Honor 200 आणि Honor 200 Pro 18 जुलैला भारतात लाँच होईल. या दोन्ही मोबाईलला भारतीय बाजारात येण्याच्या आधी ब्रँडच्या ‘एक्स’ सीरीजचा नवीन स्मार्टफोन समोर आला आहे. हा डिव्हाईस Honor X60i आहे जो चीनी सर्टिफिकेशन साईट TENAA वर लिस्ट झाला आहे. या वेबसाईटवर फोनच्या फोटोसह याचे स्पेसिफिकेशन आणि किंमत पण लीक झाली आहे ज्याची माहिती पुढे वाचू शकता.
Honor X60i किंमत (लीक)
टेनानुसार ऑनर एक्स 60 आय दोन रॅम व्हेरिएंट्समध्ये लाँच होईल. फोनमध्ये 8GB RAM सह 256GB स्टोरेज दिले जाईल ज्याची किंमत 1699 युआन म्हणजे 19,500 रुपयांच्या आसपास असेल. तसेच मोबाईलचा 12GB RAM मॉडेल 256GB आणि 512GB स्टोरेजवर लाँच होऊ शकते ज्याची किंमत 1899 युआन व 2099 युआन असेल.
हा किंमत भारतीय चलनानुसार क्रमश: 21,900 रुपये आणि 24,000 रुपयांच्या आसपास आहे. हा मोबाईल 26 जुलैला चीनमध्ये Phantom Night Black, Cloud Water Blue, Moon Shadow White आणि Coral Purple कलरमध्ये उपलब्ध होईल.
Honor X60i फोटो (लीक)
Honor X60i स्पेसिफिकेशन (लीक)
- 6.7-इंचाचा फुलएचडी+ एलसीडी स्क्रीन
- 12 जीबी रॅम + 512 जीबी स्टोरेज
- मीडियाटेक डायमेंसिटी 6080
- 50 मेगापिक्सल बॅक कॅमेरा
- 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
- 35 वॉट 5,000 एमएएच बॅटरी
डिस्प्ले : Honor X60i स्मार्टफोनमध्ये 1080 x 2412 पिक्सल रेजोल्यूशन असणाऱ्या 6.7 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्ले पाहायला मिळू शकतो. ही स्क्रीन आयपीएस एलसीडी पॅनलवर बनली आहे, ज्यात पिल शेप नॉच दिले जाऊ शकते.
परफॉर्मन्स : टेनानुसार हा ऑनर मोबाईल अँड्रॉईड 14 वर लाँच होईल तसेच मॅजिक ओएस 8.0 वर काम करेल. तसेच प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 6080 ऑक्टाकोर प्रोसेसर पाहायला मिळू शकतो जो 2.4 गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीडवर रन करेल.
कॅमेरा : फोटोग्राफीसाठी Honor X60i मध्ये ड्युअल रिअर कॅमेरा दिला जाईल. याच्या बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सल मेन सेन्सर तसेच 2 मेगापिक्सल सेकंडरी लेन्स मिळू शकतो तसेच फ्रंट पॅनलवर 8 मेगापिक्सल सेल्फी सेन्सर दिला जाऊ शकतो.
बॅटरी : टेनानुसार पावर बॅकअपसाठी हा स्मार्टफोन 5,000 एमएएच बॅटरीला सपोर्ट करेल. तसेच ही मोठी बॅटरी फास्ट चार्ज करण्यासाठी मोबाईलमध्ये 35 वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी पाहायला मिळू शकते.
इतर : ऑनर एक्स 60 आय मध्ये साईड माऊंटेड फिंगरप्रिंट सेन्सर दिला जाणार असल्याची चर्चा आहे. लिस्टिंगनुसार या मोबाईलचे वजन 172 ग्रॅम असेल तसेच फोनचे डायमेंशन 161.05 x 74.55 x 7.18 एमएम असेल.















