50MP कॅमेरा, 12 जीबी रॅम, 5000mAh बॅटरीसह चीनमध्ये लाँच झाला Honor X60i स्मार्टफोन

ऑनरने आपल्या X50i च्या अपग्रेड स्तरावर नवीन मोबाईल Honor X60i लाँच केला आहे. याला होम मार्केट चीनमध्ये एंट्री मिळाली आहे. हा 6.7 इंचाचा अ‍ॅमोलेड डिस्प्ले, ऑक्टाकोर Dimensity 6080 चिपसेट, 12 जीबी रॅम, 5000mAh बॅटरी सारखे फिचर्स आणि जबरदस्त लूकसह आला आहे. चला, पुढे सर्व स्पेसिफिकेशन आणि किंमतीची माहिती जाणून घेऊया.

Honor X60i चे स्पेसिफिकेशन

  • डिस्प्ले: Honor X60i स्मार्टफोनमध्ये 6.7 इंचाचा अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे यावर 90Hz रिफ्रेश रेट, 2412×1080 रिजॉल्यूशन, 3420Hz PWM डिमिंग, 2000 निट्स ब्राईटनेस, 16.7 मिलियन कलर आणि DCI-P3 वाईड कलर गमट काला सपोर्ट आहे.
  • चिपसेट: नवीन ऑनर मोबाईल ऑक्टाकोर MediaTek Dimensity 6080 प्रोसेसरसह आहे. हा 2.4GHz पर्यंतच्या हाय क्लॉक स्पीड देतो. यात ग्राफिक्ससाठी माली-G57 MC2 जीपीयू आहे.
  • स्टोरेज आणि रॅम: Honor X60i स्मार्टफोन तीन स्टोरेज मध्ये सादर झाला आहे. ज्यात 12 जीबी पर्यंत रॅम +512 पर्यंत इंटरनल स्टोरेजचा समावेश आहे. त्याचबरोबर 8 जीबी व्हर्च्युअल रॅमला सपोर्ट देण्यात आला आहे. ज्यामुळे तुम्ही 20 जीबी रॅम पर्यंत स्पीडचा वापर करता येईल.
  • कॅमेरा: फोनमध्ये बॅक पॅनलवर LED फ्लॅशसह ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात 50MP चा एचडी मेन कॅमेरा आणि 2MP चा मॅक्रो लेन्स लावली आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फ्रंटला 8MP ची लेन्स आहे.
  • बॅटरी: पावर बॅकअपसाठी नवीन ऑनर फोनमध्ये 5000mAh ची मोठी बॅटरी आहे. ही बॅटरी फास्ट चार्ज करण्यासाठी 35W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट दिला आहे.
  • इतर: Honor X60i मध्ये 3.5mm हेडफोन जॅक, IP64 रेटिंग, इन-स्क्रीन फिंगरप्रिंट सेन्सर, ब्लूटूथ 5.1, ड्युअल सिम स्लॉट, 4G, 5G, स्मार्ट कॅप्सूल आणि ड्युअल MIC नॉईज रिडक्शन सारखे फिचर्स मिळतील.
  • ऑपरेटिंग सिस्टम: Honor X60i फोन लेटेस्ट Android 14 आधारित Honor MagicOS 8.0 वर आधारित ठेवला गेला आहे.
  • वजन आणि डायमेंशन: स्मार्टफोन 7.18mm पातळ आहे तसेच याचे वजन 172 ग्रॅम आहे.

Honor X60i ची किंमत

  • Honor X60i चीनमध्ये तीन मेमरी व्हेरिएंट मध्ये सादर झाला आहे. ज्यात 8GB रॅम +256GB स्टोरेज 1,399 युआन म्हणजे जवळपास 16,160 रुपयांना आहे.
  • मिड मॉडेल 12GB रॅम +256GB मेमरी पर्याय 1,599 युआन म्हणजे जवळपास 18,480 रुपयांमध्ये मिळेल.
  • टॉप मॉडेल 12GB रॅम +512GB व्हेरिएंटची किंमत 1,799 युआन म्हणजे भारतीय किंमतीनुसार जवळपास 20,700 रुपये ठेवण्यात आली आहे.
  • Honor X60i कोरल पर्पल, क्लाऊड ब्लू, मून शॅडो व्हाईट आणि मॅजिक नाईट ब्लॅक कलरमध्ये येतो.
  • फोन प्री आर्डरसाठी उपलब्ध आहे. तर याची सेल 2 ऑगस्टपासून अधिकृत वेबसाईट आणि JD.com वर सुरु होईल.
LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here