लाईट गेल्यावर देखील घरात होणार नाही अंधार, हे LED बल्ब इन्व्हर्टरविना देखील तासनतास देतील प्रकाश

कोळश्याच्या तुटवड्यामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये पुन्हा एकदा वीज संकट (Power Crisis) ओढवलं आहे. काही ठिकाणी आठ तासांपर्यंत भारनियमन (Power Cut) केलं जात आहे. तसेच पाऊसामुळे देखील अनेकांना अंधारात राहावं लागत आहे. अशावेळी लोक प्रकाशासाठी जनरेटर किंवा इन्व्हर्टरचा वापर करतात परंतु त्यासाठी हजारो रुपये खर्च करावे लागतात. तुम्ही स्वस्त रिचार्जेबल एलईडी बल्ब (LED Bulb) च्या मदतीनं देखील घरात उजेड मिळवू शकता. पावर कट दरम्यान हे Rechargeable LED Bulb तुमच्या घराला जवळपास 4-5 तास प्रकाश देतात. वीज गेल्यामुळे जर तुम्हाला तुमची कामे थांबवायची नसतील तर तुम्ही हे पावरफुल ली आयन बॅटरी असलेले बल्ब विकत घेऊ शकता.

Rechargeable Led Bulb

पुढे आम्ही तुम्हाला टॉप 5 प्रसिद्ध ब्रँड्सच्या बेस्ट Rechargeable Led Bulb ची माहिती देत आहोत ज्यांची किंमत 100 रुपयांपेक्षा कमीमध्ये सुरु होते. हे ड्यूरेबल एलईडी बल्ब तुम्ही डिस्काउंटसह ऑनलाइन विकत घेऊ शकता.

TOP 5 Rechargeable LED Bulb

  • PHILIPS 9 W Standard E27 LED Bulb (White)
  • Syska Led Lights 9 W Standard B22 LED Bulb
  • HALONIX All Rounder Base B22
  • Wipro 9W B22 LED White Emergency Bulb, (NE9001)
  • Osram Ledvance LED 9 Watt Rechargeable Inverter Bulb B22D 6500K

PHILIPS 9 W Standard E27 LED Bulb (White)

Philips Rechargeable Bulb ची किंमत 139 रुपये आहे आणि हा Flipkart वर विकत घेता येईल. हा इन्व्हर्टर एलईडी बल्ब 9 वॉटमध्ये येतो त्यामुळे एका खोलीसाठी पुरेसा प्रकाश मिळतो. कंपनी या बल्बसह 1 वर्षाची वॉरंटी देखील देते. हा रिचार्जेबल एलईडी बल्ब 4 वॉट आणि 14 वॉटच्या ऑप्शनमध्ये अनुक्रमे 149 रुपये व 229 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

Syska Led Lights 9 W Standard B22 LED Bulb

फ्लिपकार्टवरील या एलईडी बल्बला 4.3 स्टार रेटिंग मिळाली आहे. तसेच, कंपनीनं दावा केला आहे की हा LED bulb सिंगल चार्जवर 50000 तास वापरता येईल. हा बल्ब डबल पॅकमध्ये येत असल्यामुळे 198 रुपयांमध्ये तुम्हाला विजेविना चालणारे दोन रिचार्जेबल एलईडी बल्ब मिळतात. सिंगल बल्बची किंमत जवळपास 94 रुपयांच्या आसपास आहे.

HALONIX All Rounder Base B22

9 Watt च्या Halonix Rechargeable LED Bulb मोठ्या बॅटरी बॅकअपसह मिळतो. हा पावरकट झाल्यानंतर 5 तासांपर्यंत प्रकाश देऊ शकतो. हा चार्ज झाल्यावर देखील एनर्जी सेव्ह करतो. तुम्ही हा तुमच्या घरी, ऑफिस, दुकान इत्यादी ठिकाणी सहज फिट करू शकता. याची किंमत 219 रुपये आहे आणि हा अ‍ॅमेझॉन इंडियावरून विकत घेता येईल.

Wipro 9W B22 LED White Emergency Bulb, (NE9001)

2200 mAH Li-ion रिचार्जेबल बॅटरीअसलेला हा एलईडी बल्ब सिंगल चार्जमध्ये 4 तासांचा पावर बॅकअप देतो. 9 वॉटच्या या ब्लबचा चार्जिंग टाइम 8-10 तास आहे. यात बॅटरीच्या सुरक्षेसाठी ओव्हरचार्जिंग प्रोटेक्शन देण्यात आलं आहे. कंपनीनं 6 महिन्यांची वॉरंटी दिली आहे. हा अ‍ॅमेझॉन इंडियावरून विकत घेता येईल.

Osram Ledvance LED 9 Watt Rechargeable Inverter Bulb B22D 6500K

हा देखील एक हाय परफॉर्मिंग रिचार्जेबल एलईडी बल्ब आहे जो 520 रुपयांमध्ये अ‍ॅमेझॉन इंडियावरून विकत घेता येईल. 9W चा हा बल्ब पावरकटमध्ये 4 तासांपर्यंत बॅकअप देतो. हा क्रिस्टल व्हाइट लाईट देतो. तुम्ही याचा वापर स्टडी रूम, लिव्हिंग रूम किंवा किचनमध्ये देखील करू शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here