108MP कॅमेऱ्यासह फक्त 13,499 रुपयांमध्ये लाँच झाला POCO M6 Plus 5G फोन, मिळेल 1500 रुपयांची सूट

पोकोने आज भारतीय बाजारपेठेत आपल्या उत्पादन पोर्टफोलिओचा विस्तार करत नवीन 5G मोबाईल सादर केला आहे. कंपनीतर्फे POCO M6 Plus 5G फोन भारतात लाँच करण्यात आला आहे, जो 108MP कॅमेरा, 16GB रॅम (8GB + 8GB) आणि 5,000mAh बॅटरीच्या ताकदीसह सुसज्ज आहे. तुम्ही Poco M6 Plus ची किंमत, फिचर्स आणि स्पेसिफिकेशन यांचा तपशील पुढे वाचू शकता.

POCO M6 Plus 5G ची किंमत

  • 6GB रॅम + 128GB मेमरी – ₹13,499
  • 8GB रॅम + 128GB मेमरी – ₹14,499

Poco M6+ 5G फोन दोन रॅम व्हेरिएंट्समध्ये लाँच करण्यात आला आहे. त्याच्या बेस मॉडेलमध्ये 6 जीबी रॅम दिली गेली आहे, ज्याची किंमत 13,499 रुपये आहे आणि मोठा त्याचा व्हेरिएंट 8 जीबी रॅमला सपोर्ट करतो, ज्याची किंमत 14,499 रुपये आहे. हे दोन्ही व्हेरिएंट्स 128GB स्टोरेजला सपोर्ट करतात. या स्मार्टफोनची विक्री 5 ऑगस्टपासून शॉपिंग साईट फ्लिपकार्टवर सुरू होईल, जिथे तो आईस सिल्व्हर, मिस्टी लॅव्हेंडर आणि ग्रेफाईट ब्लॅक रंगांमध्ये खरेदी करता येईल.

POCO M6 Plus 5G फोनवर कंपनीकडून 1000 रुपयांची बँक ऑफर दिली जाईल. तर 6GB रॅम व्हेरिएंटवर 500 रुपयांचे अतिरिक्त डिस्काऊंट कूपन देखील मिळेल. या ऑफर नुसार दोन्ही व्हेरिएंट्सची प्रभावी किंमत अनुक्रमे 11,999 रुपये आणि 13,499 रुपये असेल. Poco 5G फोनवर 1,000 रुपयांची ही सूट मिळवण्यासाठी तुम्हाला SBI, HDFC किंवा ICICI बँक कार्ड वापरावे लागतील.

POCO M6 Plus 5G चे स्पेसिफिकेशन

  • 6.79 इंचाचा एफएचडी+ 120 हर्ट्स डिस्प्ले
  • क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 4 जेन2 एई प्रोसेसर
  • 8 जीबी रॅम + 128जीबी मेमरी
  • 8 जीबी व्हर्चुअल रॅम
  • 108 मेगापिक्सेल ड्युअल रिअर कॅमेरा
  • 13 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
  • 33 वॉट 5,030 एमएएच बॅटरी

कॅमेरा

POCO M6+ 5G फोनच्या बॅक पॅनलवर फोटोग्राफीसाठी ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप प्रदान करण्यात आला आहे ज्यामध्ये एफ/1.75 अपर्चर असलेली 108 मेगापिक्सेलची मुख्य लेन्स उपलब्ध आहे. हा Samsung ISOCELL HM6 सेन्सर आहे, जो 3x इन-सेन्सर झूम तंत्रज्ञानाला सपोर्ट करतो. यासोबतच बॅक पॅनलवर 2 मेगापिक्सेलची मॅक्रो लेन्स मिळत आहे. त्याचवेळी सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये एफ/2.45 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा दिला गेला आहे.

