Bank Mitra Apply Online: दहावी पास देखील बँक मित्र बनून करू शकतात कमाई; जाणून घ्या प्रोसेस

Bank Mitra Apply Online: बँकांना आपल्या सेवांचा विस्तार शहरांसह खेड्यापाड्यांमध्ये देखील करायचा आहे. परंतु अशा ठिकाणी पोहोचण्यासाठी पुरेशी संसाधने बँकांकडे नाहीत. या कामात बँक मित्र बँकांना मदत करतात. जर तुम्ही देखील कमाईचं साधन शोधत असाल तर बँक मित्र तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. बँक मित्र बनून तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय), पंजाब नॅशनल बँक (पीएनबी), सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडौदा सारख्या पब्लिक सेक्टरच्या बँकांशी जोडले जाऊन कमाई करू शकता.

बँक मित्र म्हणजे पंतप्रधान जन धन योजनेतील बँकिंग कॉरस्पॉन्डेंट आहेत, ज्यांना अशा भागांमध्ये बँकिंग सुविधा देण्याची जबाबदारी दिली जाते जिथे बँकेच्या शाखा नाहीत किंवा एटीएमही उपलब्ध नाही. बँक मित्र गावोगावी जाऊन लोकांना बँकिंग सुविधा जसे की खात्यात पैसे जमा करणे आणि काढण्याची सुविधा देतात. हे देखील वाचा: RBI Digital Rupee: E-Rupee म्हणजे काय? कसा करायचा वापर? जाणून घ्या इथे

<कोण बनू शकतं बँक मित्र

दहावी पास आणि बेसिक कम्यूटरची ओळख असलेली कोणतीही 18 वर्षांवरील व्यक्ती बँक मित्र बनू शकते. रिटार्यड बँक कर्मचारी, शिक्षक आणि माजी सैनिक बँक मित्र बनू शकतात. तसेच केमिस्ट आणि किराणा दुकानदार, पेट्रोल पंप, बचत गट, पीसीओ, सर्व्हिस सेंटर इत्यादी देखील बँक मित्र म्हणून काम करू शकतात.

अर्ज कसा करायचा

बँक मित्र बनण्यासाठी ऑनलाइन अर्ज करता येतो. यासाठी www.egram.org/apply वर लॉगइन करून ऑनलाइन फॉर्म भरावा लागेल.

फॉर्ममधील बँकांमधील तुमच्या विभागात आलेली बँक निवडा आणि काळजीपूर्वक माहिती वाचा.

ऑनलाइन अर्ज पूर्ण झाल्यावर तुमचा अर्ज फर्स्ट वेरिफिकेशनसाठी पाठवला जाईल.

वेरिफिकेशन पूर्ण झाल्यावर तुम्हाला ईमेलद्वारे माहिती मिळेल. त्यानंतर तुमचा अर्ज बँक आणि बिजनेस कॉरस्पॉन्डेंटला पाठवला जाईल.

बिजनेस कॉरस्पॉन्डेंट तुमची रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरु करेल आणि दरम्यान तुम्ही निवडलेल्या शाखेत तुम्हाला फिजिकल डॉक्यूमेंट्स वेरिफिकेशनसाठी जावे लागेल.

आवश्यक कागदपत्रं

बँक मित्र बनण्यासाठी तुम्हाला ओळख पटवण्यासाठी पॅन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट किंवा वोटर आयडी कार्डची प्रत लागेल. त्याचबरोबर 10वीची मार्कशीट, चारीत्यच दाखल, पासपोर्ट साइज फोटो, बँक पासबुक किंवा कॅन्सल चेक द्यावा लागेल. तसेच विजेचं बिल, टेलीफोन बिल, राशन कार्ड आणि आधार कार्डची एक कॉपी देखील आवश्यक आहे.

आवश्यक वस्तू

बँक मित्र बनण्यासाठी अर्जदाराकडे कंप्यूटर किंवा लॅपटॉप, इंटरनेट, प्रिंटर-स्कॅनर असणं आवश्यक आहे. तसेच तुमच्याकडे एक ऑफिस असणं आवश्यक आहे. हे देखील वाचा: कोणत्या बँडवर चालतंय तुमचं Jio, Airtel, BSNL सिम! काही क्लिक्समध्ये मिळवा माहिती

बँक मित्र बनल्यावर मिळणारे फायदे

बँक मित्राला दर महिन्याला कमीशन स्वरूपात 2000 रुपये ते 5000 रुपये मिळतात. बँक मित्राला खाते उघडणे, पैसे जमा करणे, क्रेडिट कार्ड आणि बिल पेमेंट अशा कामांवर कमीशन मिळतं. तसेच पंतप्रधान जनधन योजनेंतर्गत 1.25 लाख रुपयांचे कर्ज मिळते, ज्यात सामान खरेदी करण्यासाठी 50 हजार रुपये, कामासाठी 25,000 रुपये आणि वाहन खरेदी करण्यासाठी 50,000 रुपयांचे कर्ज मिळते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here