5000mAh बॅटरी, 50MP कॅमेरा असलेला POCO चा 5G फोनवर शानदार डील; अत्यंत स्वस्तात खरेदी करा

ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Flipkart वर Big Saving Days सेल सुरु आहे आहे. फ्लिपकार्टवर हा सेल 23 जुलैपासून 27 जुलै पर्यंत लाईव्ह असेल. या सेल दरम्यान स्मार्टफोन्सवर धमाकेदार डिस्काउंट आणि ऑफर्स मिळत आहेत. जर तुम्ही देखील नवीन स्मार्टफोन विकत घेण्याचा किंवा जुना हँडसेट अपग्रेड करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही फ्लिपकार्टवर सुरु असेलल्या सेलमधील बेस्ट डील्सचा फायदा घेऊ शकता. फ्लिपकार्टवरील सेलमध्ये POCO चा 5G स्मार्टफोन 10 हजारांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध झाला आहे. पुढे आम्ही तुम्हाला POCO M4 5G स्मार्टफोनवर मिळणाऱ्या ऑफर्सची सविस्तर माहिती दिली आहे.

POCO M4 5G वरील ऑफर

ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Flipkart वर POCO M4 5G स्मार्टफोन स्वस्तात विकत घेता येईल. पोकोचा हा स्मार्टफोन 10,749 रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला आहे. परंतु याची खरेदी करताना Kotak बँकेच्या क्रेडिट कार्डचा वापर केल्यास 1000 रुपयांची सूट मिळेल. या बँक ऑफरमुळे पोकोचा 5G फोन फक्त 9,749 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच अ‍ॅक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डवर 750 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. अ‍ॅक्सिस बँक युजर्स हा फोन फक्त 9999 रुपयांमध्ये विकत घेऊ शकतील. जर तुम्ही स्मार्टफोन अपग्रेड करण्याचा विचार करत असाल तर तुमच्या जुन्या स्मार्टफोनचा देखील वापर सूट मिळवण्यासाठी करता येईल. जुना स्मार्टफोन एक्सचेंज करून तुम्ही अतिरिक्त बचत करू शकता.

POCO M4 5G ची किंमत

POCO M4 5G स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंट भारतात आले आहेत. या फोनचा बेस व्हेरिएंट 4GB रॅम आणि 64GB स्टोरेजसह 10749 रुपयांमध्ये विकला जात आहे. तर 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेला व्हेरिएंट 12,749 रुपयांमध्ये विकत घेता येईल. कंपनीनं हा फोन पोकोच्या सिग्नेचर यलो कलरमध्ये सादर केला आहे. तसेच कूल ब्लू आणि पावर ब्लॅक कलर व्हेरिएंट देखील उपलब्ध आहेत.

POCO M4 5G चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

Poco M4 5G स्मार्टफोनमध्ये 6.58-इंचाचा Full HD+ LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचे रिजोल्यूशन 2400 x 1080 पिक्सल आणि रिफ्रेश रेट 90Hz आहे. फोनच्या या डिस्प्लेला Corning Gorilla Glass 3 चे प्रोटेक्शन देण्यात आलं आहे. हा फोन Android 12 आधारित MIUI 13 वर चालतो.

स्मार्टफोन मीडियाटेक के ऑक्टाकोर Dimensity 700 प्रोसेसरसह येतो. सोबतीला ग्राफिक्ससाठी Mali G57 GPU देण्यात आला आहे. पोकोचा हा फोन अँड्रॉइड 12 आधारित MIUI 13 वर चालतो. यात 6GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंतची स्टोरेज मिळते. 2GB अतिरिक्त रॅम मिळवण्यासाठी टर्बो रॅम फिचर तर स्टोरेज वाढवण्यासाठी मायक्रोएसडी कार्ड सपोर्ट मिळतो.

फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनचा प्रायमरी कॅमेरा 50MP चा आहे, सोबतीला 2MP डेप्थ सेन्सर मिळतो. फोनच्या फ्रंटला 8MP चा सेल्फी शुटर मिळतो. या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आणि 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच Type-C पोर्ट, साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आणि IP52 रेटिंग देखील मिळते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here