कर्व्ड डिस्प्लेसह Realme 10 Pro+ झाला भारतात लाँच

रियलमीनं आज भारतीय बाजारात रियलमी 10 प्रो सीरीज सादर केली आहे. या सीरीजमध्ये Realme 10 Pro आणि Realme 10 Pro Plus 5G असे दोन फोन आले आहेत. यातील प्रो प्लस मॉडेल 108MP कॅमेरा, 8GB RAM, MediaTek Dimensity 1080 चिपसेट, 67W फास्ट चार्जिंग आणि 5,000mAh Battery ला सपोर्ट करतो. पुढे आम्ही रियलमी 10 प्रो प्लसच्या फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि प्राइसची माहिती दिली आहे.

Realme 10 Pro Plus Specifications

रियलमी 10 प्रो प्लस स्मार्टफोन 2412 × 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.7 इंचाचा फुलएचडी+ कर्व्ड डिस्प्लेसह लाँच झाला आहे. फोनची स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे जी 120हर्ट्ज रिफ्रेश रेट तसेच 360हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करते. Realme 10 Pro+ डिस्प्लेमध्ये 1.07बिलियन कलर सपोर्ट, 100% कलर गामुट डीसीआई-पी3, 800निट्स ब्राइटनेस आणि 5000000:1 कॉट्रास्ट रेशियो सारखे फीचर्स मिळतात. हे देखील वाचा: 108MP च्या शानदार कॅमेऱ्यासह आला रियलमीचा स्वस्त फोन; इतकी आहे Realme 10 Pro ची किंमत

रियलमी 10 प्रो प्लस सर्वात नवीन अँड्रॉइड 13 ओएस आधारित रियलमी युआय 4.0 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी मीडियाटेक डिमेनसिटी 1080 चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा नवीन रियलमी मोबाइल फोन माली-जी68 जीपीयूला सपोर्ट करतो. यात 8 जीबी पर्यंत रॅमसह 256 जीबी पर्यंतची स्टोरेज आहे. वचुर्अल रॅम टेक्नॉलॉजीच्या मदतीनं 8 जीबी अतिरिक्त रॅम मिळवता येतो.

रियलमी 10 प्रो प्लस 5जी फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एफ/1.75 अपर्चर असलेला 108 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे, जोडीला एफ/2.2 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा रियलमी मोबाइल फोन एफ/2.45 अपर्चर असलेल्या 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. यातील 5,000एमएएचची बॅटरी 67वॉट फास्ट चार्जिंगमुळे फक्त 17 मिनिटांत 50 टक्के चार्ज होऊ शकते. हे देखील वाचा: जबरदस्त बातमी! भारतातील सर्वात स्वस्त 5G मोबाईल येतोय; Jio Phone 5G वेबसाइटवर लिस्ट

Realme 10 Pro Plus Price In India

Realme 10 Pro Plus चे तीन व्हेरिएंट भारतात सादर करण्यात आले आहेत. या फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 6GB RAM सह 128GB Storage देण्यात आली आहे, ज्याची किंमत 24,999रूपे आहे. तर 8GB RAM सह 128GB Storage मॉडेलची किंमत 25,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 8GB RAM आणि 256GB Storage असलेला मोठा मॉडेल 27,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. हा रियलमी मोबाइल 14 डिसेंबरपासून Dark Matter, Nebula Blue और Hyperspace Gold कलरमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here