स्वस्त असेल का iPhone 14? कधी होणार लाँच? जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि किती मॉडेल येणार बाजारात

दरवर्षी सप्टेंबरमध्ये Apple द्वारे एका इव्हेंटचं आयोजन केलं जातं ज्यात कंपनी आपली नवीन आयफोन सीरीज को सादर करते आणि या इव्हेंटबद्दल काही महिन्यांपूर्वीच चर्चा सुरु होते. यावेळी कंपनी iPhone 14 लाँच करणार आहे आणि या फोनबद्दल चर्चाना उधाण आलं आहे. गेल्यावर्षी प्रमाणे यावेळी देखील कंपनी चार मॉडेल सादर करू शकते, अशी चर्चा आहे. पंरतु आतापर्यंत जे लीक आले आहेत त्यानुसार यावेळी मिनी व्हर्जन येणार नाही. तसेच यावेळी iPhone 14 आणि प्रो मॅक्स मॉडेलमध्ये खूप फरक असू शकतो. नवीन आयफोनबाबत याच चर्चेबाबत आज आम्ही हा रिपोर्ट तयार केला आहे जिथे तुम्ही iPhone 14 सीरीजच्या लाँच डेट, स्पेसिफिकेशन, भारतीय किंमत आणि मॉडेलसह सर्व माहिती मिळवू शकता.

iPhone 14 लाँच डेट

गेली अनेक वर्ष अ‍ॅप्पल आपली नवीन आयफोन सीरीज सप्टेंबरमध्ये लाँच करत आहे आणि यावेळी देखील हीच परंपरा कायम राहील अशी आशा आहे. परंतु कंपनीनं अधिकृतपणे अजूनतरी तारखेची घोषणा केली नाही परंतु iPhone 14 सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात लाँच होऊ शकते, अशी चर्चा आहे. iHacktu ileaks नावाच्या एका टिपस्टरनं माहिती दिली आहे की, कंपनी येत्या 13 सप्टेंबर ग्लोबल लाँच करू शकते आणि तेव्हाच ही सीरिज भारतात देखील उपलब्ध होईल. परंतु यात कोणत्याही अधिकृत सोर्सचा हवाला देण्यात आलेला नाही.

तसेच टिपस्टरनं या फोनच्या सेल डेटची देखील माहिती दिली आहे. त्यानुसार iPhone 14 चे सर्व मॉडेल 23 सप्टेंबरपासून विक्रीसाठी उपलब्ध होतील. परंतु या लीकनंतर काही दिवसांनंतर माहिती आली आहे की नवीन आयफोन सीरीज जरी 13 सप्टेंबरला लाँच झाली तरी सेल डेट पुढे ढकलली जाऊ शकते. Nikkei Asia च्या एका रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला होता की चीनमध्ये लॉकडाउन असल्यामुळे आयफोनच्या निर्मितीला उशीर होत आहे त्यामुळे हे फोन्स विक्रीसाठी येण्यास थोडा वेळ लागू शकतो. त्यांनी असं देखील म्हटलं आहे की अन्य मॉडेलची विक्री सुरु होईल परंतु iPhone 14 Pro Max चा सेल सुरु होण्यास वेळ लागेल. त्यामुळे कंपनी iPhone 14 ची लाँच डेट अर्थात 13 सप्टेंबर देखील पुढे ढकलली जाऊ शकते.

iPhone 14 सीरीजचे सर्व मॉडेल

गेल्यावर्षी कंपनीनं iPhone 13 सीरीजमध्ये चार मॉडेल सादर केले होते ज्यात iPhone 13 सह iPhone 13 मिनी, iPhone 13 प्रो आणि iPhone 13 प्रो मॅक्स होते. परंतु मिळालेल्या माहितीनुसार iPhone 13 मिनीची विक्री खूप चांगली झाली नाही. त्यामुळे कंपनीनं यावर्षी हा मॉडेल काढण्याची तयारी केली आहे. त्यामुळे iPhone 14 सीरिजमध्ये iPhone 14 Plus किंवा Max, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max असे मॉडेल मिळू शकतात. जुन्या मॉडेलच्या यावेळी नवीन आयफोनमध्ये तुम्हाला खूप बदल दिसतील, अशी देखील चर्चा आहे.

iPhone 14 ची भारतातील किंमत (price in India)

