स्वस्त फोन Vivo Y03t झाला जागतिक स्तरावर लाँच, जाणून घ्या स्पेसिफिकेशन

Vivo ने मार्च महिन्यात आपला Y03 स्मार्टफोन जागतिक स्तरावर सादर केला होता. त्याच वेळी आता आणखी एक स्वस्त एंट्री लेव्हल डिव्हाईस Vivo Y03t लाँच करण्यात आला आहे. यामध्ये ग्राहकांना Unisoc T612 चिपसेट, एक्सपॅंडेबल टेक्नॉलॉजीसह 8GB पर्यंत रॅम, 5000mAh ची मोठी बॅटरी, 13 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा असे अनेक फिचर्स दिले जात आहेत. चला, पुढे या मोबाईलची किंमत आणि स्पेसिफिकेशन सविस्तरपणे जाणून घेऊया.

Vivo Y03t चे स्पेसिफिकेशन

  • 6.56 एचडी प्लस डिस्प्ले
  • Unisoc T612 चिपसेट
  • 4GB रॅम +128GB स्टोरेज
  • 4GB एक्सटेंडेड रॅम
  • 13MP ड्युअल रिअर कॅमेरा
  • 5000mAh बॅटरी
  • IP54 रेटिंग

डिस्प्ले: Vivo Y03t फोनमध्ये 6.56 इंचाचा एचडी प्लस एलसीडी देण्यात आला डिस्प्ले आहे. यावर 1612 x720 चे पिक्सेल रिझोल्यूशन, 90Hz पर्यंत रिफ्रेश रेट, 269पीपीआय पिक्सेल डेंसिटी, 70% एनटीएससी कलर सेच्यूरेशन, 528 निट्स पीक ब्राईटनेस आणि कॅपेसिटिव्ह मल्टी टच फिचर्स आहे.

चिपसेट: Vivo Y03t मोबाईलमध्ये कंपनीने परफॉर्मन्ससाठी एन्ट्री लेव्हल Unisoc T612 चिपसेट लावला आहे. हा चिपसेट 12 नॅनोमीटर प्रोसेसवर तयार करण्यात आला आहे. यामुळे ग्राहकांना 1.8GHz पर्यंतची उच्च क्लॉक स्पीड मिळते.

स्टोरेज आणि रॅम: डेटा सेव्ह करणे आणि स्पीड साठी कंपनीने 4GB RAM + 128 GB पर्यंतचे इंटरनल स्टोरेज ऑफर केले आहे. यासोबतच रॅम वाढवण्यासाठी 4GB एक्सपॅंडेबल सपोर्ट आणि स्टोरेजला वाढवण्यासाठी मायक्रो एसडी स्लॉटची सुविधा आहे.

कॅमेरा: कॅमेरा फिचर्सबद्दल बोलायचे झाल्यास Vivo Y03t स्मार्टफोन ड्युअल रिअर कॅमेरा सेटअपसह येतो. ज्यामध्ये एफ/2.2 अपर्चर असलेली 13 मेगापिक्सेलची प्रायमरी कॅमेरा लेन्स आणि 0.08 मेगापिक्सेलचा दुसरा कॅमेरा लावला गेला आहे. त्याचवेळी सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी मोबाईलमध्ये एफ/2.2 अपर्चर असलेला 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे.

बॅटरी: पॉवर बॅकअपसाठी कंपनीने मोबाईलमध्ये 5000mAh ची मोठी बॅटरी दिली आहे. ते चार्ज करण्यासाठी ग्राहकांना 15W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळत आहे.

इतर: इतर फिचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, Vivo Y03t स्मार्टफोनमध्ये वाय-फाय, ब्लूटूथ 5.2, यूएसबी टाईप सी-पोर्ट, ड्युअल सिम 4G, पाणी आणि धूळीपासून संरक्षणासाठी IP54 रेटिंग सारखे पर्याय दिले गेले आहेत.

ओएस: ऑपरेटिंग सिस्टमबद्दल बोलायचे झाल्यास नवीन Vivo स्मार्टफोन अँड्रॉईड 14 वर आधारित फनटच ओएस 14 वर काम करत आहे.

वजन आणि डायमेशन: Vivo Y03t फोनचे डायमेशन 163.63 × 75.58 × 8.39 मिमी आणि वजन 185 ग्रॅम आहे.

Vivo Y03t ची किंमत

  • Vivo Y03t हा कंपनीच्या जागतिक वेबसाईटवर सूचीबद्ध झाला आहे. तर हे शॉपी फिलिपिन्सवर PHP 4,399 म्हणजेच सुमारे 6,530 रुपयांना विकला जात आहे.
  • मोबाईलसाठी ग्राहकांना स्पेस ब्लॅक आणि जेम ग्रीन असे दोन रंग मिळतील.
LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here