Redmi 9 Power झाला अजून ताकदवान, 6GB रॅम वेरिएंटने भारतात घेतली एंट्री, जाणून घ्या किंमत

91मोबाईल्सला काही दिवसांपूर्वी इंडस्ट्री इंसाइडर ईशान अग्रवालने माहिती दिली होती कि Redmi 9 Power लवकरच नवीन 6GB रॅम वेरिएंटसह सादर केला जाऊ शकतो. रॅमव्यतिरिक्त फोनमध्ये कोणताही बदल केला जाणार नाही. आता कंपनीने ऑफिशियली हा फोन सादर केला आहे. फोन अमेझॉन इंडियावर आज दुपारी 12 वाजता विक्रीसाठी आला आहे. तुमच्या लक्षात असेल कि कंपनीने हा फोन गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये लॉन्च केला होता. आता रेडमी 9 पावर 4 जीबी रॅम व 64 जीबी स्टोरेज आणि 4 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज वेरिएंटसह 6 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेजमध्ये विकत घेता येईल. (redmi 9 power 6gb ram variant to launch in india soon price 12999 amazon india)

किंमत

हा वेरिएंट भारतात 12,999 रुपयांमध्ये सादर केला गेला आहे. तसेच, फोनचा बेस वेरिएंट 4 जीबी रॅमसह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो ज्याची किंमत फक्त 10,999 रुपये आहे. त्याचप्रमाणे फोनचा दुसरा वेरिएंट 4 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेजवर लाॅन्च केला गेला आहे ज्याची किंमत 11,999 रुपये आहे.

हे देखील वाचा : Xiaomi ने आणला 108MP कॅमेरा असलेला सर्वात पावरफुल 5G फोन Mi 11, Samsung ची करेल का सुट्टी?

स्पेसिफिकेशन्स

Xiaomi Redmi 9 Power मध्ये 6.53 इंचाचा मोठा फुलएचडी+ डाॅट ड्राॅप डिस्प्ले देण्यात आला आहे जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 ने प्रोटेक्टेड आहे. तसेच रेडमी 9 पावरचा डिस्प्ले 1500:1 काॅट्रास्ट रेशियो तसेच 400निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करतो. प्रोसेसिंगसाठी फोन मध्ये 2.0गीगाहर्ट्ज क्लाॅक स्पीड असलेल्या आक्टा-कोर प्रोसेसरसह क्वाॅलकाॅमचा स्नॅपड्रॅगॉन 662 चिपसेट देण्यात आला आहे. तर ग्राफिक्ससाठी रेडमी 9 पावर स्मार्टफोन एड्रेनो 610 जीपीयूला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा : Xiaomi Redmi Note 10 सीरीज भारतात होईल 4 मार्चला लॉन्च, दमदार फीचर्ससह Realme ला देईल आव्हान

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता रेडमी 9 पावर क्वाॅड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त रियर कॅमेरा सेटअप मध्ये 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ काॅलिंगसाठी हा फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Xiaomi Redmi 9 Power अँड्रॉइड 10 आधारित फोन आहे जो मीयुआय 12 सह चालतो. तसेच हा फोन फेस अनलाॅक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी रेडमी 9 पावर स्मार्टफोन 18वाॅट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 6,000एमएएचच्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो.

शाओमी रेडमी 9 पावर व्हिडीओ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here