आयफोन महाग असतात असे सर्वच म्हणतात. परंतु यावेळी जे रिपोर्ट आले आहेत त्यानुसार तुम्ही म्हणाल iPhone 14 खूपच महाग आहे. यामागे दोन कारणे आहेत. पाहिलं कारण म्हणजे यावेळी कंपनी आपला मिनी व्हर्जन काढून टाकत आहे. त्यामुळे बेस मॉडेलची किंमत वाढेल. तसेच डॉलरची किंमत वाढल्यामुळे फोनच्या किंमतीत जास्त फरक पडेल. लिक्सनुसार यावेळी किंमतीत 10,000 रुपयांपर्यंतची वाढ होऊ शकते. iPhone 13 ची आरंभिक किंमत 79,900 रुपये होती. तर यावेळी iPhone 14 ची भारतीय किंमत 89,900 रुपये असू शकते. तर iPhone 14 Max कंपनी Rs 99,900 रुपयांमध्ये सादर करू शकते. iPhone 14 Pro ची किंमत 1,29,900 आणि iPhone 14 Pro Max 1,39,900 रुपयांमध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

iPhone 14 ची डिजाइन

दरवेळी लोकांना कंपनी यावेळी मोठा बदल करेल असं वाटतं, परंतु तसं होत नाही. छोट्या-मोठ्या डिजाईन चेंजसह कंपनी नवीन फोन सादर करते. यावेळी देखील iPhone 14 सीरिजमध्ये तुम्हाला जास्त काही बदल दिसणार नाही. विशेष म्हणजे बेस मॉडेलमध्ये जवळपास त्याच डिजाइनची पुनरावृत्ती केली जाईल. आयफोन 14 कंपनी बॉक्स डिजाइनमध्ये सादर करू शकते ज्यात एज खूप फ्लॅट असतील.. मोठ्या मॉडेलमध्ये एक दोन बदल दिसू धकतात खासकरून यावेळी नवीन डिस्प्ले डिजाईन मिळू शकते.

iPhone 14 चे स्पेसिफिकेशन

डिस्प्ले: iPhone 14 च्या मॉडेलमध्ये तुम्हाला यावेळी OLED डिस्प्ले मिळू शकतो जसा आयफोन 12 आणि आयफोन 13 मध्ये दिसला होता. परंतु यावेळी कंपनी iPhone 14 आणि iPhone Plus या Max मॉडेलमध्ये देखील ProMotion डिस्प्लेचा वापर करू शकते. तसेच बेस मॉडेलमध्ये देखील तुम्हाला हाय रिफ्रेश रेट मिळू शकतो.

iPhone 14 आणि iPhone 14 Plus किंवा Max मॅक्स मॉडेलमध्ये 6.1-इंचाचा LTPS OLED डिस्प्ले 90Hz स्क्रीन रिफ्रेश रेटसह मिळेल. ज्यात वेरियेबल रिफ्रेश रेट आणि ऑलवेज ऑन डिस्प्ले सारखे फीचर्स नसतील. तर मोठे मॉडेल iPhone 14 Pro आणि Pro Max मध्ये कंपनी 6.7-इंचाचा LTPO OLED डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटसह देऊ शकते.

कॅमेरा: आयफोनमध्ये जरी कमी मेगापिक्सलचा कॅमेरा असला तरी पिक्चर क्वॉलिटी जबरदस्त असते आणि कंपनी एक बेंच मार्क सेट करते. नवीन सीरीजमध्ये कॅमेऱ्यावर नजर टाकायची झाल्यास तुम्हाला बेस मॉडेलमध्ये 12MP चा ड्युअल कॅमेरा मिळू शकतो. सोबतीला 12MP चा फ्रंट कॅमेरा असेल.बातमीनुसार मेन कॅमेऱ्यात तुम्हाला जुन्या मॉडेलच्या तुलनेत कोणताही बदल दिसणार नाही. तसेच टिपस्टर Ming-Chi Kuo नुसार सेल्फी कॅमेऱ्याचा अपर्चर अपग्रेड होईल. कंपनी f/1.9 अपर्चरचा वापर करू शकते जो ऑटो फोकस फीचरसह येईल. जुन्या मॉडेलमध्ये f/2.2 चा फिक्स्ड फोकस अपर्चर देण्यात आला होता.

मोठ्या मॉडेलमध्ये कॅमेरा खूप अपग्रेड होईल. यावेळी कॅप्सूल शेप पंच होल तुम्हाला स्क्रीनवर मिळेल. यावेळी कॅमेऱ्यासह Face ID dot projector दिला जाऊ शकतो. तसेच Ross Young नुसार कंपनी डिस्प्लेमध्ये Face ID साठी हार्डवेयर देऊ शकते त्यामुळे नवीन डिजाइननुसार डिस्प्ले छोटा राहण्यास मदत होईल. iPhone 14 Pro आणि Pro Max च्या कॅमेऱ्यात 48MP चा हाय रिजोल्यूशन सेन्सर दिला जाऊ शकतो.

