OPPO A3 Pro मॉडेलनंतर ओप्पोने मिड-रेंज मध्ये नवीन 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. याला चीनमध्ये OPPO A3 नावाने आणले आहे. हा मोबाईल 5 जुलैला चीनमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल. चला पुढे जाणून घेऊया की कंपनीने या फोनमध्ये काय फिचर्स जोडले आहेत.
OPPO A3 चे स्पेसिफिकेशन
- 6.67 इंचाचा अॅमोलेड स्क्रीन
- स्नॅपड्रॅगन 695 चिपसेट
- 12GB RAM+512GB मेमरी
- 50 मेगापिक्सल रिअर कॅमेरा
- 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
- 5000mAh बॅटरी
- 45W फास्ट चार्जिंग
- IP65 रेटिंग
डिस्प्ले: OPPO A3 मध्ये 6.67 इंचाची फुल एचडी+ अॅमोलेड स्क्रीन आहे. यावर 120Hz रिफ्रेश रेट, 240Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 1200 निट्स पीक ब्राईटनेस देण्यात आली आहे. तसेच सुरक्षेसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7i प्रोटेक्शन दिले आहे.
प्रोसेसिंग: हा स्मार्टफोन ऑक्टा-कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 6nm 5G SoC सह येतो. यात ग्राफिक्ससाठी एड्रेनो 619 GPU आहे. ऑपरेटिंग सिस्टम पाहता हा Color OS 14 सह Android 14 वर चालतो.
स्टोरेज आणि रॅम: डिव्हाईसमध्ये 8GB व 12GB LPDDR4X RAM सह 256GB आणि 512GB (UFS 2.2) इंटरनल स्टोरेज मिळते. यात मेमरीला मायक्रोएसडी सह 1TB पर्यंत एक्सपांड केले जाऊ शकते.
कॅमेरा: फोनमध्ये LED फ्लॅशसह ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर लावला आहे. तसेच, फोनच्या पंच-होल मध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो.
बॅटरी: फोनमध्ये 5000mAh ची जबरदस्त बॅटरी देण्यात आली आहे. जी 45W SuperVOOC फास्ट चार्जिंगचा सपोर्ट करते.
इतर: हा फोन ड्युअल सिम, USB टाइप-C ऑडियो, बॉटम-पोर्टेड स्पिकर, 5G SA/NSA, ड्युअल 4G VoLTE, Wi-Fi 6 ब्लूटूथ 5.1 सारख्या फिचर्स कोला सपोर्ट करतो. यात युजर्सना धूळ आणि पाण्यापासून वाचण्याची सुविधा पण मिळते, कारण हा फोन IP65 रेटिंगसह आहे.
OPPO A3 ची किंमत
OPPO A3 च्या 8GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 1,599 युआन (सुमारे 18,365 रुपये), 12GB + 256GB ऑप्शन 1,799 युआन (जवळपास 20,660 रुपये) आणि टॉप मॉडेल 12GB + 512GB मेमरी 2,099 युआन (जवळपास 24,110 रुपये) ठेवण्यात आली आहे. तसेच OPPO A3 ला कंपनीने ट्रांक्विलिटी ब्लॅक, ऑरोरा पर्पल आणि माऊंटेन स्ट्रीम ग्रीन सारख्या तीन रंगांमध्ये सादर केले आहे.
















