91 मोबाईलने Xiaomi 14T सह Xiaomi 14T Pro फोनचे प्रेस रेंडर्स दाखविले होते. या रेंडर्स मध्ये फोनची फुल डिझाईनचा खुलासा झाला होता. तसेच, आता कंपनीने अधिकृतपणे Xiaomi 14T सीरीजच्या लाँचच्या तारखेवरून पडदा उठविला आहे. तसेच Xiaomi ने आपल्या 14T सीरीजच्या स्मार्टफोनची लाँचची तारीख कंन्फर्म करत घोषणा केली आहे की Xiaomi 14T आणि 14T Pro ला 26 सप्टेंबरला ग्लोबली लाँच केले जाईल. हालांकि, भारतात पण फोनची तारीख येईल, की नाही याबद्दल कोणतीही माहिती समोर आली नाही.
दमदार होतील Xiaomi 14T सीरीजचे कॅमेरा
Xiaomi Leica सह आपली रणनीतिक भागेदारी शेअर केली आहे. दोन्ही नवीन फोन गेल्यावर्षी Xiaomi 13T सीरीज डिव्हाईस प्रमाणे Leica लेन्स आणि कलर ऑप्टिमायजेशन सह इंजीनिअर केले जाईल. Xiaomi ने Leica कलर प्रोफाईल मध्ये नवीन बदलांना इशारा करत “सिनेमॅटिक आर्टिस्ट्री आणि ह्यूमैनिस्टिक फोटोग्राफी” ची पण पुष्टी केली आहे.
Xiaomi 14T सीरीजची डिझाईन
अलीकडेच आम्हाला मिळालेल्या रेंडर्सनुसार Xiaomi 14T आणि Xiaomi 14T प्रो फोनमध्ये फ्लॅट आणि पंच होल डिस्प्ले मिळेल. तसेच, स्क्रीनच्या वरती मध्ये एक पातळ-सी लाईन दिसत आहे, जिथे फोनचे स्पिकर ग्रिल असेल. याव्यितिरिक्त मागे शानदार लूक देण्यासाठी ग्लास पॅनल असेल. इतकेच नव्हे तर या फोनमध्ये वरती मध्ये चौकोर कॅमेरा ब्रॅकेट आहे, जिथे तीन कॅमेऱ्यासह एक फ्लॅश लाईट असेल. तसेच लाइका कॅमेराचा लोगो पण आहे.
तसेच, साईड पॅनलमध्ये तुम्हाला पावर आणि वॉल्यूम बटन पाहायला मिळतील. परंतु शाओमी 14 टी मॉडेलचा बॅक पॅनल थोडा जास्त कर्व आहे. असे बोलले जात आहे की फोनमध्ये कंपनीने 3 डी कर्व्ड ग्लासचा वापर केला आहे.
Xiaomi 14T आणि Xiaomi 14T प्रो चे स्पेसिफिकेशन (संभाव्य)
जिथे पर्यंत फोनच्या स्पेसिफिकेशनची गोष्ट आहे, तो आतापर्यंत Xiaomi 14T आणि Xiaomi 14T Pro बद्दल अनेक लीक आले आहेत. चला पुढे तुम्हाला लीक स्पेसिफिकेशनची माहिती देत आहोत.
- डिस्प्ले: 14 टी मध्ये तुम्हाला 6.67-इंचाची स्क्रीन मिळेल. हा फोन 1.5 के AMOLED डिस्प्लेसह येईल. तसेच फोनमध्ये 144Hz हर्ट्स स्क्रीन रिफ्रेश रेटला सपोर्ट तुम्हाला मिळेल. आतापर्यंत जी माहिती मिळाली आहे, त्यानुसार 4,000 निट्स पीक ब्राईटनेस आणि HDR10, HDR10+ आणि Dolby Vision सारखे ऑप्शन पाहायला मिळतील.
- प्रोसेसर: प्रोसेसर पाहता हा फोन MediaTek Dimensity 8300-Ultra चिपसेटवर येऊ शकतो. परंतु प्रो मॉडेलमध्ये कंपनी MediaTek Dimensity 9300-Ultra प्रोसेसर देऊ शकतो. तसेच, फोनमध्ये 12GB रॅमसह 256GB इंटरनल स्टोरेज मध्ये उपलब्ध होऊ शकतो.
- कॅमेरा: त्याचबरोबर फोनमध्ये 50MP चा मेन कॅमेरा असेल. कंपनी यासाठी 1/1.56 इंचाचा IMX906 सोनी सेन्सरचा उपयोग करू शकते. त्याचबरोबर 50MP लाईका टेलीफोटो लेन्स आणि 12MP लाईका अल्ट्रा-वाईड अँगल कॅमेरा मिळेल. तसेच, सेल्फीसाठी या फोनमध्ये 32MP चा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो.
- ओएस: कंपनी याला अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम 14 वर सादर करू शकते.
- कलर ऑप्शन: Xiaomi 14T Pro ग्रे, ब्लू आणि ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये येऊ शकतो, तर Xiaomi 14T चार कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध होतील, सारखे की ग्रे, ब्लू, ब्लॅक आणि ग्रीन.
Xiaomi 14T सीरीजची किंमत (लीक)
परंतु लाँच कार्यक्रमामध्ये अजून दोन आठवडे वेळ आहे, मात्र Xiaomi 14T सीरीजच्या किंमतची माहिती ऑनलाईन लीक झाली आहे, जो थर्ड-पार्टी रिटेलर लिस्टिंगच्या सौजन्याने समोर आली आहे. वेनिला 14T ला 12 GB रॅम आणि 256 GB स्टोरेजसह असेल, ज्याची किंमत €578 (जवळपास 53,000 रुपये) असेल. हा चार रंगामध्ये पण उपलब्ध आहे: टायटन ब्लू, टायटन ब्लॅक, टायटन ग्रे आणि लेमन ग्रीन.
प्रीमियम Xiaomi 14T Pro ला याच्या 12/512 GB ची किंमत €800 (जवळपास 75,000 रुपये) असेल. तसेच, हा पण Xiaomi 14T प्रमाणे टायटन ग्रे, टायटन ब्लॅक आणि टायटन ब्लू रंगामध्ये उपलब्ध होईल.















