बॅटल रोयाल गेम फॅन्स भारतात बॅन झालेल्या Battlegrounds Mobile India (BGMI) गेमची आतुरतेने वाट पाहत आहेत. जो PUBG Mobile चा भारतीय व्हर्जन आहे. या गेमची डेव्हलपर कंपनी Krafton बीजीएमआय भारतात पुन्हा लाँच करण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे. त्यात आता BGMI Lite च्या भारतीय लाँचची देखील माहिती आली आहे. त्यामुळे गेमर्ससाठी BGMI Unban होणार ही एकच खुशखबर नाही तर Battlegrounds Mobile India Lite लाँचमुळे कमी स्पेक्स असलेले मोबाइल गेमर्स देखील आनंदले आहेत.
Krafton नं भारतात PUBG Mobile आणि PUBG Mobile Lite बॅन झाल्यानंतर Battlegrounds Mobile India म्हणजे BGMI लाँच केला होता. हा गेम भारतात लाँच करण्याआधी कंपनीनं खूप मार्केट रिसर्च केला होता आणि भारतीय गेमर्सच्या आवडीनुसार गेम डिजाइन केला होता. आता या गेममधील एका सर्वेमध्ये भारतातील युजर्सना गेमचा लाइट व्हर्जन हवा का हे डेव्हलपर्सनी विचारलं आहे. त्यामुळे BGMI Lite च्या चर्चाना उधाण आलं आहे. हे देखील वाचा: देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार असेल Tata Tiago EV! चालता-चालता होणार बॅटरी चार्ज
BGMI Lite कधी होईल लाँच?
Battlegrounds Mobile India Lite या गेमचा लोव्हर व्हर्जन असू शकतो. हा PUBG Mobile Lite चा भारतीय व्हर्जन असू शकतो. पबजी मोबाइल लाइटचे देखील भारतात खूप फॅन्स होते. Battlegrounds Mobile India च्या लाँचनंतर युजर्स लाइट व्हर्जनची देखील मागणी करत होते. परंतु आता बीजीएमआयवर बॅन आल्यानंतर जर कंपनी लाइट व्हर्जन लाँच करत असेल तर कंपनी लवकरच रेग्युलर बीजीएमआय देखील सादर करू शकते.
Battlegrounds Mobile India नं लाँच होताच बॅटल रोयाल गेम फॅन्समध्ये आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. या गेममध्ये क्वॉलिटी ग्राफिक्स युजर्सना नेक्स्ट लेव्हल एक्सपीरियंस मिळतो. हाय क्वॉलिटीमुळे मोठ्या संख्येनं युजर्स कमी स्पेक्स असलेल्या स्मार्टफोनमध्ये हा गेम नीट खेळू शकत नाहीत. त्यामुळेच भारतात याच्या लाइट व्हर्जनच्या लाँचची मागणी जोर धरत आहे. हे देखील वाचा: BGMI Ban: बॅन झाल्यावर देखील डाउनलोड करू शकता हा गेम, जाणून घ्या सोपी पद्धत
BGMI Unban date
पॉपुलर मोबाइल गेम Battlegrounds Mobile India (BGMI) बॅन झाल्यानंतर याच्या पुनरागमनाची सर्वच वाट पाहत आहेत. सरकारनं देशातील अंतर्गत सुरक्षा आणि डेटा प्रायव्हसीच्या कारणामुळे या गेमवर बंदी घातली आहे. रिपोर्ट्सनुसार, गेमचे डेव्हलपर्स गेमच्या सर्वरचं ठिकाण बदलत आहेत, त्यामुळे गेमचे पुनरागमन निश्चित होऊ शकते. काही रिपोर्टसमध्ये दावा केला जात आहे की हा गेम ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये पुनरागमन करू शकतो. लवकरच कंपनी याची घोषणा करू शकते.