50MP Camera आणि 4GB RAM असलेला नवीन Infinix Hot 20 5G Phone लाँच

इनफिनिक्सनं काही दिवसांपूर्वी आपला सर्वात स्वस्त 4G स्मार्टफोन Infinix Hot 20 4G टेक मार्केटमध्ये सादर केला होता. ज्याची किंमत 10 हजार रुपयांपेक्षा कमी ठेवण्यात आली होती. तर आज टेक मार्केटमध्ये कंपनीनं या स्मार्टफोनच्या 5G व्हर्जन म्हणजे Infinix Hot 20 5G लाँच केला आहे. ‘हॉट’ सीरीजमधील या नव्या 5जी इनफिनिक्स मोबाइल फोनमध्ये 50MP camera, 120Hz display, 4GB RAM आणि MediaTek Dimensity 810 प्रोसेसरसह 18W fast charging वाली 5,000mAh battery देण्यात आली आहे. पुढे आम्ही इनफिनिक्स हॉट 20 5जी फोनची किंमत व स्पेसिफिकेशन्सची संपूर्ण माहिती दिली आहे.

Infinix Hot 20 5G Specifications

इनफिनिक्स हॉट 20 5जी फोन 2408 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.6 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन आयपीएस एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 120हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 240हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करते. हा डिस्प्ले वॉटरड्रॉप नॉच स्टाईलचा वापर करून बनवण्यात आला आहे ज्यात तीन बेजल लेस कडा आणि चिन पार्ट आहे. हे देखील वाचा: कमालच झाली! फक्त 5,499 रुपयांमध्ये मिळतोय नवाकोरा TV, अशी ऑफर पुन्हा नाही

Infinix Hot 20 5G अँड्रॉइड 12 आधारित एक्सओएस 10.6 वर चालतो, ज्यात ऑक्टा-कोर प्रोसेसरसह 6नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनेलला मीडियाटेक डिमेनसिटी 810 चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा स्मार्टफोन माली जी57 जीपीयूला सपोर्ट करतो. हा इनफिनिक्स मोबाइल 4जीबी रॅमवर लाँच झाला आहे तसेच 3जीबी एक्सटेंडेड रॅमला देखील सपोर्ट करतो. तसेच या स्मार्टफोनमध्ये फेस चेंजिंग कूलिंग सिस्टम टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे.

फोटोग्राफीसाठी इनफिनिक्स हॉट 20 5जी मध्ये ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे ज्यात 50MP Samsung JN1 प्रायमरी सेन्सरसह 2 मेगापिक्सल सेकंडरी लेन्स आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी Infinix Hot 20 5G मध्ये 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे जी 18वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हे देखील वाचा: युजर्सना खुश करण्यासाठी जियोची मोठी ऑफर; या दोन प्लॅन्सवर फ्री मिळतील 6500 रुपयांचे बेनिफिट्स

Infinix Hot 20 5G Price

इनफिनिक्स हॉट 20 5जी स्मार्टफोन इंटरनॅशनल मार्केटमध्ये सिंगल व्हेरिएंटमध्ये लाँच झाला आहे. हा मोबाइल फोन 4 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो ज्याची प्राइस 180 युरो आहे. ही किंमत भारतीय करंसीनुसार 14,500 रुपयांच्या आसपास आहे. इनफिनिक्स हॉट 20 5जी फोन Racing Black, Space Blue आणि Blaster Green कलरमध्ये लाँच झाला आहे. सध्या Infinix Hot 20 5G India Launch ची कोणतिही माहिती मिळाली नाही, परंतु लवकरच हा फोन भारतीय बाजारात येऊ शकतो.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here