Samsung Galaxy A23 5G जपानच्या बाजारात झाला लाँच

Samsung Galaxy A23 5G Launch: सॅमसंग कंपनीनं टेक बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत एक नवीन मोबाइल फोन गॅलेक्सी ए23 5जी लाँच केला आहे. हा सॅमसंग स्मार्टफोन जापानी मार्केटमध्ये सादर करण्यात आला जो लो बजेटमध्ये 50MP Camera, 4GB RAM आणि MediaTek Dimensity 700 चिपसेट सारखे स्पेसिफिकेशन्स देतो. Budget 5G Smartphone सॅमसंग गॅलेक्सी ए23 5जी ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती पुढे देण्यात आली आहे.

Samsung Galaxy A23 5G Specifications

सॅमसंग गॅलेक्सी ए23 5जी स्मार्टफोन 1560 x 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 5.8 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेसह लाँच झाला आहे. फोनची स्क्रीन टीएफटी एलसीडी पॅनलवर बनली आहे जी वॉटरड्रॉप नॉच स्टाईलसह येते. फोन डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस आहेत तसेच खालच्या बाजूला रुंद चिन पार्ट देण्यात आला आहे. स्क्रीनच्या वरच्या बाजूला ‘वी’ शेप नॉच आहे. या फोनचे डायमेंशन 150 x 71 x 9.0एमएम आणि वजन 168 ग्राम आहे. हे देखील वाचा: Chup OTT Release: ‘सीता रामम’ नंतर Dulquer Salmaan चा नवा चित्रपट OTT वर; ‘चुप’ मूव्ही येतोय ऑनलाइन

50mp camera mobile Samsung Galaxy A23 5G launched know price and Specifications

Samsung Galaxy A23 5G फोन अँड्रॉइड 12 ओएस आधारित सॅमसंग वनयुआय 4.0 वर चालतो. या स्मार्टफोनमध्ये 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेक डिमेनसिटी 700 चिपसेट देण्यात आला आहे. हा सॅमसंग स्मार्टफोन 4 जीबी रॅमला सपोर्ट करतो, जोडीला 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. फोन मेमरी मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 1टीबी पर्यंत वाढवता येते.

50mp camera mobile Samsung Galaxy A23 5G launched know price and Specifications

फोटोग्राफीसाठी सॅमसंग गॅलेक्सी ए23 5जी फोन सिंगल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी Samsung Galaxy A23 5G फोन 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हा मोबाइल आयपी68 रेटेड आहे त्यामुळे हा वॉटरप्रूफ व डस्टप्रूफ बनतो. हे देखील वाचा: Matter Energy ने सादर केली गियर बॉक्स असलेली पहिली इलेक्ट्रिक बाइक; जोडीला वॉटरप्रूफ बॅटरी

Samsung Galaxy A23 5G फोन ई-सिमला सपोर्ट करतो त्यामुळे फिजिकल सिमची गरज पडत नाही. तसेच यात 3.5एमएम जॅक, ड्युअल बँड वायफाय आणि ब्लूटूथ 5.2 सारख्या फीचर्स सोबतच एनएफसीचा सपोर्ट देण्यात आला आहे. सिक्योरिटीसाठी स्मार्टफोनच्या साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर इम्बेडेड पावर बटन देण्यात आलं आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला देखील सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी सॅमसंग गॅलेक्सी ए23 5जी मध्ये 4,000एमएएचची बॅटरी मिळते.

Samsung Galaxy A23 5G Price

जापानी बाजारात सॅमसंग गॅलेक्सी ए23 5जी फोन सिंगल व्हेरिएंटमध्ये लाँच झाला आहे जो 4जीबी रॅम + 128जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. या फोनची किंमत ¥32,800 आहे जी भारतीय करंसीनुसार 17,000 रुपयांच्या आसपास रूपांतरित होते. जापानी मार्केटमध्ये Samsung Galaxy A23 5G फोन red, black आणि white कलरमध्ये लाँच झाला आहे.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here