Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसरसह iQOO 11 आणि iQOO 11 Pro चीनमध्ये लाँच

Vivo च्या सब-ब्रँड iQOO नं आपली नवीन iQOO 11 5G सीरीज लाँच केली आहे, या सीरिजमध्ये iQOO 11 आणि iQOO 11 Pro 5G स्मार्टफोन सादर करण्यात आले आहेत. हे फोन कंपनीनं आपल्या होम मार्केट चीनमध्ये सादर केले आहेत. भारतीय बाजारात या फोनसाठी ग्राहकांना जानेवारी 2023 पर्यंतची वाट बघावी लागेल. या सीरिजच्या दोन्ही फोन मध्ये अनेक खास फीचर्स देण्यात आलेत आहेत, ज्यात Qualcomm च्या लेटेस्ट फ्लॅगशिप चिपसेट Snapdragon 8 Gen 2 SoC चा समावेश आहे. चला जाणून घेऊया iQOO 11 Series Price, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सची माहिती.

iQOO 11 सीरीजची किंमत आणि उपलब्धता

iQOO 11 स्मार्टफोन पाहता हा डिवाइस 5 रॅम/स्टोरेज व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. डिवाइसच्या 8GB RAM/128GB स्टोरेजची किंमत CNY 3,799 (जवळपास Rs 44,900), 8GB RAM/256GB स्टोरेजची किंमत CNY 4,099 (जवळपास Rs 48,500), 12GB RAM/256GB स्टोरेज मॉडेलची प्राइस CNY 4,399 (जवळपास Rs 52,100), 16GB RAM/256GB मॉडेलची प्राइस CNY 4,699 (जवळपास Rs 55,600) आणि 16GB RAM/512GB स्टोरेजची किंमत CNY 4,999 (जवळपास Rs 59,200) आहे. हे देखील वाचा: मोफत करा Mobile Repairing Course, महिन्याला होऊ शकते 25 ते 30 हजारांची कमाई

तसेच Pro मॉडेल बद्दल बोलायचं झालं तर कंपनीनं हा फोन तीन रॅम/स्टोरेज मॉडेलमध्ये सादर केला आहे. iQOO 11 Pro च्या 8GB RAM/256GB storage मॉडेलची किंमत CNY 4,999 (जवळपास Rs 59,200), 12GB RAM/256GB storage व्हेरिएंटची किंमत CNY 5,499 (जवळपास Rs 65,100) आणि 16GB RAM/512GB storage मॉडेलची किंमत CNY 5,999 (जवळपास Rs 71,900) आहे.

iQOO 11 सीरीजचे स्पेसिफिकेशन्स

iQOO 11 स्मार्टफोनमध्ये यात 6.78-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 144Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. तसेच डिवाइसमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 2 SoC सोबतच 16GB RAM आणि 512GB स्टोरेज मिळते. पावर बॅकअपसाठी फोनयामध्ये 120W फास्ट चार्जिंगसह 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. फोटोग्राफीसाठी iQOO 11 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये 50MP primary, 13MP ultrawide आणि 8MP macro कॅमेरा आहे. तसेच सेल्फीसाठी फोनमध्ये 16MP कॅमेरा मिळतो. हे देखील वाचा: रेडमी देखील देत नाही इतक्या स्वस्तात कर्व्ड डिस्प्ले; शानदार Realme 10 Pro+ झाला भारतात लाँच

iQOO 11 Pro मध्ये 6.78 इंचाचा QHD+ curved AMOLED पॅनल देण्यात आला आहे. ज्याचा रिफ्रेश रेट 144Hz आहे. तसेच डिवाइसमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 2 SoC ची पावर मिळते. पावर बॅकअपसाठी फोनमध्ये 4,700mAh ची बॅटरी 50W वायरलेस व 200W वायर्ड फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह देण्यात आली आहे. तसेच हा फोन 16GB RAM सोबत 512GB स्टोरेजला सपोर्ट करतो. फोटोग्राफीसाठी प्रो मॉडेलमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा, 50MP सेकंडरी कॅमेरा आणि 13MP पोर्टेट लेन्स देण्यात आली आहे. तर सेल्फीसाठी फोनमध्ये 16MP चा कॅमेरा देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here