OPPO A3x 5G चे फोटो आणि स्पेसिफिकेशन आले समोर, चायना टेलीकॉम साईटवर झाला लिस्ट

ओप्पो येत्या काही दिवसांमध्ये आपल्या A3-सीरीजचा विस्तार करणार आहे. यानुसार OPPO A3x 5G मॉडेल चीनमध्ये सादर होण्याची शक्यता आहे. परंतु अजून ब्रँडने अधिकृत घोषणा केली नाही, याआधी डिव्हाईस चीनच्या टेलिकॉम साईटमध्ये स्पॉट झाला आहे. ज्यात फोटो आणि प्रमुख स्पेसिफिनची माहिती मिळाली आहे. चला, पुढे मोबाईलबाबत सविस्तर जाणून घेऊया.

OPPO A3x 5G ची डिझाईन (चायना टेलीकॉम लिस्टिंग)

  • चायना टेलीकॉम साईटमध्ये ओप्पोचा नवीन स्मार्टफोन PKD130 मॉडेल नंबरसह स्पॉट झाला आहे. यात फोनचे नाव OPPO A3x 5G पण दिसत आहे.
  • लिस्टिंगनुसार OPPO A3x 5G स्मार्टफोनमध्ये मागील बाजूस प्लास्टिक मटेरियलचा उपयोग दिसत आहे. बॅक पॅनलवर ओवल शेप कॅमेरा मॉड्यूल आहे. ज्यात ड्युअल कॅमेरा आणि रिंग एलईडी फ्लॅश लावला आहे.
  • फोनच्या फ्रंट पॅनलमध्ये पंच होल नॉच डिझाईन पाहायला मिळते. ज्यात सेल्फी कॅमेरा असेल.
  • अगामी डिव्हाईस चीनमध्ये स्टारलाईट पांढऱ्या, डार्क नाईट पर्पल आणि क्लाऊड फेदर पिंक सारख्या तीन रंगामध्ये उपलब्ध होऊ शकतो.
  • OPPO A3x 5G चे डायमेंशन 165.79 x 76.14 x 7.68 मिमी आणि वजन 185.7 ग्रॅम सांगण्यात आले आहे.

OPPO A3x 5G चे स्पेसिफिकेशन (चायना टेलिकॉम लिस्टिंग)

  • डिस्प्ले: चायना टेलीकॉम लिस्टिंगनुसार OPPO A3x 5G मध्ये 6.67 इंचाचा एलसीडी एचडी प्लस डिस्प्ले दिला जाऊ शकतो. यावर 1600 x 720 पिक्सल रिजॉल्यूशन असू शकते.
  • स्टोरेज आणि रॅम: डेटा स्टोर करण्यासाठी डिव्हाईसमध्ये तीन स्टोरेज ऑप्शन समोर आले आहेत. ज्यात 4GB रॅम +128, 6GB +128GB आणि 8GB +256GB स्टोरेजचा समावेश आहे.
  • कॅमेरा: कॅमेरा फिचर्स पाहता OPPO A3x 5G मध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. ज्यात 32 मेगापिक्सलचा प्रायमरी आणि 2 मेगापिक्सलचा सेकंडरी मॅक्रो या डेप्थ लेन्स सामिल केली जाऊ शकते. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी युजर्सना 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे.
  • बॅटरी: फोनला चालविण्यासाठी डिव्हाईसमध्ये 5100mAh ची मोठी बॅटरी लावली जाऊ शकते.
  • इतर: युजर्सना डिव्हाईसमध्ये यूएसबी टाईप सी पोर्ट, 3.5mm हेडफोन जॅक, लाईट सेन्सर, ग्रेविटी सेन्सर, एल्टीट्यूड सेन्सर, डिस्टन्स सेन्सर आणि डायरेक्शन सेन्सर सारखे अनेक फिचर्स मिळू शकतात.
LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here