विवो आपल्या वी 40 सीरीजचा विस्तार करत आहे. यानुसार Vivo V40 SE 4G ग्लोबल स्तरावर Czech Republic मध्ये लाँच झाला आहे. तसेच याआधी एसी मॉडेलला 5G टेक्नॉलॉजीसह आणले गेले होते. तसेच, आता आणि पण कमी किंमतीमध्ये 4 जी सादर करण्यात आला आहे. नवीन डिव्हाईसमध्ये युजर्सना 120Hz रिफ्रेश रेट असलेला अॅमोलेड डिस्प्ले, 50 मेगापिक्सल कॅमेरा, व्हर्च्युअल टेक्नॉलॉजीसह 16GB पर्यंत रॅम, 80 वॉट फास्ट चार्जिंग सारखे अनेक फिचर्स मिळतील. चला, पुढे किंमत आणि सर्व वैशिष्ट्ये सविस्तर जाणून घेऊया.
Vivo V40 SE 4G चे स्पेसिफिकेशन
- डिस्प्ले: Vivo V40 SE 4G डिव्हाईसमध्ये समोरच्या बाजूला 6.67 इंचाचा E4 अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. यावर फुल HD+ रिजॉल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट आणि 1800 निट्सचा पीक ब्राईटनेस काला सपोर्ट मिळतो. फोनमध्ये सुरक्षेसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर पण आहे.
- चिपसेट: विवो वी 40 एसई 4 जी मध्ये स्नॅपड्रॅगन 685 चिपसेट देण्यात आला आहे.
- स्टोरेज आणि रॅम: मोबाईलमध्ये 8 जीबी एलपीडीडीआर 4 एक्स रॅम, 128 जीबी + 256 जीबी यूएफएस 2.2 इंटरनल स्टोरेज आहे. त्याचबरोबर 8 जीबी पर्यंत व्हर्च्युअल रॅम आणि मायक्रोएसडी कार्ड स्लॉटची सुविधा आहे.
- कॅमेरा: सेल्फीसाठी विवो वी 40 एसई 4 जी मध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा लावला आहे. तर बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सलचा मेन कॅमेरा, 2 मेगापिक्सलचा बोकेह कॅमेरा आणि एक फ्लिकर सेन्सर मिळतो.
- बॅटरी आणि चार्जिंग: Vivo V40 SE 4G स्मार्टफोनमध्ये 80W रॅपिड चार्जिंगला सपोर्टसह तसेच 5,000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.
- ओएस: हा नवीन विवो 4 जी डिव्हाईस अँड्रॉईड 14 आधारित फनटच ओएस 14 वर आधारित आहे.
- इतर: डिव्हाईसमध्ये ड्युअल सिम, 4G VoLTE, 2.4GHz–5GHz वाय-फाय, ब्लूटूथ 5.0, GPS, NFC आणि USB-C पोर्ट आणि पाणी आणि धूळीपासून वाचणारी IP54 रेटिंग आहे.
- वजन आणि डायमेंशन: डिव्हाईसचे डायमेंशन 163.17 x 75.81 x 7.79 मिमी आणि वजन 186 ग्रॅम आहे. तर वेगन लेदर असलेला पर्पल एडिशन 7.99 मिमी आणि 191 ग्रॅम आहे.
Vivo V40 SE 4G ची किंमत
- विवो वी 40 एसई 4 जी मॉडेलला दोन मेमरी व्हेरिएंट मध्ये लाँच करण्यात आले आहे.
- फोनचे बेस मॉडेल 8 जीबी रॅम+ 128 स्टोरेज 4,999 CZK म्हणजे जवळपास 17,500 रुपयांना आहे. तर 256 जीबी असणाऱ्या टॉप मॉडेलची किंमत अजून समोर आली नाही.
- Vivo V40 SE 4G मोबाईल क्रिस्टल ब्लॅक आणि लेदर पर्पल सारखे दोन रंगामध्ये उपलब्ध आहे.