स्क्रीन

POCO M6 Plus 5G फोन 2400 x 1080 पिक्सेल रिझोल्यूशन असलेल्या 6.79 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेवर लाँच करण्यात आला आहे. ही स्क्रीन एलसीडी पॅनेलवर बनवली आहे, जी 120हर्ट्झ रिफ्रेश रेट, 240हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेट आणि 550निट्स ब्राईटनेसला सपोर्ट करते. स्क्रीनचे संरक्षण करण्यासाठी त्यावर कॉर्निंग गोरिल्ला 3 चे संरक्षण देण्यात आले आहे. डिस्प्लेमध्ये लो ब्लू लाईट आणि एल1 वाईडवाईन यांचा सपोर्ट देखील आहे.

परफॉर्मन्स

नवीन Poco M6+ 5G स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 4 जेन2 एई प्रोसेसरवर लाँच करण्यात आला आहे. हा एक मोबाईल चिपसेट आहे जो 4नॅनोमीटर फॅब्रिकेशन्सवर बनवला गेला आहे. फोनच्या 8-कोर प्रोसेसरमध्ये 2.3Gहर्ट्झ क्लॉक स्पीड असलेले दोन कॉर्टेक्स-ए 78 कोर आणि 1.95GHz क्लॉक स्पीड असलेले 6 आर्म कॉर्टेक्स-A55 कोर उपलब्ध आहेत.

मेमरी

POCO M6 Plus 5G स्मार्टफोन भारतात 6GB रॅम आणि 8GB रॅम वर लाँच करण्यात आला आहे. या मोबाइलमध्ये 8GB व्हर्च्युअल रॅम तंत्रज्ञान आहे, जे डिव्हाईसच्या फिजिकल रॅम सोबत मिळून 16GB रॅम पर्यंतची शक्ती प्रदान करत आहे. हा स्मार्टफोन 128GB UFS 2.2 इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो, ज्यासोबत 1टीबी मायक्रोएसडी कार्ड सपोर्ट देखील उपलब्ध आहे.

ऑपरेटिंग सिस्टिम

Poco M6 Plus 5G फोन अँड्रॉईड 14 वर लाँच करण्यात आला आहे, जो HyperOS सोबत मिळून काम करतो. ब्रँडने त्याच्या नवीन डिव्हाईसला 2 वर्षांच्या ओएस अपडेटसह सादर केले आहे. जे त्याला आत्ता अँड्रॉईड 16 साठी तयार करते. त्याचवेळी मोबाईलसोबत चार वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्सही उपलब्ध आहेत. POCO M6+ मध्ये 36 महिन्यांचा लॅग फ्री अनुभव देण्याचा कंपनीचा दावा आहे.

बॅटरी

पॉवर बॅकअपसाठी नवीन POCO M6 Plus 5G फोनला 5,030mAh च्या बॅटरीने सुसज्ज करुन बाजारात लाँच करण्यात आले आहे. त्याचवेळी ही मोठी बॅटरी जलद चार्ज करण्यासाठी स्मार्टफोनमध्ये 33W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानही दिले गेले आहे.

POCO M6 Plus 5G चे फिचर्स

  • POCO M6 Plus 5G स्मार्टफोन IP53 प्रमाणित आहे जो त्याला पाणी आणि धुळीपासून सुरक्षित ठेवतो.
  • या फोनमध्ये 3.5mm हेडफोन जॅक आणि सिंगल स्पीकर दिला गेला आहे.
  • सुरक्षिततेसाठी पोको फोन साईड माऊंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फिचर्सला सपोर्ट करतो.
  • कनेक्टिव्हिटी पर्यायांसाठी यात ब्लूटूथ 5 आणि 5GHz वाय-फाय उपलब्ध आहे.
  • यात आयआर ब्लास्टर सेन्सर देखील आहे, ज्यामुळे फोनचा उपयोग टीव्हीच्या रिमोटप्रमाणेही करता येईल.
  • जर 5G क्षमतेबद्दल बोलायचे झाल्यास Poco M6 Plus मध्ये 7 5G बँड्स मिळत आहेत.
LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here