कनेक्टिव्हिटी: यावर्षीपासून अ‍ॅप्पल फोनमध्ये USB-C पोर्ट दिला जाईल, अशी चर्चा आहे. परंतु नवीन लिक्समध्ये खुलासा झाला आहे की आयफोन 14 सीरीजमध्ये हा बदल दिसणार नाही आणि कंपनी लाईटनिंग पोर्टचाच वापर करेल. आयफोन iPhone 15 पासून कंपनीनं टाईप सी पोर्टकडे वळू शकते, कारण युरोपीय यूनियननं ते बंधनकारक केलं आहे.

तसेच Apple 14 सीरीजमध्ये सॅटेलाईट कनेक्टिव्हिटी फीचर मिळणार असल्याच्या देखील बातम्या आल्या आहेत. हे फीचर आपत्कालीन परिस्तिथीत कोणत्याही सिमविना शॉर्ट मेसेजेस पाठवण्याची मुभा देतं. तसेच कंपनी यावर्षीपासून सिम स्लॉट हटवणार आहे. तुम्हाला फक्त e-SIM चा ऑप्शन ही मिळेल. तसेच नवीन आयफोनमध्ये Wi-Fi 6E मिळणार आहे. ही सर्व माहिती अ‍ॅप्पल अनॅलिस्ट Ming-Chi Kuo यांनी दिली आहे.

प्रोसेसर: प्रोसेसरच्या बाबतीत अ‍ॅप्पल युजर्सना थोडी निराशा होऊ शकते. खास करून ते युजर्स ज्यांना बेस व्हेरिएंट घ्यायचा आहे. नवीन iPhone 14 बद्दल जी माहिती मिळाली आहे त्यानुसार कंपनी दोन्ही बेस मॉडेल iPhone 14 आणि Plus किंवा Max मध्ये जुना प्रोसेसर A15 Bionic देऊ शकते. तर A16 Bionic प्रोसेसर फक्त iPhone 14 Pro आणि Pro Max मध्ये मिळेल. Ming-Chi Kuo यांच्या मते कंपनीनं जुन्या प्रोसेसरच्या तुलनेत यावेळी जास्त बदल केलेले नाहीत. त्यामुळे परफॉर्मन्समध्ये जास्त फरक दिसणार नाही.

हा यावेळी तुम्हाला vapour chamber cooling system मिळू शकते. कंपनी यावर खूप काम करत आहे. Ming-Chi Kuo यांनी सांगितलं आहे की व्हेपर चेंबर कूलिंग अँड्रॉइड फोनप्रमाणेच काम करेल. यावेळी कूलिंग सिस्टम आणण्याचे मोठे कारण म्हणजे 5जी कनेक्टिव्हिटी. ज्यामुळे इंटरनेट खूप फास्ट झालं आहे आणि आयफोनमध्ये हीटिंगची समस्या येत आहे. परंतु इथे देखील बेस व्हेरिएंट युजर्ससाठी बातमी चांगली नाही. कारण फक्त iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max मधेच कुलिंग सिस्टम मिळेल.

सॉफ्टवेयर: iPhone 14 च्या सर्व मॉडेलमध्ये तुम्हाला iOS 16 ओएस आउट ऑफ द बॉक्स मिळेल. नवीन ओएसमध्ये सर्वात मोठा बदल यावेळी लॉक स्क्रीन फीचरचा आहे. कंपनीनं आता लॉक स्क्रीन कस्टमाइजेशनचं फिचर दिलं आहे. आता तुम्ही फोनच्या लॉक स्क्रीनवर फोटो, फॉन्ट स्टाईल आणि कॅलेंडर, वेदर, डेट, टाइम झोन, अलार्म आणि बॅटरी लेव्हलसह अन्य विजेट्स सेट करू शकता. तुम्ही एकाच फोनमध्ये अनेक लॉक स्क्रीन ठेऊ शकता. काही दिवसांपूर्वीच कंपनीनं iOS 16 बीटा रिलीज केला होता ज्यात नवीन फीचर्स दिसले आहेत.

तसेच iOS 16 मध्ये तुम्हाला शेयर्ड फोटो लायब्ररी फीचर, फास्ट टाइपिंग डिटेक्शन कीबोर्ड, हेल्थ फीचर, ईमेल शेड्यूलिंग, मल्टी स्टॉप मॅप, व्हिडीओ मध्ये टेक्सट सपोर्ट आणि सफारीमध्ये ग्रुप टॅब सपोर्ट असे फीचर्स मिळतील.

एकंदरीत iPhone 14 सीरिज तुम्हाला संमिश्र अनुभव देऊ शकते. चांगल्या फीचर्सचं कौतुक तर होईलच परंतु काही जुने स्पेक्स आणि फीचर्स तसेच ठेवल्यास अ‍ॅप्पल ट्रोल देखील होऊ शकते. परंतु काहीही असलं तरी iPhone 14 ची प्रतीक्षा फॅन्ससह टेक प्रेमींना देखील आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here