Jio 5G Plans: जियोचा 5G वापरण्यासाठी कोणता प्लॅन आहे बेस्ट, पाहा यादी

Jio 5G Tariff Plans: रिलायन्स जियो (Reliance Jio) नं Mumbai, Delhi, Varanasi, Kolkata, Chennai आणि Nathdwara मध्ये आपल्या ग्राहकांसाठी 5जी सर्व्हिस (Jio 5G Service Launch) लाँच केली आहे. येत्या काही दिवसांमध्ये देशातील अन्य राज्यांमध्ये जियो 5G उपलब्ध होईल. परंतु, 5G लाइव्ह झाल्यापासून प्रत्येकाला रिलायन्स जियोच्या 5जी प्लॅनची किंमत (Jio 5G Plans Price) जाणून घ्यायची आहे आणि कमीत कमी किती रुपयांचा रिचार्ज केल्यानंतर 5G चा वापर करता येतं याची माहिती हवी आहे. आम्ही तुम्हाला आज या आर्टिकलमध्ये Jio 5G Tariff Plans बाबत माहिती देत आहोत.

239 रुपयांपासून सुरु होतील Jio 5G Plan

कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार जियो युजर्सना Jio True 5G वापरण्यासाठी 239 रुपये किंवा त्यावरील रिचार्ज करावा लागेल. म्हणजे जर तुम्ही देखील जियो 5जी वापरू इच्छित असाल तर तुमच्या जियो नंबरवर कमीत कमी 239 रुपयांचा बेस प्लॅन अ‍ॅक्टिव्ह असणं आवश्यक आहे. त्यानंतर जियो युजर Free 5G Internet वापरू शकतील. हे देखील वाचा: 15,000 रुपयांनी स्वस्त झाला Samsung चा 5G फोन; बजेटमध्ये 8GB रॅम आणि 64MP चा शानदार कॅमेरा

Jio 5G Launch Speed 1gbps Unlimited 5g Data 5g Sim

Jio 5G Tariff Plans 2023

  1. Jio चा 239 रुपयांचा प्लॅन
  2. Jio चा 249 रुपयांचा प्लॅन
  3. Jio चा 259 रुपयांचा प्लॅन
  4. Jio चा 296 रुपयांचा प्लॅन
  5. Jio चा 299 रुपयांचा प्लॅन
  6. Jio चा 395 रुपयांचा प्लॅन
  7. Jio चा 419 रुपयांचा प्लॅन
  8. Jio चा 479 रुपयांचा प्लॅन
  9. Jio चा 533 रुपयांचा प्लॅन
  10. Jio चा 666 रुपयांचा प्लॅन
  11. Jio चा 719 रुपयांचा प्लॅन
  12. Jio चा 1199 रुपयांचा प्लॅन
  13. Jio चा 1559 रुपयांचा प्लॅन
  14. Jio चा 2545 रुपयांचा प्लॅन
  15. Jio चा 2879 रुपयांचा प्लॅन
  16. Jio चा 2999 रुपयांचा प्लॅन

jio 5g works on 4g sim

Jio Rs 239 Plan

5G वापरण्यासाठी हा सर्वात स्वस्त बेस प्लॅन आहे. या रिचार्जमध्ये 1.5 जीबी डेटा डेली मिळतो. तसेच या प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता आणि एकूण 42 जीबी डेटा दिला जात आहे. रिचार्जमध्ये फ्री कॉलिंग आणि डेली 100 एसएमएसची सुविधा देखील मिळते.

Jio Rs 249 Plan

रिचार्ज प्लॅनमध्ये 23 दिवसांच्या वैधतेसह सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगची सुविधा मिळते. त्याचबरोबर डेली 100 एसएमएस आणि जियो अ‍ॅप्स व एकूण 46 जीबी डेटा (डेली 2GB डेटा) मिळतो.

Jio Rs 259 Plan

ट्रायनं फटकारल्यानंतर जियोनं हा एक कॅलेंडर मंथली प्लॅन सादर केला आहे. यात ग्राहकांना 1.5 जीबी डेटा, मंथली वैधता आणि फ्री कॉलिंग, एसएमएस आणि अ‍ॅप बेनिफिट्स मिळतात.

Jio Rs 296 Plan

या प्लॅनमध्ये युजर्सना 30 दिवसांची वॅलिडिटी मिळते. रिचार्जमध्ये 25GB डेटा, फ्री कॉलिंग, एसएमएस आणि जियो अ‍ॅप्सचे बेनिफिट मिळतात.

Jio Rs 299 Plan

रिचार्जमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगच्या सुविधेसह 28 दिवसांची वैधता, डेली 2 जीबी डेटा मिळते. तसेच, प्लॅनमध्ये 100 एसएमएस डेली आणि काही जियो अ‍ॅप्सचं सब्सक्रिप्शन देण्यात आलं आहे.

