एचएमडीने आपल्या नवीन स्मार्टफोन Skyline ला ग्लोबल बाजारात लाँच केले आहे. हा जेन 2 रिपेयरेबिलिटीच्या क्षमतेसह येतो. म्हणजे तुम्ही स्क्रीन तुटल्यावर, बॅटरी संबंधित समस्या किंवा इतर कोणतीही समस्या तुम्ही स्वतः फोन उघडून सोडवू शकता. डिव्हाईसमध्ये काही स्क्रू लावले आहेत. ज्याच्या मदतीने हे काम सोपे होत आहे. या सुविधेसोबत ब्रँड 12 जीबी पर्यंत रॅम, 108 मेगापिक्सल रिअर कॅमेरा, 50 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा, 6.55 इंचाचा मोठा डिस्प्ले सारखे अनेक फिचर्स प्रदान करत आहे. चला, पुढे HMD Skyline ची किंमत आणि सर्व वैशिष्ट्ये सविस्तर जाणून घेऊया.
HMD Skyline चे स्पेसिफिकेशन
- 6.55 इंचाचा pOLED डिस्प्ले
- 144Hz रिफ्रेश रेट
- स्नॅपड्रॅगन 7एस जेन 2 चिपसेट
- 12GB RAM+256GB स्टोरेज
- 108 मेगापिक्सल रिअर कॅमेरा
- 50 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा
- 4600mAh बॅटरी
- 33 वॉट फास्ट चार्जिंग
- 15 वॉट वायरलेस चार्जिंग
- आयपी 54 रेटिंग
डिस्प्ले: HMD Skyline फोनमध्ये कंपनीने 6.55 इंचाचा pOLED डिस्प्ले दिला आहे. यावर एफएसडी + 1080 x 2400 पिक्सल रिजॉल्यूशन, 144Hz रिफ्रेश रेट, 1000 निट्स ब्राईटनेस, 20:9 अॅस्पेक्ट रेश्यो काला सपोर्ट मिळतो. तसेच, स्क्रीनच्या सुरक्षेसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 चे प्रोटेक्शन लावण्यात आले आहे.
चिपसेट: HMD Skyline मध्ये दमदार परफॉर्मन्ससाठी ब्रँडने स्नॅपड्रॅगन 7 एस जेन 2 चिपसेट दिली आहे. हा गेमिंगसह इतर कोणत्याही ऑपरेशन मध्ये चांगला अनुभव देण्यासाठी सक्षम आहे.
स्टोरेज: फोनमध्ये 12 जीबी पर्यंत रॅम मेमरी आणि 256 जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज आहे. याला वाढवण्यासाठी मायक्रो एसडी कार्ड स्लॉटला सपोर्ट पण आहे. ज्यामुळे 512 जीबी पर्यंत स्टोरेज वाढवता येते.
कॅमेरा: कॅमेरा फिचर्स पाहता HMD Skyline मध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात OIS आणि EIS टेक्नॉलॉजीसह 108 मेगापिक्सलचा प्रायमरी, 50 मेगापिक्सलचा टेलिफोटो लेन्स आणि 13 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड कॅमेरा मिळतो. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ब्रँडने 50 मेगापिक्सलचा सेल्फी लेन्स दिली आहे.
बॅटरी: बॅटरीच्या बाबतीत HMD Skyline 4600mAh ची बॅटरी असलेला आहे. याला फास्ट चार्ज करण्यासाठी 33 वॉट फास्ट चार्जिंग आणि 15 वॉट वायरलेस चार्जिंगला सपोर्ट मिळतो.
इतर: HMD Skyline मध्ये साईड माऊंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, ड्युअल स्पिकर, आयपी 54 रेटिंग, जेन 2 रिपेयरेबिलिटी ऑप्शन आहेत.
ओएस: ऑपरेटिंग सिस्टम पाहता स्मार्टफोन अँड्रॉईड 14 सह चालतो. ब्रँडने दोन वर्षाचे ओएस आणि 3 वर्षाच्या सुरक्षा अपडेटची सुविधा देण्याचा वादा पण केला आहे.
HMD Skyline ची किंमत
- HMD Skyline मोबाईलला ग्लोबल बाजारात दोन स्टोरेज ऑप्शनमध्ये एंट्री मिळाली आहे.
- फोनच्या बेस मॉडेल 8GB रॅम +128 जीबी व्हेरिएंटची किंमत £399.99 म्हणजे जवळपास 43,000 रुपये आहे.
- टॉप मॉडेल 12 जीबी रॅम +256 जीबी स्टोरेज £499.99 म्हणजे जवळपास 54,000 रुपयांना आहे.
- ग्राहकांना फोनसाठी ट्विस्टेड ब्लॅक आणि नीयोन पिंक सारखे दोन कलर ऑप्शन मिळतील.
















