आॅनर ने याच वर्षी आईएफए च्या मंचावरून कंपनीचा खूप एडवांस आणि स्टाइलिश स्मार्टफोन मॅजिक 2 सादर केला होता. आॅनर मॅजिक 2 मध्ये स्लाईडर कॅमेरा पॅनल देण्यात आला आहे ज्यामुळे हा आॅनर ने आतापर्यंत आणलेल्या सर्व स्मार्टफोन टेक्नॉलॉजी पेक्षा वेगळा आणि अनोखा आहे. मॅजिक 2 सादर झाल्यापासून टेक प्रेमी व आॅनर फॅन्स या फोनची वाट बघत होते. आज हि प्रतीक्षा संपवत आॅनर ने मॅजिक 2 स्मार्टफोन अंर्तराष्ट्रीय मंचावर लॉन्च केला आहे. आॅनर मॅजिक 2 मध्ये शानदार लुक सोबत एडवांस फीचर्स आणि दमदार स्पेसिफिकेशन्स आहेत.
आॅनर मॅजिक 2 चे स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या फुल बेजल लेस डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. फोन मध्ये 2340 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.39-इंचाचा फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन एंडरॉयडच्या लेटेस्ट आॅपरेटिंग सिस्टम एंडरॉयड 9 पाई सह ईएमयूआई 9.0 वर सादर करण्यात आला आहे. मॅजिक 2 हुआवई च्या नवीन आणि ताकदवान चिपसेट हाईसिलिकॉन किरीन 980 वर चालतो.
आॅनर ने मॅजिक 2 सोबत कंपनीचा पर्सनल असिस्टेंट ‘योयो’ पण टेक मंचावर सादर केला आहे. ऍप्पलच्या सीरी प्रमाणे आॅनरचा योयो फोनचा वापर सोप्पा करतो. मॅजिक 2 2 रॅम वेरिएंट मध्ये लॉन्च केला आहे. या वेरिएंट्स मध्ये 6जीबी व 8जीबी रॅम आहे. आॅनर मॅजिक 2 6जीबी रॅम सोबत 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. तसेच 8जीबी रॅम सोबत मॅजिक 2 तीन स्टोरेज आॅप्शन्स सह सादर करण्यात आला आहे. यात 128जीबी मेमरी, 256जीबी स्टोरेज तसेच 512जीबी मेमरी उपलब्ध आहे.
किंमत पाहता आॅनर मॅजिक 2 चा 6जीबी रॅम/128जीबी मेमरी वेरिएंट 3799 युआन मध्ये लॉन्च केला गेला आहे जे भारतीय करंसी नुसार 40,000 रुपयांच्या आसपास आहेत. तसेच मॅजिक 2 चा 8जीबी रॅम सह येणार 128जीबी मेमरी वेरिएंट 4299 युआन, 256जीबी स्टोरेज वेरिएंट 4799 युआन तसेच 512जीबी मेमरी वेरिएंट 5799 युआन मध्ये चीन मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. या किंमती भारतीय करंसी नुसार क्रमश: 45,600 रुपये, 50,900 रुपये व 61,500 रुपयांच्या आसपास आहेत.















