9 हजारांच्या बजेटमध्ये स्वदेशी कंपनीचा शानदार स्मार्टफोन; 5000mAh बॅटरीसह Lava Blaze NXT लाँच

स्वदेशी स्मार्टफोन निर्माता कंपनी Lava काही महिन्यांपूर्वी आपला 4G स्मार्टफोन Lava Blaze 4G सादर केला होता. तर आता कंपनीनं या स्मार्टफोनचा अपग्रेड व्हर्जन Lava Blaze NXT भारतात सादर केला आहे,ज्याची किंमत 9,299 रुपये ठेवण्यात आली आहे. दोन्ही स्मार्टफोन्सच्या डिजाईनमध्ये कंपनीनं जास्त बदल केलेला नाही. नवीन फोन Lava Blaze NXT भारतात MediaTek Helio G37 प्रोसेसर, 4GB RAM आणि 5000mAh च्या बॅटरीसह सादर करण्यात आला आहे. चला जाणून घेऊया फोनची किंमत,, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन.

Lava Blaze NXT Specifications

  • 6.5 इंच HD+ डिस्प्ले
  • 5000mAh बॅटरी
  • MediaTek Helio G37 प्रोसेसर
  • 4GB RAM
  • 13MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप

Lava Blaze NXT मध्ये 6.5 इंचाचा HD+ IPS डिस्प्ले देण्यात आला आहे. प्रोसेसिंगसाठी कंपनीनं MediaTek च्या Helio G37 प्रोसेसरचा वापर केला आहे. सोबत 4GB RAM आणि 64GB स्टोरेज देण्यात आली आहे. तसेच वर्चुअल रॅम फिचरच्या मदतीनं 3GB अतिरिक्त रॅमची ताकद मिळवता येईल, म्हणजे एकूण 7GB रॅमची ताकद हा फोन देऊ शकतो. फोनची स्टोरेज देखील मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येते. हा लावा फोन अँड्रॉइड 12 वर चालतो. हे देखील वाचा: Samsung Mobile Phone झाले स्वस्त! 8 सॅमसंग स्मार्टफोन्सवर होणार मोठी सेव्हिंग, आत्ताच करा बुक

फोटोग्राफीसाठी Lava Blaze NXT फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यातील प्रायमरी कॅमेरा 13MP चा आहे. अन्य सेन्सर्सची माहिती अजूनतरी मिळाली नाही. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 8MP चा फ्रंट कॅमेरा सेन्सर मिळतो.

पावर बॅकअपसाठी फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी यूएसबी टाइप-सी पोर्टनं चार्ज करता येते. सिक्योरिटीसाठी फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि कनेक्टिव्हिटीसाठी 3.5mm ऑडियो जॅक 4G VoLTE, ड्युअल बँड वाय-फाय, ब्लूटूथ 5.0 आणि जीपीएस असे फीचर्स मिळतात. हा फोन ग्लास फिनिशसह सादर करण्यात आला आहे, फोनचे वजन 178 ग्राम आहे आणि याची जाडी 8.28mm आहे. हे देखील वाचा: भारतातील सर्वात फास्ट इलेक्ट्रिक बाइक लाँच; सिंगल चार्जवर धावेल 307km

Lava Blaze NXT Price

Lava Blaze NXT चा एकच व्हेरिएंट बाजारात आला आहे. ज्याची किंमत 9,299 रुपये ठेवण्यात आली आहे, जो 4GB RAM + 64GB स्टोरेजसह येतो. हा फोन तुम्ही ग्रीन आणि रेड कलर ऑप्शनमध्ये विकत घेऊ शकता. हा फोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वर लिस्ट झाला आहे परंतु कंपनीनं फोनची सेल डेट मात्र सांगितली नाही.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here