Jio चा 395 रुपयांचा प्लॅन

प्लॅनमध्ये 84 दिवस एकूण 6 जीबी इंटरनेट डेटा देखील मिळेल. डेटा व्यतिरिक्त प्लॅनमध्ये फ्री कॉलिंग आणि एकूण 100 एसएमएस डेली फ्री मिळतात.

Jio Rs 419 Plan

डेली 3 जीबी डेटासह या रिचार्जमध्ये युजर्सना एकूण 28 दिवसांची वैधता मिळते. यात तुम्हाला एकूण 84 जीबी इंटरनेट डेटा मिळतो. तसेच रिचार्जमध्ये डेली 100 एसएमएस, फ्री व्हॉइस कॉलिंग आणि काही जियो अ‍ॅप्सची सुविधा आहे.

Jio Rs 479 Plan

हा प्लॅन प्रतिदिन 1.5 जीबी डेटा बेनिफिट्ससह येतो आणि यात तुम्हाला 56 दिवसांची वैधता मिळते. तसेच, या प्लॅनमध्ये फ्री कॉलिंग आणि डेली 100 SMS पण सह जियो अ‍ॅप बेनिफिट्स देण्यात आले आहेत.

Jio Rs 533 Plan

56 दिवसांची वैधता आणि डेली 2जीबी डेटासह येणाऱ्या या रिचार्जमध्ये अनलिमिटेड फ्री कॉलिंग, डेली 100 एसएमएस रोज व काही जियो अ‍ॅप्सचं फ्री सब्सक्रिप्शन मिळतं.

Jio Rs 666 Plan

यात तुम्हाला एकूण 84 दिवसांची वैधता मिळते. त्याचबरोबर ही कंपनी रोज 100 एसएमएस, 1.5 जीबी डेटा आणि सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगसह काही जियो अ‍ॅप्सचं फ्री सब्सक्रिप्शन मिळतं.

Jio Rs 719 Plan

या प्लॅनमध्ये वैधता 84 दिवसांची मिळते. यात देखील सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगच्या सुविधेसह 100 एसएमएस डेली व काही जियो अ‍ॅप्सची सुविधा मिळेल. तसेच प्लॅनमध्ये एकूण 168 जीबी डेटा (डेली 2GB डेटा) मिळतो.

Jio 5g Plan Price In India

Jio Rs 1199 Plan

कंपनी रोज या प्लॅनमध्ये 3 जीबी इंटरनेट डेटा देत आहे. तसेच रिचार्जमध्ये 84 दिवसांच्या वैधतेसह सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगची सुविधा व डेली 100 एसएमएस आणि जियो अ‍ॅप्सची सुविधा मिळते.

Jio Rs 1559 Plan

रिचार्जमध्ये युजर्सना 336 दिवसांची वेलिडिटी मिळते. या वैधते दरम्यान युजर्सना एकूण 24जीबी डेटा मिळतो. तसेच प्लॅनमध्ये डेटा आणि वैधता व्यतिरिक्त अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ देखील दिला जात आहे.

Jio Rs 2545 Plan

दीर्घ वैधता असलेला हा प्लॅन जवळपास एक वर्ष म्हणजे 336 दिवस वापरता येतो. तसेच यात डेली 1.5 जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज 100 एसएमएससह जियो अ‍ॅप्सचं फ्री सब्सक्रिप्शन मिळतं.

Jio Rs 2879 Plan

या प्लॅनची वैधता 365 दिवस म्हणजे एक वर्ष आहे. या रिचार्जमध्ये रोज 2 जीबी डेटा दिला जात आहे. म्हणजे ग्राहकांना एकूण 730 जीबी डेटा मिळतो. प्लॅनसह जियोवरून कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगची सुविधा देखील दिली जाते.

Jio Rs 2999 Plan

Rs 2,999 Jio recharge plan मध्ये 365 दिवसांच्या वैधतेसह डेली 2.5जीबी डेटा मिळतो. प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉल, 100 SMS डेली आणि जियो अ‍ॅप्सचं फ्री सब्सक्रिप्शन मिळतं.

Jio Rs 4199 Plan

रिचार्जमध्ये 365 दिवसांची वैधता मिळते आणि तुम्हाला रोज 3 जीबी डेटा देखील दिला जातो. इतकेच नव्हे तर यात तुम्हाला कोणत्याही नेटवर्कवर देशात फ्री कॉलिंगसह जियो अ‍ॅप्स आणि डेली 100 एसएमएस मोफत मिळतात.

नोट: जियोनं 5G साठी वेगळे प्लॅन सादर केले नाहीत. म्हणजे युजर 239 रुपयांच्यावरील जियो 4G प्लॅन्सवरच 5G वापरू शकतील.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here