बाजारावर राज्य करण्यासाठी रेडमीचा मोठा प्लॅन; Redmi K60 सीरिजमध्ये येणार तीन फोन, स्पेक्स लीक

Redmi K50i

एकीकडे शाओमी आपल्या फ्लॅगशिप स्मार्टफोन सीरिज Xiaomi 13 ची तयारी करत आहे. येत्या 1 डिसेंबरला Xiaomi 13 5G आणि Xiaomi 13 Pro 5G लाँच होणार आहेत. तर दुसरीकडे शाओमीचा सब-ब्रँड रेडमी देखील आपली नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन सीरीज Redmi K60 series बाजारात आणण्याची तयारी करत आहे. रेडमी के60 सीरीज अंतगर्त Redmi K60 5G, Redmi K60E 5G आणि Redmi K60 Pro लाँच होतील, आज या रेडमी मोबाइल फोन्सचे स्पेसिफिकेशन्स देखील लीक झाले आहेत.

टिपस्टर Kacper Skrzypek नं रेडमी के60 सीरीजचे स्पेसिफिकेशन्स इंटनेटवर शेयर केले आहेत. या टिपस्टरनं सांगितलं आहे की सीरीजचे नवीन रेडमी स्मार्टफोन्स Redmi K60 5G, Redmi K60E 5G आणि Redmi K60 Pro नावाने बाजारात येतील. त्याचबरोबर Redmi K60 series मध्ये दिले जाणाऱ्या चिपसेटची माहिती देखील टिपस्टरनं शेयर केली आहे. हे तिन्ही फ्लॅगशिप मोबाइल फोन असतील जे हायएन्ड स्पेसिफिकेशन्ससह बाजारात येतील. हे देखील वाचा: भंगारापासून बनवली Electric Bike; शानदार फीचर्स परंतु किंमत परवडणारी

Redmi k60

Redmi K60 series मधील प्रोसेसर

लीकनुसार सीरीजचा बेस मॉडेल Redmi K60 5G क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेटवर लाँच होईल. तर सीरीजचा सर्वात मोठा मॉडेल Redmi K60 Pro क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8+ जेन 1 चिपसेटसह बाजारात येईल. टिपस्टरनुसार, Redmi K60E स्मार्टफोन मीडियाटेक चिपसेटसह बाजारात येईल. परंतु या चिपसेट मॉडेलचं नाव अजूनतरी समोर आलं नाही परंतु चर्चा आहे की रेडमी के60ई मध्ये मीडियाटेक डिमेनसिटी 9200 किंवा डिमेनसिटी 8200 चिपसेट मिळू शकतो.

Redmi K60 5G चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

रेडमी के60 5जी फोनबद्दल चर्चा आहे की हा मोबाइल या सीरीजचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन असेल. या स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाची 2के स्क्रीन मिळू शकते जी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह येईल. Redmi K60 5G फोन मार्केटमध्ये 12 जीबी रॅमवर लाँच होऊ शकतो. लीकनुसार रेडमी के60 67वॉट फास्ट चार्जिंग आणि 30वॉट वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करेल तसेच फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी दिली जाईल. हे देखील वाचा: वनप्लस-सॅमसंग नव्हे तर आयफोनला टक्कर देण्यासाठी येतेय Xiaomi 13 series; लाँचचा मुहूर्त ठरला

Redmi K60

Redmi K60 5G मध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो. लीकनुसार फोनच्या बॅक पॅनलवर 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर मिळेल जोडीला 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स दिली जाऊ शकते. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी रेडमी के60 5जी फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here