लेनोवो चा स्लाईडर बॉडी असलेला झेड प्रो ची वाट खूप दिवसांपासून बघितली जात आहे. लेनोवो ने झेड5 प्रो चीनी बाजारात लॉन्च केला आहे. लेनोवो झेड5 प्रो लुक आणि डिजाईन मध्ये जितका शानदार आहे फोनचे स्पेसिफिकेशन्स पण तेवढेच दमदार आहेत.
लेनोवो झेड5 प्रो ची सर्वात मोठी यूएसपी फोनचा स्लाइडर पॅनलच आहे. या स्लाइडर पॅनल वर डुअल सेल्फी कॅमेरा आणि स्पीकर ग्रिल देण्यात आली आहे. हा सेल्फी कॅमेरा फोनच्या बॉडीच्या आत असतो पण कॅमेरा वरून सेल्फी कमांड देताच फोन बॉडी मधून बाहेर येऊन सेल्फी क्लिक करतो. झेड5 प्रो चा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 95.06 टक्के आहे. फोनच्या चारही बाजू बेजल लेस आहेत तसेच फ्रंट पॅनल वर कोणतीही नॉच, सेंसर किंवा फिजिकल बटन नाही.
झेड5 प्रो चे स्पेसिफिकेशन्स पाहता हा 2340 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.39-इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले सह सादर किया गया आहे. हा फोन एंडरॉयड ओरियो आधारित कंपनीच्या झेनयूआई 10.0 वर सादर करण्यात आला आहे जो क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 710 चिपसेट वर चालतो. कंपनी ने हा फोन 6जीबी रॅम सह सादर केला आहे. झेड5 प्रो को चीनी मध्ये 64जीबी मेमरी आणि 128जीबी मेमरी च्या दोन आॅप्शन्स मध्ये विकत घेता येईल.
फोटोग्राफी सेग्मेंट पाहता लेनोवो झेड5 प्रो डुअल रियर आणि डुअल फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर वर्टिकल शेप मध्ये 24-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 16-मेगापिक्सलचा सेकेंडरी रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच फोनच्या स्लाइडर पॅनल वरील दोन सेल्फी कॅमेरा सेंसर्स पैकी एक कॅमेरा 16-मेगापिक्सलचा आहे तर दुसरा कॅमेरा सेंसर 8-मेगापिक्सलचा देण्यात आला आहे. चांगल्या फोटो साठी दोन्ही कॅमेरा सेटअप सोबत फ्लॅश लाईट देण्यात आली आहे.
लेनोवो झेड5 प्रो डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. हा फोन सिक्योरिटी साठी फेस अनलॉक फीचर व इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट टेक्नोलॉजीला करतो. तसेच बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच झेड5 प्रो मध्ये पावर बॅकअप साठी फास्ट चार्जिंग सपोर्ट असणारी 3,350एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. किंमत पाहता लेनोवो झेड5 प्रो चा 64जीबी वेरिएंट 1998 युआन तसेच 128जीबी वेरिएंट 2998 युआन मध्ये लॉन्च केला गेला आहे. भारतीय करंसी नुसार हि किंमत क्रमश: 21,100 रुपये व 31,700 रुपयांच्या आसपास आहे.














