सॅमसंगचा प्रीमियम स्मार्टफोन Samsung Galaxy S23 आतापर्यंतच्या सर्वात कमी किंमतीत विकला जात आहे. यावर पूर्ण 18,000 रुपयांचा डिस्काऊंट मिळेल. तसेच बँक ऑफर आणि EMI ऑप्शन पण उपलब्ध आहे. यामुळे जर तुम्ही एक फ्लॅगशिप डिव्हाईस खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हे तुमच्यासाठी चांगले असू शकते. चला, पुढे तुम्हाला नवीन किंमत आणि याचे संपूर्ण स्पेसिफिकेशन सविस्तर सांगतो.
Samsung Galaxy S23 ची नवीन किंमत आणि डिस्काऊंट ऑफर
- Samsung Galaxy S23 5G च्या 128GB मेमरी ऑप्शनला Samsung.com वर 64,999 रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आले आहे.
- फोनवर कंपनी चेकआउटच्या वेळी 18,000 रुपयांचा इंस्टंट डिस्काऊंट प्रदान करत आहे. ज्याच्यानंतर हा तुम्हाला 46,999 रुपयांमध्ये मिळेल.
- हा फ्लॅगशिप मोबाईल फ्लिपकार्टवर पण 46,999 रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला आहे. तसेच, अॅमेझॉन साईटवर पण किंमत जवळपास इतकी आहे.
- SAMSUNG Galaxy S23 5G च्या 256 जीबी मॉडेलवर पण ऑफर मिळत आहे आणि हा तुम्हाला 51,999 रुपयांना मिळेल.
- सॅमसंग वेबसाईट आणि फ्लिपकार्ट प्लॅटफॉर्मवर ईएमआय आणि फुल-स्वाइप केल्यावर 10 टक्क्यांची सूट मिळेल. हा सॅमसंग अॅक्सिस बँक कार्डच्या माध्यमातून दिला जात आहे.
- ब्रँड मोबाईलच्या दोन्ही मॉडेलवर जवळपास 43,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस पण देत आहे. परंतु हा तु्मच्या जुन्या फोनच्या कंडीशनवर निर्भर असेल की तुम्हाला किती किंमत मिळते.
Samsung Galaxy S23 चे स्पेसिफिकेशन
- डिस्प्ले: Samsung Galaxy S23 मध्ये 6.1 इंचाचा डायनॅमिक अॅमोलेड 2x डिस्प्ले आहे यावर 120Hz रिफ्रेश रेट, HDR10+ ला सपोर्ट आणि 1750 निट्स पीक ब्राईटनेस काला सपोर्ट मिळतो.
- चिपसेट: हा प्रीमियम मोबाईल Snapdragon 8 Gen 2 चिपसेटसह येतो.
- कॅमेरा: Samsung Galaxy S23 मध्ये तुम्हाला 50 मेगापिक्सलचा ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो. तर फ्रंटला 12 मेगापिक्सलचा सेल्फी सेन्सर लावला आहे.
- बॅटरी: सॅमसंगच्या गॅलेक्सी एस23 डिव्हाईसला 3,900mAh ची बॅटरीसह ठेवले गेले आहे. तर चार्जिंगसाठी 25W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 15W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट आहे.
- इतर: फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, ब्लूटूथ 5.3, सुरक्षेसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस 2 आणि पाणी आणि धूळीपासून वाचणारी IP68 रेटिंग देण्यात आली आहे.
- ओएस: हा लाँचच्या वेळी अँड्रॉईड 13 ऑपरेटिंग सिस्टमसह आला होता. तसेच, आता Android 14 आधारित One UI 6.1 वर चालतो.















