या रिचार्ज प्लॅनला तोड नाही! Jio चा 31 दिवसांचा Calendar Month Plan; फ्री कॉलिंग आणि डेटासह अनेक फायदे

Jio Calendar Month Plan: देशातील सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी जियो (Reliance Jio) आपल्या ग्राहकांना खुश करण्यासाठी प्रत्येकवेळी काही तरी नवीन घेऊन येत असते. कंपनीनं काही दिवसांपूर्वी 28 दिवसांच्या वैधतेचं झंझट संपवलं हॉट आणि एक खास प्लॅन (Recharge Plan) सादर केला होता. या प्लॅनमध्ये 28 नव्हे तर पूर्ण 30 आणि 31 दिवस म्हणजे एका महिन्याची वॅलिडिटी ऑफर देण्यात आली. भारतीय युजर्स अशा प्लॅन्सची मागणी गेले कित्येक दिवस करत होते. त्यानुसार रिलायन्स जियोनं आपला हा Calender Month Plan (Monthly Recharge Plan) बाजारात आणला आहे. या प्लॅनची किंमत 259 रुपये आहे जो संपूर्ण महिनाभर म्हणजे 31 दिवसांपर्यंत सक्रिय राहतो.

Jio Calender Month Plan

रिलायन्स जियोनं आपल्या या प्लॅनला ‘कॅलेंडर मंथ प्लॅन’ असं नावं दिलं आहे आणि नावातूनच सर्व माहिती मिळते. या प्लॅनची वैधता ठरलेली नाही, म्हणजे जेवढ्या दिवसांचा महिना असेल तेवढे दिवस हा प्लॅन वापरता येईल. जर एखाद्या महिन्यात 30 दिवस असतील तर हा Jio plan 30 दिवसांची वॅलिडिटी देईल आणि जर 31 दिवसांचा महिना असेल तर रिलायन्स जियोच्या या प्लॅन प्लॅनमध्ये 31 दिवसांची वॅलिडिटी मिळेल. त्यामुळे ज्या तारखेला तुम्ही रिचार्ज कराल त्याच तारखेला पुढील महिन्यात नवीन रिचार्ज करावा लागेल. हे देखील वाचा: स्वस्त Jio 5G Phone सोबतच लाँच होईल खिशाला परवडणारा JioBook लॅपटॉप; अंबानींनी दाखवली झलक

Jio Rs 259 Plan

Jio Calender Month Plan ची किंमत 259 रुपये ठेवण्यात आली आहे. हा प्लॅन रिलायन्स जियोच्या सर्वात किफायतशीर मोबाइल प्लॅन्स पैकी एक आहे. 259 रुपयांच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये 30 दिवस किंवा 31 दिवसांच्या वॅलिडिटीनुसार जियो प्रीपेड युजर्सना लाभ मिळतील. या प्लॅनमध्ये रोज 1.5GB 4G इंटरनेट डेटा मिळेल.

30 दिवसांच्या महिन्यात युजर्सना एकूण 45 जीबी इंटरनेट डेटा मिळेल तसेच 31 दिवसांच्या महिन्यात जियो मोबाइल युजर 46.5 जीबी 4जी इंटरनेट डेटा वापरू शकतील. दिवसाचा दीड जीबी डेटा संपल्यावर देखील मोबाइल नंबरवर इंटरनेट कनेक्टिव्हिटी अ‍ॅक्टिव्ह असेल आणि जियो ग्राहक 64केबीपीएसीच्या स्पीडनं इंटरनेट वापरू शकतील. इथे वर्षभराचा हिशोब केल्यास जियो युजर्स (259 x 12) = 3108 रुपयांमध्ये 365 दिवसांची वॅलिडिटी मिळवू शकतात ज्यात एकूण 547.5 जीबी डेटा मिळेल. हे देखील वाचा: वायरविना मिळणार 2 जीबीपीएसचा भन्नाट स्पीड; अशाप्रकारे Jio AirFiber देईल वेगवान 5G इंटरनेट

259 रुपयांच्या या जियो कॅलेंडर मंथ प्लॅनमध्ये कंपनीकडून अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग दिली जात आहे. हे कॉल लोकल व एसटीडी नंबरवर पूर्णपणे फ्री असतील तसेच रोमिंग दरम्यान मोफत कॉलिंग करता येईल. तसेच ग्राहकांना रोज 100 एसएमएस देखील मिळतील. या 259 रुपयांचा प्लॅनचा रिचार्ज करणाऱ्या युजर्सना Jio TV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud सारख्या सर्व Jio Apps चा मोफत वापर करता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here