लो बजेटमध्ये लाँच होईल itel A80, कमी किंमतीत मिळतील चांगले स्पेसिफिकेशन

स्वस्त स्मार्टफोन बनवण्यासाठी फेमस टेक ब्रँड आयटेल आपल्या ‘ए’ सीरीजच्या नवीन मोबाईलवर काम करत आहे ज्याला itel A80 नावाने लाँच केले जाईल. हा पण एक लो बजेट डिव्हाईस असेल जो ​मागच्या वर्षी लाँच झालेल्या itel A70 च्या अपग्रेडेड व्हर्जनच्या रुपामध्ये येईल. आगामी आयटेल ए 80 गुगल प्ले कंसोलवर लिस्ट झाला आहे ज्याची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

itel A80 गुगल प्ले कंसोल लिस्टिंग

  • आयटेल ए 80 स्मार्टफोनला गुगल प्ले कंसोलवर itel-A671LC मॉडेल नंबरसह लिस्ट करण्यात आले आहे.
    लिस्टिंगनुसार या मोबाईलमध्ये Unisoc T603 ऑक्टाकोर प्रोसेसर दिला जाईल जो 1.8GHz क्लॉक स्पीडवर रन करेल.
  • itel A80 ला येथे 3GB RAM सह लिस्ट करण्यात आले आहे. आशा आहे की फोन एकापेक्षा अधिक रॅम व्हेरिएंटमध्ये लाँच होऊ शकतो.
  • गुगल प्ले कंसोलवर हा आयटेल स्मार्टफोन लेटेस्ट अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम Android 14 सह आहे.
  • लिस्टिंगनुसार हा फोन 720 x 1600 पिक्सल रेजोल्यूशन असणाऱ्या HD+ स्क्रीनला सपोर्ट करेल जो 320 पिक्सल डेनसिटी असणार आहे.

डिस्प्ले : आयटेल ए 70 स्मार्टफोन 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोवर बनला आहे जो 6.6 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. ही स्क्रीन 60Hz रिफ्रेश रेट, 120Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 500 निट्स ब्राईटनेस वर चालते.

परफॉर्मन्स : प्रोसेसिंगसाठी हा मोबाईल Unisoc T603 चिपसेटला सपोर्ट करतो जो 8-कोर प्रोसेसर आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉईड 13 वर लाँच केला होता. यामध्ये 4GB रॅम आणि 256GB स्टोरेज मिळते.

कॅमेरा : फोटोग्राफीसाठी यात ड्युअल कॅमेरा सेटअप लावला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर AI टेक्नॉलॉजी असलेला 13MP प्रायमरी आणि 0.3MP सेकंडरी सेन्सर आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी हा फोन 8MP AI फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

बॅटरी : पावर बॅकअपसाठी itel A70 स्मार्टफोनमध्ये मोठी 5,000 एमएएच बॅटरी देण्यात आली आहे.

इतर फिचर्स : फोनमध्ये साईड-माऊंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, फेस अनलॉक, 3.5 एमएम ऑडियो जॅक, ब्लूटूथ v5.0, जीपीएस, यूएसबी टाईप-सी पोर्ट देण्यात आला आहे.

itel Color Pro 5G

तसेच तुम्हाला सांगतो की आयटेल एक नवीन मोबाईलवर पण काम करत आहे जो IVCO टेक्नॉलॉजीसह असेल. या टेक्नॉलॉजीमुळे फोनचा बॅक पॅनल सूर्यप्रकाशामध्ये रंग बदलेल. आयटेल कलर प्रो 5 जी फोन MediaTek Dimensity 6080 चिपसेटवर लाँच होईल, तसेच यात 6.6 इंचाचा एचडी+ एलसीडी डिस्प्ले दिला जाऊ शकतो. itel Color Pro 5G जुलैच्या शेवटी पर्यंत किंवा ऑगस्टच्या सुरुवाती दिवसांमध्ये भारतात उपलब्ध होईल.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here