या स्मार्टफोनवर आता चालणार नाही WhatsApp, पाहा संपूर्ण यादी

आज तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वात लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲप आहे. कारण, हे सर्व स्मार्टफोनवर सहज चालवता येऊ शकते, परंतु आता काही युजर्स त्यांच्या डिव्हाईसमध्ये व्हॉट्सॲप वापरू शकणार नाहीत. कारण, त्याला चालवणाऱ्या मेटा या कंपनीने 2024 च्या अखेरीस 35 हून अधिक जुन्या हँडसेटमध्ये व्हॉट्सॲपचा सपोर्ट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या डिव्हाईसच्या ग्राहकांनी त्यांचा चॅट इतिहास आणि इतर डेटा जतन करण्यासाठी अंतिम मुदतीपूर्वी बॅकअप घ्यावा आणि अपग्रेड करावा असा सल्ला देण्यात आला आहे.

वास्तविक 2024 च्या अखेरीस तुम्हाला 35 वेगवेगळ्या कंपन्यांच्या स्मार्टफोन्सवर व्हॉट्सॲप चे अपडेटेड व्हर्जन मिळणार नाही. सोप्या शब्दात समजल्यास या मोबाईलमध्ये ॲप काम करणे बंद करेल. त्यामुळे तुमच्याकडे असे एखादे डिव्हाईस असल्यास ते लवकरात लवकर अपडेट करा. या डिव्हाईसची यादी खाली दिली आहे, त्यामुळे कोणत्या डिव्हाईसवर व्हॉट्सॲप चालेल की नाही हे जाणून घेण्यास मदत होईल.

या डिव्हाईसला सपोर्ट करणार नाही व्हॉट्सॲप

  • Apple चे iPhone 5, iPhone 6, iPhone 6S, iPhone 6S Plus आणि iPhone SE (पहिले जनरेशन)
  • Samsung चे Galaxy Ace Plus, Galaxy Core, Galaxy Express 2, Galaxy Grand, Galaxy Note 3, Galaxy S3 Mini, Galaxy S4 Active, Galaxy S4 Mini आणि Galaxy S4 Zoom
  • Motorola चे डिव्हाईस Moto G आणि Moto X
  • Sony चे Xperia Z1 आणि Xperia E3
  • LG ब्रँडचे Optimus 4X HD, Optimus G, Optimus G Pro आणि Optimus L7
  • Lenovo मोबाईल चे Lenovo 46600, Lenovo A858T, Lenovo P70 आणि Lenovo S890
  • Huawei चे Ascend P6 S, Ascend G525, Huawei C199, Huawei GX1s आणि Huawei Y625 मध्ये व्हॉट्सॲपला सपोर्ट करणे बंद होईल.

हे आहे कारण?

सोशल मीडियावरील अहवालांवर विश्वास ठेवला तर, मेसेजिंग ॲपने आपल्या स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी नवीन किमान आवश्यकता निश्चित केल्या आहेत. सध्या कोणत्याही मोबाईलवर व्हॉट्सॲप वापरण्यासाठी अँड्रॉईड 5.0 किंवा त्यावरील ओएस असणे अनिवार्य आहे. तर, आयफोनमध्ये ते आयओएस 12.0 किंवा नंतरच्या व्हर्जन वर काम करते. या कारणास्तव पुढील वर्षापासून वर दिलेल्या यादीत दिलेल्या कोणत्याही अँड्रॉईड फोन किंवा आयफोनमध्ये व्हॉट्सॲप काम करणे बंद करेल.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here