Realme 13 Pro 5G च्या लाँच पूर्वीच प्रमुख माहिती आली समोर, फोन झाला TENAA साईटवर लिस्ट

रियलमीने आपल्या 13 प्रो सीरीजला लाँच करण्याची घोषणा केली आहे. यात येत्या Realme 13 Pro 5G आणि Realme 13 Pro+ 5G डिव्हाईस 30 जुलैला भारतात एंट्री घेणार आहेत. तसेच, बाजारात येण्याच्या आधी Realme 13 Pro मॉडेलला TENAA सर्टिफिकेशन वेबसाईटवर प्रमुख माहिती सह स्पॉट करण्यात आले आहे. चला, पुढे लिस्टिंगला सविस्तर जाणून घेऊया.

Realme 13 Pro 5G TENAA लिस्टिंगची माहिती

TENAA लिस्टिंगमध्ये आगामी रियलमी स्मार्टफोनला RMX3989 मॉडेल नंबरसह स्पॉट करण्यात आले आहे.
सर्टिफिकेशनच्या माध्यमातून समोर आलेल्या रेंडर्सवरून समजले आहे की फोनमध्ये बॅक पॅनलवर मोठा सर्कुलर कॅमेरा मॉड्यूल आणि एलईडी फ्लॅश असेल. ही माहिती ब्रँडने टिझरमध्ये फोनची एक झलक दाखवून पण कंफर्म केली आहे.
डिव्हाईसच्या उजव्या साईडवर पावर बटन आणि वॉल्यूम रॉकर असेल. फ्रंट पॅनलमध्ये पंच होल कटआऊट सह कर्व्ड अ‍ॅमोलेड स्क्रीन मिळेल.
लिस्टिंगनुसार Realme 13 Pro 5G चे डायमेंशन 161.3 x 73.9 x 8.2 मिमी आणि वजन 188 ग्रॅम सांगण्यात आले आहे.

Realme 13 Pro 5G चे स्पेसिफिकेशन

डिस्प्ले: Realme 13 Pro 5G स्मार्टफोनमध्ये 6.7 इंचाचा अ‍ॅमोलेड डिस्प्ले दिला जाऊ शकतो. यावर 2412 x 1080 पिक्सल रिजॉल्यूशन मिळू शकतो.
चिपसेट: डिव्हाईसमध्ये 2.4GHz चा बेस क्लॉक स्पीड असलेला ऑक्टा-कोर SoC मिळण्याची चर्चा आहे.
रॅम आणि स्टोरेज: मोबाईलमध्ये 6GB, 8GB, 12GB आणि 16GB रॅमसह 128GB, 256GB, 512GB आणि 1TB इंटरनल स्टोरेज दिले जाऊ शकते.
बॅटरी: Realme 13 Pro 5G मध्ये मोठ्या बॅकअपसाठी 5,050mAh ची मोठी बॅटरी दिली जाऊ शकते.
कॅमेरा: Realme 13 Pro 5G स्मार्टफोनमध्ये मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप असेल. ज्यात 50MP चा प्रायमरी कॅमेरा, 8MP चा अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा मिळू शकतो. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32MP चा सेल्फी कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे.
इतर: डिव्हाईसमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, फेस अनलॉक फिचर आणि 5G कनेक्टिव्हिटी मिळण्याची चर्चा आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here