liv वर तुम्ही कंटेंट बघू शकता.त्याचबरोबर प्लॅनमध्ये Wynk music, apollo 24.7 सब्सक्रिप्शन आणि FASTag रिचार्जवर 100 रुपयांचा कॅशबॅक देखील मिळतेजैसे लाभ मिळतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here