उरले फक्त दोन दिवस! BSNL च्या ‘या’ रिचार्ज प्लॅन्सवर मिळतोय 75 GB डेटा अगदी मोफत

भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सरकारी टेलीकॉम कंपनी BSNL नं आपल्या ग्राहकांसाठी एक शानदार ऑफर सादर केली होती. BSNL युजर्सकडे मोफत 75GB डेटा मिळवण्याची शानदार संधी आहे. कंपनी आपल्या दोन मोठी वैधता असलेल्या रिचार्ज (BSNL Recharge) वर युजर्सना 75GB डेटा फ्री देत आहे. परंतु कंपनीची ही जबरदस्त ऑफर 31 ऑगस्ट पर्यंतच वैध आहे. म्हणजे या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे फक्त दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे जर तुम्हाला देखील Free 75GB Data चा लाभ घ्यायचा असेल तर लवकरात लवकर पुढील प्लॅननं रिचार्ज करून घ्या.

BSNL Offer Free Data

बीएसएनएल आपल्या दोन लोकप्रिय वार्षिक प्लॅनसह 75GB डेटा मोफत देत आहे. हे प्लॅन 2399 रुपये आणि 2999 रुपयांचे आहेत. या दोन्ही प्लॅनमध्ये डेली 3जीबी पर्यंत डेली डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगसह अनेक लाभ मिळतात. हे देखील वाचा: मोठी बातमी: BSNL चे मोबाइल टॉवर खरेदी करणार Jio; सरकारी कंपनी विकणार 13,000 पेक्षा जास्त Telecom Tower

BSNL Rs 2999 Recharge

BSNL च्या 2999 रुपयांच्या रिचार्जमध्ये युजर्सना 365 दिवसांची वैधता मिळते. याचा अर्थ असा की एकदा रिचार्ज केल्यास तुम्हाला वर्षभर पुन्हा रिचार्ज करण्याची गरज पडणार नाही. तसेच या प्लॅनमध्ये युजर्सना डेली 3GB डेटा दिला जात आहे. जोडीला उपरोक्त ऑफर अंतर्गत युजर्सना मोफत 75GB data एक्स्ट्रा मिळेल. त्यांवर ग्राहकांना वर्षभरात एकूण 1170GB डेटा वापरता येईल. तसेच या प्लॅनमध्ये व्हॉइस कॉलिंग अनलिमिटेड मिळते. तुम्ही कोणत्याही नेटवर्कवर कितीही बोलू शकता. तसेच या रिचार्जमध्ये प्रतिदिन 100 SMS दिले जातात. फक्त कॉलिंग, डेटा आणि एसएमएस बेनिफिट्स या प्लॅनमध्ये दिले जात नाहीत तर यात PRBT आणि Eros Now चा 30 दिवसांचा अ‍ॅक्सेस देखील मोफत दिला जात आहे. हे देखील वाचा: 200 रुपयांत 3 महिन्यांच्या रिचार्ज; BSNL चे 90 दिवसांचे बेस्ट रिचार्ज पॅक, कॉलिंगसह डेटा फ्री

BSNL चा 2399 रुपयांचा प्लॅन

BSNL च्या 2399 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये देखील 365 दिवसांची वैधता मिळते. त्यामुळे वर्षभर डेटा, कॉलिंग आणि एसएमएसची चिंता राहत नाही. युजर्सना या प्लॅनमध्ये डेली 2GB डेटा दिला जातो. तसेच युजर्स संपूर्ण वैधतेसाठी कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग करू शकतात. तसेच रोज ग्राहकांना 100 एसएमएस देखील मिळतात. या प्लॅनमध्ये ओटीटी बेनिफिट्स देऊन कंपनीनं ग्राहकांच्या करमणुकीची काळजी घेतली आहे. या प्लॅनमध्ये 30 दिवसांचे इरोज नाउचे फ्री सब्सक्रिप्शन मिळत आहे. तसेच रिचार्जमध्ये देखील युजर्सना 75 GB डेटा एक्सट्रा मिळतो. अशाप्रकारे ग्राहकांना एकूण 803 GB डेटा वापरण्यासाठी मिळेल. त्याचबरोबर प्लॅनमध्ये 30 दिवसांचे PRBT बेनिफिट मिळतात.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here